mazionjal

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

पिठाची गिरणी :

पिठाची गिरणी :
(आई घाईत दळण घेऊन निघालेली संध्याकाळचे ७:३० वाजलेले ,सगळीकडे अंधार पडल्यामुळे वेगवेगळे लाईट्स ची झगमगाट , रस्त्यावर घरी परतणारे ऑफिस वासी आणि बरेच ह्या सगळ्याची गाडीचे हॉर्न वाजवून "ए .... चल ना लवकर .... बिनडोक " असं मनातल्या मनात बोलून होणारी घाई , ज्याला जेवढ्या लवकर घरी जायचंय आणि जितकी जास्त घाई तेवढा जोरात हॉर्न ... , रस्त्यात मुलं क्रिकेट खेळता आहेत . असा सगळं तो वेळेचा प्रकार . तेव्हाडयात मया पळत पळत आई जवळ येऊन )
मयू : कुठे चाललीस
आई : अरे दळण संपलय , पिठाच्या गिरणीत चालले , येतो का
मयू : येतो कि , फक्त तुझा मोबाईल दे मला तिथे
आई : ह्हहो देत्ते ना ..... चला
(दोघे पण गिरणीत पोहोचतात तोडा वेळ बसून त्यांचं दळण होत तोपर्यंत आई तिथल्या काही ओळखीच्या बायकांशी गप्पा मारत असते आणि मयू मोबाइलला वर कोणता तरी गेम खेळत असतो )
आई : भैया कितना हुवा
भैया : ४ KG है ना तो चोबीस हुवा
आई ; तिच्या पर्स मधून २० रुपयाची एक नोट आणि ५ च एक नाणं त्याला देते , आणि दळण घेऊन निघते
मयू : अ ग २४ रुपये झालेत ना , मग एक रुपया घे कि त्याच्या कडून परत
आई : राहू दे पुढच्या वेळेस कमी देईल
मयू : आई १ रुपया तू सोडून दिलासा .... एक रुपया extra दिलासा त्याला .... तुला माहित आहे का ह्यात काय काय होऊ शकत , तुझ्या सारखं किती तरी जणींनी त्याला असं एक रुपया सोडला तर रोज तो किती एक्सट्रा कमवतो ... आणि त्याच तो काय करतो माहित आहे का .... आई असा एक रुपया कमवायला किती कष्ट पडतात तुला माहित आहे का ... दाखव एक रुपया एका दिवसात कमावून .... त्या पेक्षा तो मला दिला असता तर आज ह्या तुझ्या छोट्याश्या मुलाने एक छोटस चॉकोलेट खाल्लं असत आणि तो किती खुश झाला असता , तुझ्या बरोबर दर वेळेला दळण आणायला आला असता , आणि तू म्हणतेस ना कि माझं पिल्लू खुश तर मी पण खुश , आई… आज तू एका आनंदाला मुकलीस .
आई : हो का चला घरी...
Gauri

