परी घरातली सगळ्या लहान ,,, दोन भावांच्या पाठीवर झालेली .. मुलीची हौस होतीच बापटांना ... परी झाल्यावर तर आकाश ठेंगण होत त्याना . त्या छोट्याश्या परीला जेव्हा त्यांनी हातात घेतलं .... डोळे पाण्याने भरून आले होते .... देवाने जगातलं खूप मोठ्ठ सुख पदरात टाकलं ... परीला परी सारखंच ठेवेन ... हे तेव्हा पासूनच त्यांनी मनात पक्क ठरवलं ... गोरी गोरी ,,, गोबऱ्या गालाची , निळ्या डोळ्याची, आणि हसली कि तिच्या उजव्या गालावर सुंदर खळी अशी होती परी बापट . हो ... तीच नाव त्यांनी परीच ठेवलं ...
शाळेत जाताना दोघे भाऊ
तिला तीच शाळेचं
दप्तर सुद्धा उचलू
देत नसत तिघेही
शाळेत बरोबर जात
, परीला अगदी वर्गात
सोडून हि दोघे
त्यांच्या वर्गात जात . शाळा
सुटल्यावर पण तिला
घेऊन मगच निघत
.... खूप जीव होता
सगळ्यांचा परी मध्ये
.. आई बाबां साठी
तर ते शेंडेफळ
होत ... ती जे
म्हणेल ते तिला
ते देत
परी जशी जशी
मोठी होऊ लागली
तस तशी ती
अजूनच सुंदर दिसायला
लागली तिचे निळे
डोळे , गालावरची खळी मोहून
टाकायची समोरच्याला , तिच्या भावाना आणि वडिलांना
तर तिचा खूप
अभिमान होता ... पण आई
ला खूप काळजी
वाटे ... पोर दिसायला
चांगली .... लोक नाहीत
ना पण तशी
.... त्या रोज तिची
दुष्ट कधी , त्यावर तिचे दोन्ही
भाऊ आई ला
समजावत ... आम्ही आहोत ना
नको काळजी करू
. परीला. रूपाचा गर्व नव्हता
एकदिवस तिचे वडील
ऑफिस मधून घरी
आले , चहा वैगरे
घेतला आणि अचानक
त्यांच्या छातीत दुखायला लागलं
, तिचा मोठा भाऊ
घरी होता च
, त्यांनी त्याला जोरात आवाज
दिला , आणि खाली
कोसळले , ऍम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात
नेई पर्यंत
खूप उशीर झाला
होता , पहिलाच attach इतका
जोरात होता कि
त्यात ते गेले
. घरातला मोठा आधार
गेला , ह्यातून सावरायला सगळ्या
घराला दोन वर्ष
लागली
मोठ्या भावाला जॉब होता
त्यावरच आता घराची
जावबदारी होती , छोटा भाऊ
लास्ट इयर ला
होता ,,, आणि परी
फर्स्ट इयर .
कॉलेज संपलं आणि एक
स्थळ
तिच्या साठी नात्यातल्या
नि सुचवलं .. चौकशी
केली आणि मुलगा
चांगला आहे कळलं,
पाच वर्षांपूर्वी च त्याचे वडील वारले होते आणि तेव्हा पासूनच तो घर सांभाळत होता घरात
आई आणि तो .. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होत ... स्थळ
थोडं लांबच होत पण मुलगा चांगला होता.
