खरंच मुलींचं विश्वच वेगळं असत ,, लग्न अगोदरच आणि लग्न नंतरच असं दोन प्रकारचं आयुष्य त्या एका जन्मात जगतात दोन्ही मध्ये खूप जाणवणारा फरक असतो .. लाडात वाढलेली ,, तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपलेली पोर लग्न होऊन शोषिक कशी होते, समजूतदार कधी होते हे तीच तिलाच कळत नाही . अजूनही लग्ना नंतरच एका मुलीचं आयुष्य हे नवऱ्यावर , त्याच्या स्वभावावर , त्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विचारांवर , त्याच्या दृष्टीकोनावर , आणि त्याच्या भावनांवर , त्या हाताळण्यावर अवलंबून असत.
सखी शाळेत असताना पासून मी तिला ओळखते खूप छान लिहायची ती , सुंदर कविता करायची
तिचे लेख सुद्धा असायचे पेपर ला , कस सुचत ग तुला, विचारल्यावर नुसतं हसायची
छोट्या गोष्टी पण लिहायची ती त्या वेळेस
काल भेटली मला तेव्हा खूप वेगळंच जाणवलं , खूप बदल झाला होता तिच्यात , तीच राहणं, वागणं बोलणं एकदमच बदललं होत . एखाद्या रुक्ष वाळवंटा सारखी वाटली , कुठलाही ओलावा नाही कि कुठली हिरवळ नाही . बोलण्याचा प्रयन्त केला तर खूप मोजकी उत्तर ... आणि निघून गेली
काय झालं असेल ह्याचा विचार करत मी पण घरी गेले .... नंतर खूप दिवसानी आमची दुसरी मैत्रीण भेटली गप्पांच्या ओघात तिचा विषय निघाला .. तेव्हा कळलं ... वयाच्या २२व्या वर्षी तीच लग्न झाल, खरंतर तिला नव्हतं च करायचं ,,,, पण आई वडील चांगलंच करतील ... समाजाला घाबरून तिने ते केलं , आणि एका अग्नी कुंडात उडी घेतली .....तिच्यातलं ते हिरवं रान वाळवंट व्हायला इथूनच सुरुवात झाली . तिच्या त्या पारिजातकाच्या फुला सारख्या नाजूक मनाला एका उष्ण ओंजळीत दिल गेलं होत ,त्या ओंजळीला पहिला पाऊस कधी कळलाच नाही ,,, ना कधी त्या फुलाच्या नाजूकतेची जाणीव झाली , भावनांची नाजूक किनार त्या ओंजळीत कधी तिने अनुभवलीच नाही ,,, साथ, सोबत, विश्वास , नाजूक हवा हवासा वाटणारा स्पर्श त्या ओंजळीने तिला कधी दिलाच नाही. ज्यामुळे ते सुकलं , कोमेजले . लग्ना झाल्यावर मुलींच्या काही अपेक्षा असतात ... आणि ते नैसर्गिक असत ,,,, प्रत्येकीला त्या दिवसात वाटत ,,, नवऱ्या बरोबर राहावं, फिरावं ,,, पण हिच्या बाबतीत सगळं उलटच होत गेलं ... ज्या अपेक्षा ती करायची त्याच्या उलट नवऱ्याचं वागणं होत .... सुरुवातीला मन मारून .... जाऊ दे .... म्हणून सोडलं त्यानंतर मुलां साठी त्याच वागणं accept केलं .... पण तिच्या मनावर घाव होतच होते . त्यातून रक्त कधी आलंच नाही ...फक्त ते सुजून हिरवं निळं झाल... सततच्या घावांमुळं ते नाजूक मन संवेदना हरवून बसलं ,,,,,लेखणी ने तर कधीच अडगळ पकडली होती , फक्त सोसणं एवढंच सुरु होत , आतातर तीच मन इतकं कडक झालं होत कि होणारे घाव पण त्याला जाणवत नव्हते .