mazionjal

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

संघर्ष



संघर्ष
काही स्त्रीयांच्या बाबतीत आयुष्य म्हणजे एक तप च असत , संघर्षमय जीवन काय ते ह्या मुलीन कडे पाहून कळत ... हो मुली च , जरी त्या वयाने मोठ्या झाल्या तरी,  कारण एका तरुण रक्तासारख्या त्या कायम जोमाने ,खंबीरतेने , न डगमगता आलेल्या परिस्थितीला, आव्हाहनाला समोरया जातात , आणि कितीहि संकट आली तरी त्यातून मार्ग काढून बाहेर पडतात , सोशिकता , संयम , खंबीरता , दृढ विश्वास स्वतःवर आणि त्या विधात्यावर ,  हे देऊनच देव सर्वाना पृथ्वीवर पाठवतो , म्हणूनच  त्या ह्या परिस्थिती ला हसत मुखाने हाताळतात . आणि प्रत्येक स्त्री मध्ये हे सगळे गुणविशेष असतातच .
सरिता , नावा प्रमाणेच निर्मल, निखळ , सगळ्यांच होत तस हीच सुधा योग्य वयात लग्न झाल. आई वडील चांगला जावाई मिळाला म्हणून खुश होते .  सुखी संसारची स्वप्न सरिता आणि सारंग ने पाहायला सुरुवात केली. सुरूवातीच वर्ष सणवार ह्यात संपल , नंतर ती दोघ खूप छान रमली संसारात . त्यांना एक सुन्दर , गोंडस मुलगी झाली , आणि तिच्यामुळे त्याचं घरच भरल , खूप छान चालल होत
पण नियतीला हे मान्य नव्हत , आणि एक दिवस सारंग घरी येताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि काळाने घात केला ,सारंग जागीच गेला , सरिता साठी हे दुःख म्हणजे इतका मोठा धक्का होता कि ती मान्यच करायला तयार नव्हती कि सारंग नाही , पण मुली कडे बघून ती सावरली , आता आपल्यालाच मुली कडे बघायचं , तिच्या भविष्याबद्दल आपण  आणि सारंग ने जे स्वप्न बघितल होत आता ते आपणच पूर्ण करायचं खूप शिकवायचं होत सारंग ला तिला. तिला मोठ करायचं हे एकच उद्दिष्ट आता सरिता च होत . जेम तें ४ मध्ये होती अवनी सारंग वारला तेव्हा आणि तेव्हापासूनच सरिता तिच्या साठी तिचे बाबा आणि आई.

माधवी ,,, बोलायला अतिशय मधाळ, गोड मुलगी. तिने तीच BSC computer मध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केला आणि MSC computer ला Admission घेतली . माधवीच्या आई वडिलांना तिचा खूप अभिमान होता . वडिलांची तर ती खूप लाडकी होती , त्यांना माधवी हि एकच आपत्य .हिलाच खूप शिकवायचं मोठ करायचं , तिच्या पायावर उभ करायचं हे येवढ त्या दोघांच स्वप्न . पहिल वर्ष खूप छान गेल पण दुसया वर्षी हार्ट attack ने तिचे वडील वारले .आई housewife. नातलगानी आता हि जवाबदारी आपल्यावर येईल म्हणून येण कमी केल , माधवीला जॉब शोधण  अपरिहार्य होत , पण नशिबाची साथ तिला एका चांगल्या private कंपनी मध्ये नौकरी मिळाली शिवाय बाहेरून तिने पुढच्या शिक्षणा साठी फॉर्म भरला, तिने स्वतःला आणि आई ला ह्या धक्क्यातून सावरल. आणि खंबीरपणे जवाबदारी उचलली. आज तिने MSC computer पूर्ण केलय, आणि एका मोठ्या MNC मध्ये ती नौकरी करतीय .

