mazionjal

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

पिठाची गिरणी :

पिठाची गिरणी :
(आई घाईत दळण घेऊन निघालेली संध्याकाळचे ७:३० वाजलेले ,सगळीकडे अंधार पडल्यामुळे वेगवेगळे लाईट्स ची झगमगाट , रस्त्यावर घरी परतणारे ऑफिस वासी आणि बरेच ह्या सगळ्याची गाडीचे हॉर्न वाजवून "ए .... चल ना लवकर .... बिनडोक " असं मनातल्या मनात बोलून होणारी घाई , ज्याला जेवढ्या लवकर घरी जायचंय आणि जितकी जास्त घाई तेवढा जोरात हॉर्न ... , रस्त्यात मुलं क्रिकेट खेळता आहेत . असा सगळं तो वेळेचा प्रकार . तेव्हाडयात मया पळत पळत आई जवळ येऊन )
मयू : कुठे चाललीस
आई : अरे दळण संपलय , पिठाच्या गिरणीत चालले , येतो का
मयू : येतो कि , फक्त तुझा मोबाईल दे मला तिथे
आई : ह्हहो देत्ते ना ..... चला
(दोघे पण गिरणीत पोहोचतात तोडा वेळ बसून त्यांचं दळण होत तोपर्यंत आई तिथल्या काही ओळखीच्या बायकांशी गप्पा मारत असते आणि मयू मोबाइलला वर कोणता तरी गेम खेळत असतो )
आई : भैया कितना हुवा
भैया : ४ KG है ना तो चोबीस हुवा
आई ; तिच्या पर्स मधून २० रुपयाची एक नोट आणि ५ च एक नाणं त्याला देते , आणि दळण घेऊन निघते
मयू : अ ग २४ रुपये झालेत ना , मग एक रुपया घे कि त्याच्या कडून परत
आई : राहू दे पुढच्या वेळेस कमी देईल
मयू : आई १ रुपया तू सोडून दिलासा .... एक रुपया extra दिलासा त्याला .... तुला माहित आहे का ह्यात काय काय होऊ शकत , तुझ्या सारखं किती तरी जणींनी त्याला असं एक रुपया सोडला तर रोज तो किती एक्सट्रा कमवतो ... आणि त्याच तो काय करतो माहित आहे का .... आई असा एक रुपया कमवायला किती कष्ट पडतात तुला माहित आहे का ... दाखव एक रुपया एका दिवसात कमावून .... त्या पेक्षा तो मला दिला असता तर आज ह्या तुझ्या छोट्याश्या मुलाने एक छोटस चॉकोलेट खाल्लं असत आणि तो किती खुश झाला असता , तुझ्या बरोबर दर वेळेला दळण आणायला आला असता , आणि तू म्हणतेस ना कि माझं पिल्लू खुश तर मी पण खुश , आई… आज तू एका आनंदाला मुकलीस .
आई : हो का चला घरी...
Gauri

