mazionjal

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

वाळवंट

मला ह्या वाळवणटाच खूप कौतुक वाटत
काय आहे हा नक्की
सगळ विषारी , काटेरी पोटात सामावणारा
रणरणत ऊन सहन करणारा
हिरवळीची आशा न धरता
तप्त वाळूच स्वतःच अस्तिव म्हणून स्वीकारणारा
कस जमत याला ?

का येवढ सहन करतो हा ?
ह्याला कुणाचा आधार हि नको 
म्हणून तर ओंजळीतली वाळू निसटून जाते बोटातून 
खूप साधा आणि सरळ स्वभावाचा 
दिवसा तापलेला आणि रात्री शांत गारठलेला . 
कसली तपस्या करतोय , कुणा साठी आणि का ?