मेघना लाघवी मुलगी ,नाईक कुटुंबात दोन मुलांन नंतर झालेली. एकुलती एक म्हणून खूप लाडात वाढलेली . तीच BA झाल आणि एक लांबच पण चांगल स्थळ आल. जवळच्याच एका ने सुचवलेल. भावांनी आणि वडिलांनी जाऊन शेजारी पाजारी चौकशी केली मुलगा माधव चांगला आहे म्हणून कळाल . भरपूर हुंडा देऊन आणि धूम धडाक्यात, सालंकृत लग्न लाऊन दिल . लग्ना नंतरचे सणावाराचे दिवस संपले आणि हळू हळू त्या मुलाचे आणि त्याच्या घरच्यांचे एक एक नखरे सुरु झाले .
माहेरी साधी भाजी चीराची सवय नसलेली मेघना रोज लवकर उठून सर्व झाड झुड आवरून , सकाळचा नाश्ता , दुपारच जेवण , भांडी धुण, करू लागली , तिची नणंद गावातच राहत होती , ती सुधा रोज घरी येऊन राहू लागली , तिच्या बरोबर तिचा नवरा, दोन मुल पण असत , मेघना हे सुधा हसत करत होती पण त्या नंतर तिच्या सासरच्या कडून पैस्याची मागणी होऊ लागली , घरात वाशिंग मशीन घ्यायचं माहेरून पैसे आण , भाज्या खराब होतात , घरातल फ्रीज खराब झालय नवीन घ्यायच , देतील का तुझे भाऊ आणि वडील पैसे , अश्या प्रकारे तिचा छळ सुरु झाला .
मेघना आणि माधव कधी एकत्र आलेच नाही , त्यांची मन कधी जुळलीच नाही . खरी परिस्थिती वेगळीच होती , माधवला दारूच व्यसन होत हे लग्ना नंतर थोड्याच दिवसात मेघनाला  कळाल . पण ते तिने माहेरी नाही कळवलं , जेव्हा मेघनाचे  भाऊ आणि वडील लग्ना आधी  चौकशी साठी येणार होते तेव्हा आधीच माधवच्या आईने शेजारी सांगून ठेवल होत . काही दिवसात मेघनाला हे हि कळाल कि माधवच्या व्यसनाने आता त्याच शरीर पूर्ण खंगून टाकल आहे , एक दिवस त्याला दवाखान्यात admit कराव लागल आणि त्या नंतर तो घरी आलाच नाही .
जेम तें दीड वर्षाचा संसार त्या दोघांचा . नंतर मात्र मेघना च्या दोन्ही भावांनी तिला घरी आणल आणि परत त्या घरात कधी तिला नाही पाठवलं , तिच्या सासूने खूप फोन केले पण खरी परिस्थिती कळल्यामुळे त्यांनी तिला कधीच परत पाठवल नाही .त्यांनी तिला B.Ed केल आणि एका शाळेत आज मेघना शिक्षिका म्हणून आहे .

नयना अतिशय सुंदर , ती १२ वी शिकत असतानाच तिची आई वारली . वडिलान साठी हा धक्का सहन करण्या सारखा नव्हता , त्यांना त्यात एक हार्ट attack येऊन गेला . कस तरी ते तिच्या साठी जॉब करत . त्यांनी नयनाला शिकवलं MCA केल. चागल्या कंपनी मध्ये तीला नौकरी मिळाली .
वडिलांनी तीच लग्न एका चागल्या घरात लाऊन दिल मुलगा समीर सुद्धा एक software developer चांगल्या कंपनी मध्ये नौकरीला . त्याच्या घरात आई वडील , मोठा भाऊ वाहिनी .  कसलीच कमी नव्हती , पण नयना आणि समीर च्या लग्ना नंतर समीर च्या मोठ्या भावाने इस्टेटी साठी  भांडण सुरु केल आणि घरात वाटणी मागू लागला येवढे दिवस प्रेमाने मोठ केलेलं घर आता वाटल जाईल , दोन तुकडे होतील , एकत्र कुटुंबच स्वप्न बघितलेले समीर चे आई वडील ह्या वागण्या मुळे धास्तावले , शेवटी भांडण खूप टोकाला गेल, वाहिनी वाटणी होत नाही म्हणून माहेरी निघून गेल्या आपल्या मुळे आपल्या मुलाचा संसार मोडू नये म्हणून त्यांच्या घराची वाटणी झाली, सर्व गोष्टी सम समान वाटल्या गेल्या , मोठ्या भावाने आई वडिलांची जवाबदारी समीर वर टाकली  आणि स्वतःच्यावाटेच सर्व विकून तो  गाव सोडून निघून गेला , आई बाबांसाठी हा खूप मोठ्ठा धक्का होता , पण  नयना ने त्यांना सावरल , सांभाळून घेतल . मला तुमची मुलगीच समजा म्हणून तिने त्यांना दोघांना आधार दिला, आज ती आई वडिलान प्रमाणे त्यांची काळजी घेते. मधून मधून तिचे वडील पण त्यांच्या कडे येतात . नयना आणि समीर ला दोन जुळी मुल आहे ते आजी आजोबा बरोबर खूप छान राहतात .