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

ऑफिस मधली दिवाळी ची तयारी

ऑफिस ,,,, दिवसातले सगळ्यात जास्त वेळ जिथे आपण असतो ती जागा , सेकंड होम च कि
आणि अश्या ह्या सेकंड होम मध्ये जेव्हा दिवाळी येते .... काय मज्जा असते
माझ्या ऑफिस ची तर तऱ्हा निराळी .... एकाच बिल्डिंग मध्ये दोन फ्लोअर मध्ये आहे माझं ऑफिस
फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड . फर्स्ट फ्लोअर म्हणजे सगळे MD , HR , Account अशी महत्वाची डिपार्टमेंट्स 
तर ग्रॉउंट फ्लोअर म्हणजे रिपेरिंग , स्टॉक , सर्विस, सेल्स अशी उद्योगी आणि उपद्व्यापी खाती .
दिवाळीच्या दिवसात ह्या दोन ठिकाणी मोठी कमालीची गंमत असते , दिवाळी दोन्ही कडे जोरात येते , अगदी जोरशोर से म्हणतात ना अगदी तशी . फक्त फरक एवढा कि वर ची दिवाळी हि विशीं च्या तरुणी सारखी तर खालची चाळीशीचा संसार सारखी विशीतील तरुणी नाही का तीच आपलं १०-१५ दिवस आधी पासूनच प्लांनिंग सुरु असत , parlor कधी जायचं , तिथे काय करून घ्यायच , hair cut कोणता करायचा , त्याला सूट होईल असे ड्रेससेस online search करायचे , ते कोणा सोबत कोणता घ्यायला जायचं हे सगळं परफेक्ट planning असत तसच वर च्या फ्लोअर वर दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पासून साफ सफाई , मागच्या वेळच काही दिवाळीच उरलं आहे का म्हणजे रांगोळीचे रंग पासून कंदील , पणत्या किंवा ऑफिस बॉय ने आणलेल्या त्या मेणाच्या छोटा दिवा सुद्धा ,,,, पण दर वेळी प्रमाणे ते सापडत नाही ते नाहीच . मग नवीन आणायचं, त्यासाठी advance घेऊन मागवून घेतलं जात ,आणि तेच खाली ,चाळीशी पंचेचाळीस ची संसारी स्त्री नाही का भाजणी करायला घेते , त्यात मधूनच कोणी तरी जेवायला मागत, कुणी तरी चहा ची फर्माईश करत, अस करत करत ती चकली कर, चिवडा कर, लाडू बनव असं सुरु असत आणि हे सगळं तिला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आत पूर्ण बनवून डब्यात भरून ठेवायचं असत, अगदी अशीच धावपळ खालची दिवाळीला १० दिवस राहिलेले ... ह्यावेळेला दिवाळी महिन्याचा सुरुवातीलाच म्हणजे मागच्या महिन्याचं टारगेट नीट झालं तर दिवाळी चांगली जाईल ह्या उद्देशाने धावा धाव . commitments ,dispatch ची घाई चालेल .एकूणच दिवाळी दोन्ही ठिकाणी जोरात उंबऱ्यात येऊन पोहोचलेली ,
आता दिवाळी ला ४ च दिवस राहिलेले वरती जवळ जवळ सगळी खरेदी झालेली , मावशी नि सगळं ऑफिस धुऊन पुसून एकदम चकाचक केलेलं , आता फक्त माळा लावाच्या , आणि खाली ..... खालची धावपळ म्हणजे टारगेट ला फक्त २ दिवस धावपळ , फोनाफोनि अशी धूम वरचा फ्लोअर दिवाळीच्या २ दिवस आधी सजून एकदम तय्यार , आणि खाली आत्ता कुठे लक्षात आलेलं कि…. अरे….. कंदील नाही लावलेले , वरचे उरलेत का काही……., मागच्या वेळेला एक लाइट ची माळ आणली होती तिचे सगळे लाइट सुरु आहे का , साल….. वरच्यानी नको का खाली लक्ष द्यायला……… वरती किती छान सजवलंय ..... आपण काय *** मुलं का .... एकाच कंपनी मध्ये काम करतो ना .... अशी संभाषण
आणि ह्या खदखदीचा थोडासा सुगावा जेव्हा वरच्या मंडळा ला लागतो तेव्हा urgent बेसिस वर एक छोटा designer आणि ऑफिसबॉय खाली पाठवून थोडे आकाश दिवे , थोडं लाइटिंग करून ऑफिसबॉय पळून जातो , खाली पण एक फुलांचं मोठ्ठ तोरण लावल जात , एक संस्कार भारतीची छानशी रांगोळी काढली जाते , दोन चार पणत्या (मेणाच्या ) पेटवून धनत्रयदिवस साजरा होतो. आणि दिवाळीची ४ दिवसाची हक्काची सुट्टी सुरु होते