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

ऑफिस मधली दिवाळी ची तयारी

ऑफिस ,,,, दिवसातले सगळ्यात जास्त वेळ जिथे आपण असतो ती जागा , सेकंड होम च कि
आणि अश्या ह्या सेकंड होम मध्ये जेव्हा दिवाळी येते .... काय मज्जा असते
माझ्या ऑफिस ची तर तऱ्हा निराळी .... एकाच बिल्डिंग मध्ये दोन फ्लोअर मध्ये आहे माझं ऑफिस
फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड . फर्स्ट फ्लोअर म्हणजे सगळे MD , HR , Account अशी महत्वाची डिपार्टमेंट्स 
तर ग्रॉउंट फ्लोअर म्हणजे रिपेरिंग , स्टॉक , सर्विस, सेल्स अशी उद्योगी आणि उपद्व्यापी खाती .
दिवाळीच्या दिवसात ह्या दोन ठिकाणी मोठी कमालीची गंमत असते , दिवाळी दोन्ही कडे जोरात येते , अगदी जोरशोर से म्हणतात ना अगदी तशी . फक्त फरक एवढा कि वर ची दिवाळी हि विशीं च्या तरुणी सारखी तर खालची चाळीशीचा संसार सारखी विशीतील तरुणी नाही का तीच आपलं १०-१५ दिवस आधी पासूनच प्लांनिंग सुरु असत , parlor कधी जायचं , तिथे काय करून घ्यायच , hair cut कोणता करायचा , त्याला सूट होईल असे ड्रेससेस online search करायचे , ते कोणा सोबत कोणता घ्यायला जायचं हे सगळं परफेक्ट planning असत तसच वर च्या फ्लोअर वर दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पासून साफ सफाई , मागच्या वेळच काही दिवाळीच उरलं आहे का म्हणजे रांगोळीचे रंग पासून कंदील , पणत्या किंवा ऑफिस बॉय ने आणलेल्या त्या मेणाच्या छोटा दिवा सुद्धा ,,,, पण दर वेळी प्रमाणे ते सापडत नाही ते नाहीच . मग नवीन आणायचं, त्यासाठी advance घेऊन मागवून घेतलं जात ,आणि तेच खाली ,चाळीशी पंचेचाळीस ची संसारी स्त्री नाही का भाजणी करायला घेते , त्यात मधूनच कोणी तरी जेवायला मागत, कुणी तरी चहा ची फर्माईश करत, अस करत करत ती चकली कर, चिवडा कर, लाडू बनव असं सुरु असत आणि हे सगळं तिला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आत पूर्ण बनवून डब्यात भरून ठेवायचं असत, अगदी अशीच धावपळ खालची दिवाळीला १० दिवस राहिलेले ... ह्यावेळेला दिवाळी महिन्याचा सुरुवातीलाच म्हणजे मागच्या महिन्याचं टारगेट नीट झालं तर दिवाळी चांगली जाईल ह्या उद्देशाने धावा धाव . commitments ,dispatch ची घाई चालेल .एकूणच दिवाळी दोन्ही ठिकाणी जोरात उंबऱ्यात येऊन पोहोचलेली ,
आता दिवाळी ला ४ च दिवस राहिलेले वरती जवळ जवळ सगळी खरेदी झालेली , मावशी नि सगळं ऑफिस धुऊन पुसून एकदम चकाचक केलेलं , आता फक्त माळा लावाच्या , आणि खाली ..... खालची धावपळ म्हणजे टारगेट ला फक्त २ दिवस धावपळ , फोनाफोनि अशी धूम वरचा फ्लोअर दिवाळीच्या २ दिवस आधी सजून एकदम तय्यार , आणि खाली आत्ता कुठे लक्षात आलेलं कि…. अरे….. कंदील नाही लावलेले , वरचे उरलेत का काही……., मागच्या वेळेला एक लाइट ची माळ आणली होती तिचे सगळे लाइट सुरु आहे का , साल….. वरच्यानी नको का खाली लक्ष द्यायला……… वरती किती छान सजवलंय ..... आपण काय *** मुलं का .... एकाच कंपनी मध्ये काम करतो ना .... अशी संभाषण
आणि ह्या खदखदीचा थोडासा सुगावा जेव्हा वरच्या मंडळा ला लागतो तेव्हा urgent बेसिस वर एक छोटा designer आणि ऑफिसबॉय खाली पाठवून थोडे आकाश दिवे , थोडं लाइटिंग करून ऑफिसबॉय पळून जातो , खाली पण एक फुलांचं मोठ्ठ तोरण लावल जात , एक संस्कार भारतीची छानशी रांगोळी काढली जाते , दोन चार पणत्या (मेणाच्या ) पेटवून धनत्रयदिवस साजरा होतो. आणि दिवाळीची ४ दिवसाची हक्काची सुट्टी सुरु होते