  

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

Humalien


हि गोष्ट सुरु होते  जुलै १९६९ , नासा ने पाठवलेल्या Apollo ११ ह्या spaceflight च sucessfull landing नंतर ह्या space शिप मध्ये नील आर्मस्ट्रांग आणि ऐडविन "बज़" ऐल्ड्रिन. हे पहिले असे मानव आहेत जे चंद्रावर जाऊन आलेले. परत येताना त्यांनी तिथली माती आणि काही खडकांचे नमुने आणले . अस म्हणतात कि नील ने तिथे काही वस्तू ठेवल्या एक सोनेरी पान आणि एक recored संदेश ज्यात मानवच्या अस्तित्वा बद्दल माहिती होती . आणि ते तिथून निघाले .
पृथ्वीय वेळेच्या नुसार ऑगस्ट १९६९ चंद्रावर पहिलेच असलेल्या अलिएन spece center ला ते पान आणि तो संदेश मिळाला . त्यांच्याच एका निरीक्षण करणाऱ्या विमानाला ते सापडलं , मानवाचं चंद्रावर येण आणि काही नमुने घेऊन जाण  हे त्यांना आधीच माहित होत , even त्यांच्या एका यंत्राने त्याचं हे सर्व mission  कॅमेरा मध्ये रेकॉडे पण केल होत . ते कसे उतरले, किती लोक चंद्रावर उतरले , कोण चंद्राच्या orbit मध्ये घिरट्या घालतं होत  , परत कसे गेले, उतरल्यावर काय केल , काय बोलले , काय सोडून गेले , त्यांचा उद्देश काय होता , हे सर्व त्यांनी रेकॉर्ड केल .
ह्या massage मिळाल्यावर लगेचच चंद्रावर एक मीटिंग बोलावण्यात आली , Mars वरून महत्वाचे  VIP लोक चंद्रावर बोलावण्यात आले . कारण त्यांच्या दृष्टीने चंद्र हीच सध्यासाठी सगळ्यत सुरक्षित अशी जागा होती.  खूप विचार मंथना नंतर ठरवण्यात आले कि पृथ्वी वरची मानव हि आपल्या दृष्टीने योग्य पर्याय आहे , मानव जात चंद्रा वर पाउल ठेऊन जाते म्हणजे त्यांनी बौद्धिक दृष्ट्या आपल्या basic level ला पार केल आहे. ते आपल्याला ह्या संकटातून वाचवतील, मदत करतील ,आणि ते आपल्या बाबतीत खूप उस्तुक हि आहेत , हे आपण केल्यालेल्या त्यांच्या अभ्यासावरून लक्षात येते तर आपण स्वतः हून त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी बोलन करून करार करायचा. आता ह्या शिवाय आपल्या कडे पर्याय नाही. आपल्या ग्रहीय जातीच अस्तित्व टिकवायच असेल तर आता पृथ्वी ची मदत आपल्याला घ्यावीच लागेल , आता लांबून त्याचं निरक्षण करण बंद करून direct संवाद साधायला हवा अस ह्या मीटिंग मध्ये ठरवण्यात आल .
इकडे पृथ्वीवर आणलेल्या नमुन्याची चाचणी सुरु झाली होती , आपल mission sucessful झाल ह्याची party सुरु होती . नील आणि ऐल्ड्रीन च्या मुलाखती सुरु होत्या . आणि अशाच एका संध्याकाळी नासा center ला एक संदेश चंद्र्वरून पाठवण्यात आला ,त्यात फक्त “हेल्प ...need you ...” असाच होत , आणि विशेष म्हणजे हा massage इंग्लिश मध्ये होता .