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

घुसमट


परी घरातली सगळ्या लहान ,,, दोन भावांच्या पाठीवर झालेली .. मुलीची हौस होतीच बापटांना ... परी झाल्यावर तर  आकाश ठेंगण होत त्याना . त्या छोट्याश्या परीला जेव्हा त्यांनी हातात घेतलं .... डोळे पाण्याने भरून आले होते .... देवाने जगातलं खूप मोठ्ठ सुख पदरात टाकलं ... परीला परी सारखंच ठेवेन ... हे तेव्हा पासूनच त्यांनी मनात पक्क ठरवलं ... गोरी गोरी ,,, गोबऱ्या गालाची , निळ्या डोळ्याची, आणि हसली कि तिच्या उजव्या गालावर सुंदर खळी अशी होती परी बापट . हो ... तीच नाव त्यांनी परीच ठेवलं ...
शाळेत जाताना दोघे भाऊ तिला तीच शाळेचं दप्तर सुद्धा उचलू देत नसत तिघेही शाळेत बरोबर जात , परीला अगदी वर्गात सोडून हि दोघे त्यांच्या वर्गात जात . शाळा सुटल्यावर पण तिला घेऊन मगच निघत .... खूप जीव होता सगळ्यांचा परी मध्ये .. आई बाबां साठी तर ते शेंडेफळ होत ... ती जे म्हणेल ते तिला ते देत
परी जशी जशी मोठी होऊ लागली तस तशी ती अजूनच सुंदर दिसायला लागली तिचे निळे डोळे , गालावरची खळी मोहून टाकायची समोरच्याला , तिच्या भावाना  आणि वडिलांना तर तिचा खूप अभिमान होता ... पण आई ला खूप काळजी वाटे ... पोर दिसायला चांगली .... लोक नाहीत ना पण तशी .... त्या रोज तिची दुष्ट कधी  , त्यावर तिचे दोन्ही भाऊ आई ला समजावत ... आम्ही आहोत ना नको काळजी करू . परीला. रूपाचा गर्व नव्हता
एकदिवस तिचे वडील ऑफिस मधून घरी आले , चहा वैगरे घेतला आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं , तिचा मोठा भाऊ घरी होता , त्यांनी त्याला जोरात आवाज दिला , आणि खाली कोसळले , ऍम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात नेई  पर्यंत खूप उशीर झाला होता , पहिलाच attach  इतका जोरात होता कि त्यात ते गेले . घरातला मोठा आधार गेला , ह्यातून सावरायला सगळ्या घराला दोन वर्ष लागली
मोठ्या भावाला जॉब होता त्यावरच आता घराची जावबदारी होती , छोटा भाऊ लास्ट इयर ला होता ,,, आणि परी फर्स्ट इयर .  
कॉलेज संपलं आणि एक  स्थळ तिच्या साठी  नात्यातल्या नि सुचवलं .. चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे कळलं, पाच वर्षांपूर्वी च त्याचे वडील वारले होते आणि तेव्हा पासूनच तो घर सांभाळत होता घरात आई आणि तो .. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होत  ... स्थळ थोडं लांबच होत पण मुलगा चांगला होता.
लग्न ठरलं ... खूप धुमधडाक्यात परी शरद बरोबर लग्न झालं ... शरद एका private कंपनी मध्ये कामाला होता . पगार हि चांगला होता त्याला , परी त्याला पाहतच आवडली होती . शरद एक चांगला मुलगा होता पण  वाईट संगती मुळे  दारूचं अतिशय व्यसन लागलं  होत ,,, हे लग्ना नंतर थोड्याच दिवसात परीला कळाल , पण चौकशी केली तेव्हा कोणी का नाही सांगितलं ? हे कायम परी च्या मनात येई ,, शरद रोज पिऊनच घरी येत , घरी त्याची आई आणि त्यांच्या शेजारीच त्याची मोठी बहीण राहत