लग्न ठरलं ... खूप धुमधडाक्यात
परी च शरद
बरोबर लग्न झालं
... शरद एका private कंपनी मध्ये
कामाला होता . पगार हि
चांगला होता त्याला
, परी त्याला पाहतच
आवडली होती . शरद
एक चांगला मुलगा
होता पण वाईट संगती मुळे दारूचं
अतिशय व्यसन लागलं
होत
,,, हे लग्ना नंतर थोड्याच
दिवसात परीला कळाल , पण
चौकशी केली तेव्हा
कोणी का नाही
सांगितलं ? हे कायम
परी च्या मनात
येई ,, शरद रोज
पिऊनच घरी येत
, घरी त्याची आई
आणि त्यांच्या शेजारीच
त्याची मोठी बहीण
राहत
शरद सगळा पगार
आई ला देत
आणि शरद चा
पगार मिळाल्या मिळाल्या
आई पहिले त्यांच्या
बहिणीच्या घरी सगळं
सामान भरून, बिल भरी
मग उरलेल्या पैस्यात घराचं,
तस बघितलं तर
तिच्या नणंदेची परिस्थिती
चांगली होती त्यांचे
मिस्टर एका चांगल्या
कंपनी मध्ये जॉब
ला होते , पण
कायम बाहेर फिरस्ती
. त्यामुळे परीची नणंद कायम
परी कडेच
असे , आता
हि आलीय मग
आपल्याला आता ह्या
घरात येणंजाण कमी
होईल , पैसे पण
नाही मिळणार शिवाय
परी हि दिसायला
छान ,, त्यांच्या पेक्षा तर
क्तितीतरी पटीने छान होति
ह्या विचारामुळे आणि
द्वेषा मुळे तिच्या नणंदेने सासूच्या
मनात परी विषयी
वाईट मन करायला
सुरवात केली
तस त्यांच्या मनात सुद्धा
परीमुळे आता शरद
आपल्याला पैसे देईल
कि नाही हि
एक गोष्ट होतीच
आणि तिच्या नणंदेने
त्याला अजून खतपाणी
घालायला सुरुवात केली होती
, त्या दोघी सतत
परीला कायम टोमणे
मारणे , काम काढून
स्वतः निघून जात
, तिला त्या शेजारी
सुद्धा कोणाशी बोलू देत
नसत , परी
हि गोष्ट घरी
सांगू शकत नव्हती , आई
ला वाईट वाटेल
, दोघे भाऊ भांडायला
येतील ... उगा वाद
कशाला ह्या मुळे
परी माहेरी जात नव्हती
भावना ह्या स्त्री
पुरुष फरक करत
नाहीत त्या जश्या
एका स्त्री ला
असतात तश्या त्या
एका पुरुषाला सुद्धा
असतात . परी ला
शरद चा सहवास
आवडत होता, तो
आपल्या बरोबर असावा त्याने
आपलं कौतुक करावं
, जवळ घ्यावं असं
तिला नेहमी वाटे
, एक नवरा म्हणून
तो हि खूप चांगलं
होता , जरी पिऊन
घरी येत होता
तरी तो परी
ला कधी त्रास
देत नसे त्याला परी खूप आवडत
होती, हे जस शरद च्या आई ला आणि बहिणीला कळलं तस त्या रोज काही हि
कारणावरून परिशी भांडू लागल्या
. शरद तर नेहमी
नशेतच घरी येत
असे त्यामुळे परी
तिची बाजू कोणा
पुढे मांडणार .. माहेरी
सांगता येत नव्हतं
कि शरद जवळ
मन मोकळं करता
येत नव्हतं . तिच्या
सासू आणि नणंदेचा
राग इतका पराकोटीला
गेला कि त्या
आता शरद आणि
परी मध्ये भांडण
लावू लागल्या , इतकंच
काय कि त्या
दोघांना कसलाच एकांत मिळू
देत नव्हत्या , जर
ह्यांना चुकून एखाद मुलं
झालच तर परत
पैस्यात वाटा होईल ह्या हेतूने
तिची नणंद कायम
तिचा मुलगा शरद
आणि परी च्या
मध्ये पाठवत , रात्री
सुद्धा त्याला शरद आणि
परी जवळ झोपवी
लग्ना
नंतर सुख तिच्या
पासून पळूनच गेलं,
ना
कुठले सणवार ना
कुठली हौस .. शरद आणि
परी मध्ये सुखाचे
असे फक्त एकच
क्षण होता ,लग्नाच्या रात्रीचा त्या
नंतर ती दोघे
कधीच एकत्र आली
नाही ... किंवा येऊ दिली
नाहीत . लग्नाचं
पाहिलं वर्ष संपत
ना संपत तोच
एक दिवस शरद
घरी खाली
कोसळून बेशुद्ध झाला , दवाखान्यात
ऍडमिट केल्यावर कळलं
कि त्याच्या लिव्हर ने आता
काम कारण बंद
केलाय आणि आता
जर त्याने पिणं
सोडलं नाही तर
डॉक्टर सुद्धा काही करू
शकणार नाही .