नासा ने त्या massage ला reply पाठवला , “we are ready to help”,  हा massage मिळताच चंद्रावर सगळ्यांना आनंद झाला , एक आशेचा किरण दिसल्या सारख त्यांना जाणवल , आपण जगू हि एक आशा निर्माण झाली आणि लगेचच पुढची भेटण्याची तयारी दाखून आम्हीच तुम्हाला भेटतो म्हणून कळवण्यात आल .
पृथ्वी वरचे तर उस्तुक होतेच , अलिएन शिप पृथ्वीवर वाळवंटात land झाल आणि तिथेच मीटिंग ठरली .
त्यांनी Mars वरची सध्याची त्यांची परिस्थिती सांगितली , आम्हीच निर्माण केलेले जैविकअस्त्र आम्हालाच घातक ठरले . आमच्या  इथे खूप मोठ्ठ युद्ध सुरु आहे , त्यात जैविक हत्यार ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे , कुणीच कोणच ऐकायच्या परिस्थिती नाही , ह्या युद्धा चा परिणाम म्हणजे आमची नवी पिढी हि अपंग , आजारी होत आहे , आमच आयुष्यमान पण कमी झालय , सगळी कडे आजार वाढतच आहेत .तुम्ही जे आमची काही फोटो पाहिलेत ते सगळे ह्या जैविक अस्त्राचे शिकार आहेत , आम्ही दिसायला अगदी तुमच्या सारखेच आहोत पण ह्या अस्त्राचा परिणाम ... हे आम्ही आमच्या लोकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती लोक ऐकण्या बाहेर गेलीत .Mars ग्रह सोडून दुसरी कडे जाण  हा एकच पर्याय आमच्या पुढे आहे म्हणून आम्ही राहण्याची वेगळी जागा आणि आमची नवी सुदृढ पिठी निर्माण करण्यासाठी पृथ्वीच्या चंद्राची निवड केली पण ह्यात आम्हाला तुमची मदत व्हावी अशी अपेक्षा ठेऊन तुमच्याशी स्वतः संपर्क साधला.
पृथ्वीय लोकांनी त्याचं म्हणन ऐकल , आणि मदत करण्याची तयरी पण दाखवली , शिवाय तुम्ही पृथ्वीवर या म्हणून पण सुचवलं , पण त्यांच्या म्हणण्या नुसार पृथ्वी वर राहाण हे त्यांना जमणार नव्हत , तुम्ही पृथ्वीवासी खूप लवकर दुसर्या वातावरणात सामाऊन जातात , खूप लवकर परिस्थिती नुसार बदल घडून आणतात , पण आम्ह्च्या लोकांना ते शक्य नाही आम्ही एकदा तुम्हाला न सांगता काही आमची लोक तुमच्या इथे प्रस्थापित करून पहिली पण ती रुळू नाही शकली ,थोड्याच वेळात त्यांना आम्हाला परत बोलावाव लागल , त्या साठी आम्हाला एक वेगळा ग्रहच शोधावा लागेल आणि तो म्हणजे चंद्र .
पण मग तुम्ही पृथ्वी वासियांन कडून कोणती मदत मागता हे नाही कळाल आम्हाला ?
“आम्हाला एक करार करायचा आहे तुमच्याशी “.  “करार ? कोणता करार?” “सांगतो आम्ही Mars वासी बुद्धीने जरी तुमच्या पेक्षा चौपट असलोत तरी सध्या आम्ही शारीरिक दृश्य कमकुवत झालो आहोत आम्हाला तुमच्या लोकांच्या मदतीने आमची पुढची पिढी भक्कम आणि सुदृढ करायची आहे , त्या साठी तुमच्या ग्रहावरचे लोक आमच्या ग्रहावरच्या लोकां बरोबर राहून त्यांचा संक्रमणातून एक नवी पिढी तयार करतील तरच ते शक्य आहे. त्यांना आमच्या आजाराचा कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ आणि तुम्ही आम्हाला ती सुदृढ पिढी द्यावी “
तस बघितल तर खूप सोप्पा उपाय होता हा पण ह्यात हि एक अट होती  Mars वरील स्री किवा पुरुष हे आनंदाने जर मनुष्य स्त्री किवा पुरुषाला स्वीकारतील तर च नवनिर्मिती होईल नाही तर नाही , ह्या साठी त्यांनि एकमेकांना  आकर्षित करण, एक विश्वास निर्माण कारण गरजेच , आणि त्या साठी एकत्र राहण गरजेच आहे .