शरद सगळा  पगार आई ला देत आणि शरद चा पगार मिळाल्या मिळाल्या आई पहिले त्यांच्या बहिणीच्या घरी सगळं सामान भरून,  बिल भरी मग उरलेल्या पैस्यात  घराचं, तस बघितलं तर तिच्या नणंदेची  परिस्थिती चांगली होती त्यांचे मिस्टर एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब ला होते , पण कायम बाहेर फिरस्ती . त्यामुळे परीची नणंद कायम परी  कडेच असे  , आता हि आलीय मग आपल्याला आता ह्या घरात येणंजाण कमी होईल , पैसे पण नाही मिळणार शिवाय परी हि दिसायला छान ,, त्यांच्या पेक्षा तर क्तितीतरी पटीने छान होति ह्या विचारामुळे आणि द्वेषा मुळे तिच्या नणंदेने सासूच्या मनात परी विषयी वाईट मन करायला सुरवात केली
तस त्यांच्या मनात सुद्धा परीमुळे आता शरद आपल्याला पैसे देईल कि नाही हि एक गोष्ट होतीच आणि तिच्या नणंदेने त्याला अजून खतपाणी घालायला सुरुवात केली होती , त्या दोघी सतत परीला कायम टोमणे मारणे , काम काढून स्वतः निघून जात , तिला त्या शेजारी सुद्धा कोणाशी बोलू देत नसत  , परी हि गोष्ट घरी सांगू शकत नव्हती , आई ला वाईट वाटेल , दोघे भाऊ भांडायला येतील ... उगा वाद कशाला ह्या मुळे परी माहेरी जात  नव्हती
भावना ह्या स्त्री पुरुष फरक करत नाहीत त्या जश्या एका स्त्री ला असतात तश्या त्या एका पुरुषाला सुद्धा असतात . परी ला शरद चा सहवास आवडत होता, तो आपल्या बरोबर असावा त्याने आपलं कौतुक करावं , जवळ घ्यावं असं तिला नेहमी वाटे , एक नवरा म्हणून तो हि  खूप चांगलं होता , जरी पिऊन घरी येत होता तरी तो परी ला कधी त्रास देत नसे  त्याला परी खूप आवडत होती, हे जस शरद च्या आई ला आणि बहिणीला कळलं तस त्या रोज काही हि कारणावरून परिशी भांडू लागल्या . शरद तर नेहमी नशेतच घरी येत असे त्यामुळे परी तिची बाजू कोणा पुढे मांडणार .. माहेरी सांगता येत नव्हतं कि शरद जवळ मन मोकळं करता येत नव्हतं . तिच्या सासू आणि नणंदेचा राग इतका पराकोटीला गेला कि त्या आता शरद आणि परी मध्ये भांडण लावू लागल्या , इतकंच काय कि त्या दोघांना कसलाच एकांत मिळू देत नव्हत्या , जर ह्यांना चुकून एखाद मुलं झालच तर परत पैस्यात वाटा होईल ह्या हेतूने तिची नणंद कायम तिचा मुलगा शरद आणि परी च्या मध्ये पाठवत , रात्री सुद्धा त्याला शरद आणि परी जवळ झोपवी  लग्ना नंतर सुख तिच्या पासून पळूनच गेलं,  ना कुठले सणवार ना कुठली हौस ..  शरद आणि परी मध्ये सुखाचे असे फक्त एकच क्षण होता  ,लग्नाच्या रात्रीचा त्या नंतर ती दोघे कधीच एकत्र आली नाही ... किंवा येऊ दिली नाहीत  . लग्नाचं पाहिलं वर्ष संपत ना संपत तोच एक दिवस शरद घरी  खाली कोसळून बेशुद्ध झाला , दवाखान्यात ऍडमिट केल्यावर कळलं कि त्याच्या  लिव्हर ने आता काम कारण बंद केलाय आणि आता जर त्याने पिणं सोडलं नाही तर डॉक्टर सुद्धा काही करू शकणार नाही .