हे ऐकून सुद्धा
शरद च्या आई
च आणि बहिणीचं
मन कळवळल नाही
त्या दिवशी सुद्धा
त्या परिशी खूप
भांडल्या ,शरद ला
दवाखान्यातून घरी आणलं
, पण त्याची सवय काही
सुटली नाही घरी
ठेवलेली बाटली घेऊन तो
परत सुरु झाला
... आणि व्हायचं तेच झाल
एका वर्षात शरद गेला
. परी वर तर
आभाळच कोसळलं ... हा
कधी तरी सुधरेल
,, आपलं सगळं नीट
होईल ह्या आशेवर
ती सगळं सहन
करत होती , शक्य होईल तितकं शरद ला दारू पासून लांब ठेवण्या चा प्रयत्न
करी पण ... जे नको तेच झालं,
हिच्या मुळेच माझा
मुलगा गेला ... पांढऱ्या
पायाची अवदसा म्हणून त्याच्या
आई ने परीलाच
दोषी केलं
शरद गेल्याच कळताच परी
चे भाऊ आणि
आई तिच्या घरी
आले तेव्हा सुद्धा
तिच्या सासूने आणि नणंदेने त्यांच्याशी
खूप भांडण केल
, ह्या दोघी असं
का बोलता हे
त्यांना काळेच ना ... परी
ने त्यांना कधीच
काही सांगितलं नव्हतं
.
दहाव्या दिवशी हिला इथून
घेऊन जा तुमच्या
बरोबर मी नाही
सांभाळणार हिला असं
तिच्या सासूने तिच्या भावा
ना सांगितलं
.. ह्या असं का
बोलतात हे त्या
दिवशी परी ने
सगळं अगदी पहिल्या
दिवसा पासूनच सांगितलं,
शेजाऱ्यांनी तिच्या भावांना सांगतील कि जेव्हा तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेला चौकशी
करायला आलात तेव्हा आदल्या दिवशी शरद च्या
आई ने आणि बहिणीने सगळ्यांना भांडून धमकावलं होत कि शरद बद्दल सगळं चांगलाच सांगायचं
. ऐकल्यावर
सगळ्यांना खूप वाईट
वाटलं आणि राग
पण आला . तू
आम्हाला का नाही
सांगितलं ... पण आता
बोलून काही उपयोग
नव्हता .
परि च्या भावानी
तिच्या सासूला ठणकावून सांगितलं
आमची बहीण काही
आम्हाला ओझं नाही
... सगळं आयुष्य आम्ही तिला
सांभाळू पण ह्या
पुढे तुमचा आमचा
संबंध संपला कुठल्या
हि प्रकारे केव्हा
हि परी ला
कॉन्टॅक्ट करायचा नाही
आणि ते परी
ला घेऊन घरी
आले.
दोन वर्ष परी भांबावलेल्या
अवस्थेत होती , ना कोणाशी बोलत ना धड खात पित
... आपण परीच नुकसान केलं हि भावना तिच्या भावां वाटे .
आता तीच परत लग्न नाही
करायचं आपण तिला सांभाळू परत तिला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं
. तिला थोडं मोकळं वाटेल , थोडं बाहेर पडली तर विचार बदलतील मोकळी होईल, म्हणून घराजवळच एका कंपनी मध्ये ती जॉब करू लागली
. भावांची लग्न झाली , त्यांना मुलं झाली, त्या मुलां मध्ये परी रमली पण ती शरद ला विसरू नाही शकली
तो एका दिवसाचा त्याचा सहवास ती कायम मनात साठवून होती तिने कितीही
ती आठवण दडपण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्यात हवं तस यश येत नसे , भावना दाबून ठेवणं तिच्या साठी कठीण होत , सणावाराला
, लग्न कार्यात तिच्या भावजाया , मैत्रिणी नटून थटून मुलां सोबत मिरवत , तेव्हा परी
ला हि उणीव जास्त जाणवत . रमणीचे जीवन म्हणजेच
रती आणि वत्सलता ! ह्या दोन्ही जीवन प्रवृती तिच्या जीवनातून वजा झाल्या होत्या
मनातल्या मनात ती कुढत
होती .
Gauri Ekbote