ह्यावर खूप विचार केल्यावर एक निष्कर्ष काढण्यात आला कि Mars काही सुदृढ उरलेले लोक, काही दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवतील , त्यांना ह्या करार बद्दल काही सांगण्यात येणार नाही आणि तसच पृथ्वी वासियांनी पण गोपनीयता ठेवावी , त्यांच्यातून ज्यांची मन जुळतील त्यांना पुढे चंद्रावर राहण्या योग्य वातावरण करून शिफ्ट करण्यात येईल . आणि तेव्हाच सत्य सांगण्यात येईल .”
ह्या बदल्यात Mars पृथ्वी वासियांना बौद्धिक क्षमता कशी वाढवता येईल ह्याचे तंत्र देइल शिवाय नवीन तयार होणारा ग्रह म्हणजे त्यांची नवी पिढी हि पृथ्वी शी मैत्रीचे संबंध ठेवेल आणि मदत देखील करेल आणि नवीन शोधात सुद्धा Mars सर्व प्रकारे पृथ्वी ला मदत करत राहील. शिवाय Mars वरील वातावरण परत पूर्ववत झाल कि पृथ्वी वासी हव तेव्हा येऊ जाऊ शकतील .त्यासाठी सर्व योग्य ती दळणवळण हे Mars बघेल .
सर्व अटी मान्य होतात , आणि mars वरून काही लोक पृथ्वी वर येतात त्यात निओ पण असते . निओ अतिशय सुंदर आणि धाडसी मुलगी . सुंदर म्हणजे पृथ्वीच्या भाषेत एकदम अप्सराच , अलीएन असे पण असतात हा  तिला बघितल्यावर पडणारा प्रश्न , सावळी  तुकतुकीत कांती , लांब भूरे केस , नाजूक जिवणी , कामनीय बांधा , पाणेदार टप्पोरे तपकिरी डोळे, सुमधुर आवाज , लांबसडक नाजूक बोट , आणि कमालीची धाडसी वृत्ती , पृथ्वीच्या एखाद्या लावण्यवती सारखीच होती निओ , बघितल्यावर कोणीही तिच्या प्रेमातच पडेल आणि लक्षात पण येणार नाही कि हि परग्रहीय आहे . ह्या आधी सुद्धा  एका research साठी Mars ने तिला पृथ्वीवर पाठवले होते ,पण तो कालावधी खूप कमी होता , आता हि एका research साठी आणि Observation साठी आपण येथे पाठवण्यात आलेलो आहोत असच तीला सांगण्यात आल होत. आधीच्या visit मध्ये ती समीर ला भेटली होती , आणि तेव्हाच तो तिला आणि ती समीर ला खूप आवडली होती . पण कमी कालावधी असल्यामुळे ती कधी त्याच्याशी बोलली नाही .