हे ऐकून सुद्धा शरद च्या आई आणि बहिणीचं मन कळवळल नाही त्या दिवशी सुद्धा त्या परिशी खूप भांडल्या ,शरद ला दवाखान्यातून घरी आणलं , पण त्याची सवय  काही सुटली नाही घरी ठेवलेली बाटली घेऊन तो परत सुरु झाला ... आणि व्हायचं तेच झाल
एका वर्षात शरद गेला . परी वर तर आभाळच कोसळलं ... हा कधी तरी सुधरेल ,, आपलं सगळं नीट होईल ह्या आशेवर ती सगळं सहन करत होती , शक्य होईल तितकं शरद ला दारू पासून लांब ठेवण्या चा प्रयत्न करी पण ... जे नको तेच झालं,
 हिच्या मुळेच माझा मुलगा गेला ... पांढऱ्या पायाची अवदसा म्हणून त्याच्या आई ने परीलाच दोषी केलं
शरद गेल्याच कळताच परी चे भाऊ आणि आई तिच्या घरी आले तेव्हा सुद्धा तिच्या सासूने आणि नणंदेने  त्यांच्याशी खूप भांडण केल , ह्या दोघी असं का बोलता हे त्यांना काळेच ना ... परी ने त्यांना कधीच काही सांगितलं नव्हतं .
दहाव्या दिवशी हिला इथून घेऊन जा तुमच्या बरोबर मी नाही सांभाळणार हिला असं तिच्या सासूने तिच्या भावा ना सांगितलं
.. ह्या असं का बोलतात हे त्या दिवशी परी ने सगळं अगदी पहिल्या दिवसा पासूनच सांगितलं, शेजाऱ्यांनी तिच्या भावांना सांगतील कि जेव्हा तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेला चौकशी करायला आलात तेव्हा आदल्या दिवशी  शरद च्या आई ने आणि बहिणीने सगळ्यांना भांडून धमकावलं होत कि शरद बद्दल सगळं चांगलाच सांगायचं  . ऐकल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटलं आणि राग पण आला . तू आम्हाला का नाही सांगितलं ... पण आता बोलून काही उपयोग नव्हता .
परि च्या भावानी तिच्या सासूला ठणकावून सांगितलं आमची बहीण काही आम्हाला ओझं नाही ... सगळं आयुष्य आम्ही तिला सांभाळू पण ह्या पुढे तुमचा आमचा संबंध संपला कुठल्या हि प्रकारे केव्हा हि परी ला कॉन्टॅक्ट करायचा नाही
आणि ते परी ला घेऊन घरी आले.
दोन वर्ष परी भांबावलेल्या अवस्थेत होती , ना कोणाशी बोलत ना  धड खात पित ... आपण परीच नुकसान केलं हि भावना तिच्या भावां वाटे .
आता तीच परत लग्न नाही करायचं आपण तिला सांभाळू परत तिला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं . तिला थोडं मोकळं वाटेल , थोडं बाहेर पडली तर विचार बदलतील मोकळी होईल,  म्हणून घराजवळच एका कंपनी मध्ये ती जॉब करू लागली . भावांची लग्न झाली , त्यांना मुलं झाली, त्या मुलां मध्ये  परी रमली पण ती शरद ला विसरू नाही शकली
तो एका दिवसाचा  त्याचा सहवास ती कायम मनात साठवून होती तिने कितीही ती आठवण दडपण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्यात हवं तस यश येत नसे ,  भावना दाबून ठेवणं तिच्या साठी कठीण होत , सणावाराला , लग्न कार्यात तिच्या भावजाया , मैत्रिणी नटून थटून मुलां सोबत मिरवत , तेव्हा परी ला हि उणीव जास्त जाणवत . रमणीचे जीवन म्हणजेच  रती आणि वत्सलता ! ह्या दोन्ही जीवन प्रवृती तिच्या   जीवनातून वजा झाल्या होत्या
मनातल्या मनात ती कुढत होती .

