असं म्हणतात आपण जे
दिवस भर अनुभवतो, वाचतो पाहतो तेच आपल्याला
स्वप्नात दिसत , पण काल हे मी चक्क अनुभवलं
मयु चा दुसऱ्या दिवशी
SST चा म्हणजे इतिहासाची क्लास टेस्ट होती
.. so आम्ही अभ्यास करत होतो, lesson म्हणजे धडा ... तो होता १८५७ चा उठाव ,
तो का झाला , त्याची कारण आणि तो कसा दाबला गेला किंवा पूर्णत्वाला कसा
नाही गेला ह्याची कारण होती ... अभ्यास झाला
जेवण झालं आणि झोपलो .
अन जाग आली ती एका
सैन्याच्या तुकडीत च ,,, थोडं विचित्र च वाटलं... सगळी कडे बघितलं आणि शेजारून जाणाऱ्या
एकाला थांबवला आणि विचारलं कि आजची तारीख काय ... वेड्यातच काढलं त्याने ... परत त्याला
दंडाला धरलं आणि हूल देत विचारलं मग तो बोलला कि २८ मार्च .... मी ओरडलो च अरे पूर्ण
सांग साला सकट.... मग तो बोलला २८ मार्च १८५७
...... मग लक्षात आलं अरे आपण इतिहासात जवळ जवळ १६२ वर्ष मागे आलोय आणि हा १८५७ चा
मार्च महिना आहे ...... ओह्ह्ह्ह ..... थोडा वेळ हादरल्या सारखं झालं पण नंतर भारीच वाटलं. आणि लक्षात आलं आपण आत्ताच जर मंगल
पांडे ला शोधलं आणि सगळं अगदी सगळं जे काल मयू कडून घोकून घेतलं ते त्यालाही सांगितलं
तर .... तर कदाचित इतिहास काहीतरी वेगळाच होईल ... हे युद्ध देशभर होईल ,,, आणि आणि
इथेच गोरा साहेब पळून जाईल आणि पुढची पिढी काही तरी नवा अजून सुंदर इतिहास घडवेल
..... कसला भारावून गेलो होतो मी ....आणि …..तेवढ्यात कोणीतरी पाठीवर थाप मारली मागे
वळून बघितलं तर , एक उंच पुरा , पिळदार मिशीचा
माणूस होता ... कोण रे तू ? त्याला का अडवलं ? आणि तारीख का विचारत होता त्याला ? मी
घाबरतच बोललो मी ... मी ... बस कळलं जास्त आवाज नाही पाहिजे काय ... आणि कापड काय असे घातले ... कुठून आला रे ? इथं काय करतोय ? सायबा न काय
हेरगिरी करायला पाठवलं कि काय तुला ? .. मी घाबरतच उत्तरलो मी .... मी २०१९ मधून आलोय
... माहित नाही कसा आलो ... आणि एकदमच एक हश्या झाला सगळी कडे .... तो बोलला भविष्यातून
आलाय .. हा हा ..... काय रे सकाळी सकाळी घेतली कि ... जास्त चढली .... मी बोललो अहो
नाही मलाच कळत नाही मी कसा आलो पण मी तुम्हला काही आता घडणाऱ्या गोष्टी सांगू शकतो
बघा खऱ्या झाल्या तर ठेवा विश्वास... पण मी तुम्हाला खूप मदत करू शकेल , झाला तर फायदाच
होईल तुमहाला .... आणि एक विचारू का .... तुम्ही ... मी पुस्तकात बघितलेल्या फोटो प्रमाणे
... तुम्ही मंगल पांडे ....ते च का ? .....
तो बोलला "ए
.. जास्त बोलतो रे तू ..... ओळखतो कसा रे मला ..... मला तर नक्की तू हेर च वाटतो
" ह्यावरून माझ्या एक लक्षत आलं कि मी ज्यांच्याशी बोलत होतो ते नक्की साक्षात
मंगल पांडे च आहे ... मग थोडी हिम्मत आली ...आणि मग मात्र माझी देशभक्ती जागी झाली
,... मी पण मग त्यांना सांगितलं बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इंग्रज सरकारने एक
नवी बंदूक introduce केली आहे बरोबर ... म्हणजे
नवी बंदूक तुम्हाला सैन्याला दिली आहे चालवायला ..पण त्यात भरावयाचे जे Cartridge
... म्हणजे काडतूस आहे त्याला गायीच्या वा
डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. हे ऐकून तो जाम चिडलाच आणि माझी कॉलर च धरली ... मी
बोललो अरे हो हे खरं आहे वाटलं च तर तू check कर ,,,, तपासून बघ ... तो मला इथेच थांब
... हालयच नाही ,,,, आलोच मी " असं बोलून तो गेला ... आणि मी तिथेच एका झाडा खाली
बसलो ,,, जवळ जवळ अर्ध्या तासाने तो लांबून
येताना दिसला आणि काहीतरी खूप कर्र्श्श काना
जवळ वाजलं .. खडबडून जागाच झालो ......
मग लक्षात आलं कि हे
एक स्वप्न होत