ह्या वेळेला तिला Task अजून appoint  झाल नव्हत . म्हणून तिने समीर चा शोध घ्यायला सुरुवात केली .मागच्या वेळेस ते जेथे भेटले होते तिथे ती पोहोचली . तिने खूप शोधलं पण समीर काही भेटला नाही . हताश होऊन परतांना वाटेवर तिला समीर दिसला , आणि न कळत तिने त्याला हाकच मारली , समीर सुद्धा तिला बघून खुश झाला , पण हि इथे कशी , आपण तर फक्त नजरानजर भेटलेलो , मग हिला माझ नाव कस माहित  , हा विचार करत असता निओ त्याच्या समोर उभी राहिली , “hello समीर मी निओ , ओळखलस का आपण भेटलेलो मागच्या वर्षी, ”हो मी ओळखल, पण तुंला माझ नाव कस माहित आणि आपण बोललो पण नव्हतो ‘’ “अरे हो , माझा प्रोजेक्ट खूप कमी दिवसाचा होता तुझ्या कंपनी मध्ये , आपण बोललो नाही पण माझ्या एका सहकाऱ्याने तुझ नाव मला सांगितल , तू मला तेव्हा development  ला मदत केली त्या बद्दल मला तुला thank you म्हणायचं होत पण माझ काम झाल आणि मला परतावं लागल आणि आपण भेटूच शकलो नाही ” “हो ,,, मला पण तुंला काही सांगायचं होत पण राहून गेल .... ” , “ह्यावेळेला मी खूप दिवसासाठी आलेली so भेटूयात आपण”.  “हो,  नक्की ” “तू कुठे राहतोस , सध्या माझी राहण्याची काही सोय होऊ शकेल का रे कारण ह्या वेळेला माझ्या parent शिप ने काही सोय नाही केली ” ‘काय parentship ? ‘’, “हो ... म्हणजे office ने ” , “ok , काही प्रोब्लेम नाही , माझ्या घरा शेजारी एक flat आहे तो आपण विचारू , तुला सोबत पण होईल ” “ok , चल ” , समीर निओ ची सोय करून देतो , ह्यावेळेला तिला फक्त Observation करायचं काम होत आणि report दिवसाच्या शेवटी Mothership ला सेंड करायचे . हे काम खूप सोप्प होत , म्हणून मग निओ रोज वेग वेगळ्या area स्कॅन करत होती , कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने एक DSLR कॅमेरा सोबत घेतला होता आणि ती फोटो पण घेत होती कि जेणे करून एक Traveler  वाटेल . संध्याकाळी परतत असताना ती समीर बरोबर येत असे , ह्या मुळे दोघात खूप कमी दिवसात खूप मस्त मैत्री झाली होती . आणि समीर ला तर ती पहिल्या भेटीतच आवडली होती .
एक दिवस समीर च्या office मध्ये break मध्ये गप्पा सुरु होत्या , त्याच्या एका सहकाऱ्याचा  ज्योतिष विषयी अभ्यास चांगलाच दांडगा होता  , त्या दिवशी त्याने गम्मत म्हणून  समीर चा हात बघितला आणि ते बघून तो थोडा हादरलाच , “समीर तू एका विशिष्ट कामा साठी ह्या जगात आहेस , तुझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ होणार आहे , ती नक्कीच चांगलीच आहे पण तुला ती , तुला काय आख्या जगासाठी ते नवीन असणार आहे , आणि लवकर ते तुझ्या आयुष्यात घडेल , एक नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझ जगच बदलून जाईल ” एवढच सांगून तो निघून गेला . समीर विचार करत होता , नवीन व्यक्ती कदाचित ती निओ असेल , ती आहे च मुळी  वेगळ्या देशाची , म्हणून हा अस बोलला , पण जे काही होणार ते चांगलच न मग काही प्रश्नच नाही .
आज तो निओ ला prapose करणार होता , तस त्याने ठरवलच होत . दुपारीच त्याने तिला फोन केला आणि नेहमी भेटतो  तिथे संध्याकाळी ये म्हणून सांगितल , संध्यकाळ कधी होते ह्याचीच तो वाट बघत होता , ती हो म्हणेल का , कि नाही म्हणेल ह्याच विचार तो होता , दुपार काही लवकर सरत नव्हती त्याची , तो सतत घड्याळात बघत होता , उस्तुकता, आनंद आणि भीती अस सगळच एकदम त्याला जाणवत होत , शेवटी office सुटल आणि तो निघाला , निओ आधीच तिथे पोहोचली होती , मारून रंगाच्या चुडीवर ड्रेस मध्ये ती जास्तच सुंदर दिसत होती , समीर ने एक rose bouquet तिच्या साठी घेतला होता , गेल्या गेल्या लागलीच कुठलाही आडपडदा न ठेवता कुठली हि लाज न बाळगता , कुठली हि भीती आपल्यावर हावी होण्याच्या आत समीर गुडघ्यावर बसला आणि त्याने तिला माझ्याशी लग्न करशील म्हणून विचारल , निओ ला हे अपेक्षित होतच पण इतक्या sudden नव्हत , तिने लगेच त्याला हो म्हंटल . त्या दिवशी जाम खुश होते दोघे , समीर एक अनाथ मुलगा , त्याच्या एका लांबच्या नातेवाईक त्याला सांभाळ होते , त्याचे आई वडील एका अपघातात गेले आणि त्या नंतर तो त्या त्याच्या नातेवाईक कडेच मोठा झाला त्यांना हि मुलबाळ नसल्याने स्वतः च्या मुला प्रमाणे त्याला वाढवल होत , काकाचं हि वय झाल होत आणि काकू जाऊन एक वर्ष झाल होत .