Gauri Ekbote


सोमवार, २५ जून, २०१८

मन

आतुरलेले मन
आणि आसुसलेली धरा....

भेटीची आर्तता 
अन अंतराचा दुरावा

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

तत्व : एक वास्तविक स्थिति


स्त्री तत्त्व आणि पुरुष तत्त्व .... ह्याला gender दृष्ट्या न बघता थोडा  विचार केला तर जाणवलं कि हे तत्त्व प्रत्येकात असत . पुरुष हे हळवे , काळजी घेणारे आणि कणखर असतात , तसेच एक स्त्री सुद्धा कणखर ,परिस्थितीशी खंबीर तेने लढा देणारी आणि तेवढीच हळवी असते. मुळात हि तत्त्व आहेत ती सगळी कडे असतात अगदी पशु पक्षी झाड वेलीत सुद्धा , प्रत्येकात हे  असतंच आणि म्हणूनच ती व्यक्ती माणूस म्हणून जगत असते , नुसतं एक तत्त्व घेऊन आपण जगू शकतो पण त्याला खऱ्या अर्थाने जगणं नाही म्हणू शकत त्याला जेव्हा दुसऱ्या तत्त्वचि साथ मिळते तेव्हा तो पुरुष होतो , म्हणजे माणूस होतो .
मुळात जर अगदीच स्पेसिफाई करायचं तर आपला मेंदू हा विचार करतो , तुलनात्मक अभ्यास करतो निर्णय घेतो हे पुरुष तत्त्व आणि आपलं मन हे भावनिकता दर्शवत ते प्रेम , आपुलकी , राग व्देष , अश्या सगळ्या भावना त्याला समजतात , परिस्थिती च गांभीर्य हे जस मनाला जाणवत तर ह्या परिस्थिती तुन मार्ग कसा काढायचा हा विचार मेंदू करतो .
पण आपण ह्या गोष्टी कडे तेवढ्या विस्तारात्मक दृष्टीने न पाहता त्याला संकुचित बनवतो आणि तेच बरोबर हे धरून चालतो . आणि ह्या विचारातूनच पुरुषप्रधान जग स्त्री प्रधान जग , नारी शक्ती  निर्माण होत आणि वाद वाढत जातात . माणसाला माणूस म्हणून बघितलं तर ह्या सगळ्याची काहीच गरज नाही. जसे एका स्त्री ला जगताना काही अडचणी येतात काही परिस्थिती ला समोर जावं लागत तसेच एका पुरुषाला सुद्धा कठीण परिस्थितीच्या विळख्या ला सोडवावे च लागते . स्त्री आणि पुरुष ,,,,,, ह्यात बऱ्याचदा स्त्रीला झुकत माप असत ह्याची बरीच कारण पण आहे .ह्या झुकत्या मापामुळे कधीकधी एखादा चांगला , हुशार , हळवा पुरुष दाबला जाऊ शकतो , त्याच पूर्ण आयुष्यच बदलू शकत , त्याच्या साठी होत्याच नव्हतं सुद्धा होऊ शकत ह्याचा कुणी विचार करू शकत का ? ... कोणत्या तरी मूवी मध्ये ऐकलेलं एक संभाषण आठवत कि दर वेळेला स्त्री च बरोबर असते असं नाही , दोन्ही बाजू चेक केल्या पाहिजे . एखादा पुरुष जर स्त्री ला मारत असेल तर आपण म्हणतो कि निर्दयी आहे , आणि एखादी स्त्री जर पुरुषाला मारत असेल तर म्हणतो कि नक्की ह्यानेच काहीतरी केलं असेल . हे वैश्विक आहे सगळे ह्याच प्रकारे विचार करतात आणि आपली मत बनवतात , पण असं नसत पुरुष सुद्धा बरोबर असू शकतो ,
असच काहीस घडलं माझा एक मित्र अभि बरोबर , आमच्या ग्रुप मधला अभि म्हणजे एकदम happy-go-lucky ,बोलण्या बाबत खुप बिनधास्त , कुठलाच विचार करायचा नाही , जे समोर येईल तस स्वीकारायचं अश्या स्वभावाचा , कुठलीही भीड़ भाड़ नाही, तेव्हढाच तो मनाने साधा , सरळ  अणि निर्मळ , आई वडिलांचा एकुलता एक त्यामुळे लडात वाढलेला पण लाड डोईजड नव्हते , तेव्हढाच समंजस पण होता. कॉलेज च शेवटच वर्ष आम्ही खूप मस्त एन्जॉय केल , आम्हाला सगळ्यांना campus interview मधून छान नौकरी पण लागली।  , अभी सुद्धा एका लिमिटेड कंपनी  ध्ये  Purchase Assistant म्हणून join झाला। सुरुवातीला छान चार आकडी पगार होता , त्याचे बाबा खूप खुश होते कि मुलगा कमावता झाला , वर्ष खुप मस्त गेल सुट्टी च्या दिवशी आम्ही सगळे जमायचो कॉलेज ग्राउंड वर , मस्त धमाल यायची। मज्जा असायची . त्या दिवशी असच जमलो असताना अभिला फोन आला , आई ला अचानक छातीति दुखायला लागल म्हणून लगेच दवाखान्यात नेल , तो माइल्ड अटॅक होता।  योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाल्या मुळे , धोका टळला. बइपास सर्जरी  झाल्यावर त्या घरी आल्या ,
आता त्यानी एकच गोष्ट धरून ठेवली ती म्हणजे अभी च लग्न , सुरुवातीला अभी नव्हता तयार, काकुंच्या तब्बेति कड़े बघून तो तयार झाला.   तो तयार आहे हे बघून लगेच घाइत काकुनी मुलगी बघितली अणि लग्न लावल  , त्यांचा उद्देश्य एकच होता की माझ आता काही खर नाहीं , आहे तोपर्यंत अभिच लग्न अणि मुल बघितली कि मग जे होईल ते होवो.
मुलगी मुंबई ची दिसायला अतिशय सुन्दर , अभी पेक्षा जास्त शिकलेली होती , अभिला तर दीपिका पहिल्या क्षणीच आवडली , एरवी कुठल्याही मुली कडे न बघणारा अभी दीपिका कडे पाहतच होता , आम्हाला वाटल की ती नाही म्हणेल पण तिच्याकडून पण होकार आला , अणि मस्त धूम धडाक्यात लग्न झाल.
अभी अणि दीपिका सुरुवातीच पहिल वर्ष सणवार करत संपल. ह्या वर्षात अभी ला कायम जाणवत होत कि दीपिका आपल्यात असून नसल्या सारखीच , तो कितीदा तरी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण करत होता पण ती विषय टाळायची , तिने ह्या एका वर्षात एकदाही अभिला तिच्या जवळ नाही येऊ दिल , अभिला थोड ते विचित्र वाटल पण कदचीत सगळ नवीन असल्यामुळे आणि arrange marrange असल्यामुळे ती अशी लाजल्या सारखी असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केल , तिने सगळ्यात मिसळाव अस अभिला कायम वाटे पण दीपिका कायम अलिप्त राहत होती .
ऑफिस मधे अभी च्या responsibility वाढ झाली होती तो आता सीनियर परचेस मैनेजर झाला होता।  दीपिका मात्र कुठे तरी नाराज होती तिला अभिच बिनधास्त, मनमोकळ  वागण नव्हत आवडत ,   दीपिकाला, ती जस म्हणेल तस वागणारा ,तीच ऐकणारा नवरा हवा होता अभिला दीपिका आवडत होती , आणि  आई बाबां वर पण त्याच तेवढच प्रेम होत।  दीपिकाला त्याच अणि त्याच्या आई च एकमेकांशी बोलसुद्धा पसंद नव्हत , तिच्या मता प्रमाणे  आई ने पाहिले तिला सांगयच, मग ती अभी ला सांगेल , जमेल तस - जमेल तेव्हा , आठवेल तेव्हा , ह्या पद्धतीने जर नाहीं झाल अणि आई जर डायरेक्ट अभीशी बोलली तर मात्र दीपिकाचा  जाम संताप होत असे,  अभी  आईचच ऐकतो , असा ती कंगवा करि , शेजारीपाजारी जावून सगळ्यांना उलट सुलट सांगे , पण सगळ्यांना आई चा स्वभाव माहित होता .... आई अभी सारखीच मनमिळाऊ आणि शांत होती , त्यामुळे कुणी तीच बोलन मनावर नव्हत घेत ,
दीपिका मुंबई university मधून MBA  केलेल , पण नौकरी करायची तिची अजिबात इच्छा नव्हती ,  ती घर कामात ही मदत नव्हती करत, आई काम करून दमुन जात असे , दीपिकाला टीवी वरच्या वेग वेगळ्या सेरिअल्स अणि मूवी बघण्याआवड होती , अणि संध्याकाळी शॉपिंग। शनिवार रविवार outing अस दीपिका चा क्रम असे आणि ह्यात काही कमी पडल किंवा जर एखादे वेळी अभी नाही बोलला तर भांडण , एके दिवशी असच month end आणि दीपिकाला गोवा जायचं होत ती अभी कडे पैसे मागत होती आणि तू हि चल म्हणून मागे लागलेली , आई ची तब्बेत जरा आज खराब वाटत होती म्हणून अभी सुटी काढून घरीच होता , आदल्या रात्री पासून दीपिका त्याच्या मागे लागली होती चलच म्हणून , अभी ची अजिबात कुठे जायची इच्छा नव्हती , कस तरी त्याने तिला पैसे दिले ते घेऊन घरातील परिस्थिती न बघता दीपिका गोवा तिच्या मित्र मैत्रिणीन बरोबर निघून गेली , आई ला खूप वाईट वाटत होत , तीला अभी ची आता काळजी