हि सगळी गोष्ट त्याने निओ ला सांगितली , काकाच माझे सर्वेसर्वा आहेत . पण सध्या खूप आजारी असतात .  म्हणून आपण उद्याच लग्न करूयात , निओ काही बोलण्याच्या आतच समीर तयारी साठी निघून गेला , उद्या सकाळी आपण भेटू मी येतो तुला घ्यायला तयार रहाअस म्हणून तो तयारीला लागला . निओ रात्रभर विचार करत होती , तेव्हा तिला तिच्या mothtership मधून Congratulation  असा massage आला . ह्यांना कस कळल ,आणि Congratulation ? हे सगळ काय आहे ? तेव्हा mothtership मधून तिचे वडील तिला भेटायला आले आणि त्यांनी तिला सांगितल कि तुंला एक योग्य आणि सुदृढ जोडीदार मिळावा म्हणूनच तुला पृथ्वी वर आम्ही पाठवल होत , समीर खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे , तुझी निवड नक्कीच बरोबर आहे . ह्या पुढे आम्ही तुम्हा दोघानसाठी चंद्रावर एका सुंदर ठिकाणी तुमची राहायची सोय केली आहे , आम्ही त्याच्या काकांना पण हे सगळ सांगितल आहे .
लग्न होताच तुम्ही तिकडे शिफ्ट व्हाल आणि सुखी संसार करा . येवढ बोलून तिचे वडील परत अदृश्य झाले . दुसर्या दिवशी समीर तिला घ्यायला आला , लग्नाच्या ठिकाणी लग्नाच्या अगोदर निओ चे वडील आणि अजून काही लोक निओ आणि समीर ला भेटायला आले . समीर ला लग्ना अगोदर सर्व कळाव अशी निओ ची इच्छा होती , म्हणून निओ चे वडील तीथे आले त्यांनि  जे निओ ला सांगितला ते सर्व समीर ला सांगितल , हे समीर साठी खूप नवीन आणि आश्चर्यकारक होत . निओ एक अलीएन आहे , हे सुद्धा , निओ ने अगोदर खूप वेळा त्याला सांगण्याचा प्रयन्त केला पण समीर ऐकण्याचा परीस्थित नव्हता .काकांना हि हे सर्व माहित आहे हे कळल्यावर तर समीर अजून आशर्यचकित झाला .
निओ चे बाबा त्याला बोलले कि आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच आहोत फक्त बुद्ध्यांक  आणि खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या , बाकी तू निओ ला ओळखतोस . आता तूच ठराव काय निर्णय घ्यायचा. समीर विचार करतो त्याला त्याच्या त्या मित्राच बोलण  आठवत आणि  हे हि आठवत कि तो एका विशिष्ट कामा साठी येथे आलाय कदाचित ते काम म्हणजे हेच असेल . बराच वेळ विचार केल्या नंतर समीर एक निर्णय घेतो आणि सगळ्यांना सांगतो , मी निओ वर खरच खूप मनापासून प्रेम केल , मला ती पहिल्या भेटीतच खूप आवडली , मला तिच्यात वेळ अस काही जाणवलच नाही . आणि आता जेव्हा कळतय कि ती एक परग्रहीय आहे तर मी तिला सोडून देऊ , कस शक्य आहे ,त्याच हे बोलन ऐकताच निओ त्याला मिठीच मारते . ती दोघ लग्न करतात . काही दिवस पृथ्वीवरच राहून मग त्यांना चंद्रावर एका सुंदर वस्तुत शिफ्ट केल जात , ते तिथे पोहोचण्या आगोदरच तिथे अजून ४-५ संसार आधीच सुरु झालेले असतात ,