वाटायला लागली होती , लग्नाला दोन अडीच वर्ष झाली आणि पाळणा हलायची कुठलीच चिन्ह दिसत नव्हती उलट वाद आणि भांडण वाढतच होत , शेवटी त्या दिवशी आई ने ह्यावर एक उपाय म्हणून अभी ला दुसर घर घेऊन रहा म्हणून सुचवलं कदाचित त्यामुळे ती बदलेल .... अभी ला ते मान्य नव्हत, पण बाबा हि ह्या गोष्टीला सहमत होते म्हणून त्याच area मध्ये ३-४ बिल्डींग सोडून एक flat अभिने विकत घेतला ह्यात दीपिका च्या आई वडिलांनी सुद्धा काही पैस्याचा  share दिला आणि दीपिका अभी तिथे राहू लागले , सुरुवातीला दीपिका खुश होती पण आठ दिवसातच ती परत पहिल्या सारखी झाली आता तर ती खूपच बिनधास्त झाली घरात खायला हि काही करायची नाही कि अभी कडे लक्ष द्यायची नाही , संध्याकाळी अभी दीपिकाला लपून आई बाबांकडून जेऊन घरी जात होता. असेच २-३ महिने गेले , वैवाहिक सुख अस अभी ला माहितच नव्हत , त्याच्या बरोबर लग्न झालेल्या आमच्या एका मित्राला एक मुलगा आणि एक मुलगी होती , त्यांना बघिल्यावर अभिला मनातून खूप वाटे आपल पण मुल असत तर आज ते एवढ असत , मनातून तो खूप कुढत होता . दीपिका मात्र तिच्या life मध्ये गुंग होती तिला अभी कळतच नव्हता ,
एके दिवशी संध्याकाळी बाहेर भटकून येताना दीपिकाने अभी ला  आई कडून निघताना पाहिलं , तू तिथे का गेला होता ,म्हणून विचारू लागली अभी ने काही उत्तर च दिल नाही मग दीपिकाला अजूनच जोर वाढला , ती रात्रभर अभी शी भांडत होती , आज जे तिला हव होत ते ती बोलून गेली ते म्हणजे divorse , दिपिकला अभी बरोबर आता नव्हत राहायचं तिला divors हवा होता , तिला अजून मोकळीक हवी होती , गळ्यातल् मंगळसूत्र तिला आता एक लोढण , वाटू लागल होत , तिला एक मोकळ , कुठलीही आडकाठी नसलेलं , कुठलीही जवाबदारी नसलेले , कुणी विचारणार नाही अस life हव होत , अभी , अभीच घर त्याच नाव तिच्या नावापुढे जोडन त्याच आडनाव हि तिला आता जड जात होत , तिला तिच्या आई बाबा बरोबर देखील नव्हत राहायचं , तिच्या आई ने तिला खुपदा समजून सांगितल पण दीपिका आता कुणाचही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती , तिला तीच आयुष्य तिच्या पद्धतीने जगायचं होत आणि त्या साठी तिला divorse हवा होता .
सगळ्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण दीपिका समजाऊन घेण्याच्या मनःस्थिती तच नव्हती तिला तीच च खर करायचं होत , अभी पण आता कंटाळा होता शेवटी त्यानेच निर्णय घेतला आणि दीपिकाला divorse देऊन मोकळ केल . खर बघता जेव्हा त्याने दीपिकाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता पण ते एकतर्फी च राहील , त्याच हळुवार प्रेम दीपिकाला कळलच नाही .
ज्या दिवशी divorse वर सह्या झाल्या त्या दिवशी दीपिकाने पुण्यातला तो flat जो अभी ने वेगळा घेतला होता तो स्वतच्या नावावर करून घेतला , लग्नात तिच्या आई बाबांनी घातलेले आणि अभी च्या आई ने दिलेले सर्व दागिने तिने तिच्या काडे घेतले ,लग्नात मिळालेले सगळ तिने अभी कडून मागून घेतल .
आता अभी आई बाबां बरोबर राहत होता सुरुवातीचे ३-४ महिने त्याला सावरण्यात च गेले . त्याने खूप मनापासून दीपिकावर प्रेम केल होत आणि ती सगळ विसरून तो flat विकून निघून गेली होती .
आई ला वाईट वाटत होत कि आपण खूप घाई केली अभिच्या लग्नाची , पोराच नुकसान झाल ... ह्याच मनःस्थिती त्या होत्या . पण २ वर्ष नंतर ते सावरले . .
आता अभी व्यवस्थित जॉब ला जातो , आमच्यात येतो मनसोक्त गप्पा मारतो. पण लग्न ह्या गोष्टी वरून त्याचा कायमचा विश्वास उडालाय .