mazionjal

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

तुझी पल्याड ची वाट.....

 


तुझी पल्याड ची वाट.....

आकाशातून सकाळ पासून देव देवता पुष्पवृष्टी करत होते, फुलांच्या सुगंधाने संपूर्ण मिथिला सुगंधित झाली होती, मुनी लोकांच्या मंत्रोच्चाराने सर्व वातावरण प्रसन्न आणि पवित्र होत , हवे मध्ये उत्साह , आनंद भरून वाहत होता . सनई  च्या सुरां मुळे मंगल आणि प्रसन्न वाटत होत , सर्व प्रजा नटून ह्या अलौकिक सोहळ्या साठी तयार होती . स्त्रिया मंगल गान करत होत्या . वेग वेगळे अनेक पदार्थ बनवले जात होते ,जो कोणी ज्याची इच्छा करेल ते सर्व बनवले जात होते आणि सेवक ते सगळ्यांना अतिशय आदराने सोन्याच्या ताटात वाढत होते .  होम हवनाच्या धुराचा सुंदर असा सुवास सर्वत्र पसरला होता . सीता आणि राम सुंदर रत्नजडित सिहांसनावर बसले होते , समोर हवन  कुंड प्रज्वलित होता, सर्व मुनीवर अतिशय प्रसन्न असे मंत्रोच्चार करीत होते आणि श्री राम...... पाहताच मी त्यांच्या प्रेमात पार बुडाले , ते रूप , निळा वर्ण , कमळ फुलं प्रमाणे विशाल टपोरे  नेत्र  , सुंदर पण थोडं लांब नाक , मोठ्या अश्या कानात चमकणारी कुंडले , कुरळे केस  , प्रसन्न मुख , आणि कुणाचे हि नसतील असे लांब पायाच्या गुडघ्या पर्यंत असे दोन्ही कर , तो शांत चेहरा आठवला तरी मन प्रसन्न होत , हे जे  प्रेम होत ते पूर्ण पणे शुद्ध  वात्सल्य  होत . हि भावना निर्मल होती ह्यात फक्त त्या अलौकिक अश्या श्री रामा जवळ राहणं त्यांच्या सहवासात रममाण होणं , त्या परमात्म्यात विलीन होणं हीच एकमेव अपेक्षा, तेव्हा खरच अगदी मना पासून,  खर सांगते तुम्हाला , वाटल होत कि एकदा फक्त एकदा हे श्री राम माझे पती असते तर ,,,, पण ते राघव तर मर्यादा पुरुषोत्तम होते . त्यांना ओवाळायला म्हणून गेले न तेव्हा त्यांना खूप जवळून बघायचा अनुभव आला काय ते तेज ,,, ते त्याचं मोहक रूप ,,, आणि ... मनकवडे ते  कस कळल त्यांना माझ्या मनातल फक्त बोलले " द्वापरान्ते करिष्यामि भवतीनां मनोरथं |"

मी कृष्ण सखी , कृष्ण वेडी कोणत्याही नावाने बोलवा ..

वृंदावन माझ गाव , अतिशय सुंदर शांत , कालिंदीच्या स्वच्छ पाण्यासारख , आम्हाला सगळे गोप गोपिका च म्हणतात . एक दिवस माझी आई मला नंद बाबांच्या घरी घेऊन गेली ,, त्यांच्या कडे म्हणे एका सुंदर शिशु चा जन्म झालाय,,,, माझ्या सम वयाचा म्हणून मग आई गावातले सगळे आज नंद बाबां कडेच जाणार होतो , मला आई ने खूप छान सजवलं नवीन झबलं , डोळ्यात काजळ घातल पायात सुंदर छुम छुम  वाजणारे पैंजण , चंद्रकोर टीका , हातात छान अश्या मनगट्या घातल्या आणि दुपट्यात छान पांघरून  कडेवर घेऊन गेली ,,,,,

त्या वेळी पहिल्यांदा पुन्हा मला ते भेटले तेच तेज , तसाच पण ह्या वेळेला थोडा खट्याळ चेहरा , मी तर पाहतच राहिले , माझ्या बरोबर इतर पण मुलं मुली होते त्यांची अवस्था काही वेगळी नव्हती .... ते हि असेच मंत्रमुग्ध झाले होते , आणि आम्ही लहानच नाही तर मोठे सुद्धा ... मला तर गम्मतच वाटली . त्या नंतर मात्र आई आणि मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही रोज नंदबाबां  कडे जाऊ लागलो…. भेटायला . खूप मज्जा यायची .

चालायला लागलो ना तेव्हा कान्हा बरोबर खेळायला आवडायचं मला , त्याच ते लोणी चोरण , मटकी फोडणं गम्मतच वाटायची . आम्हाला पण त्यात लोणी खायला मिळायचं नाही तर माझी आई .... थोडाच देते …   ..... पण कान्हा ...मला ना त्याने केलेला तो गोपाळकाला .... गोपाळकाला माहितीय ना .... म्हणजे आम्ही खेळायला जायचो ना , ते आमच्या गुरां बरोबर तेव्हा प्रत्येकाची आई काहीतरी खायला खाऊ देत होती  , तो सगळ्यांचा खाऊ कान्हा एकत्र करायचा आणि मग तो गोपालकाला आम्ही सगळे खायचो कान्हाच्या हातची चवच काही न्यारी   ... ह्म्म्म ... अजून पण ती चव जिभेवर आहे .

अजूनही आठवतात  कान्हाचे ते कुरळे केस , शांत डोहा सारखे निळेशार डोळे , अगम्य निळा वर्ण , तू हसलास कि तुझा तो थोडा तिरका दात मोहून घ्यायचा सगळ्यांचं लक्ष , तुझा तो मोहक चेहरा,  त्यावरच हसू……आणि ….. आणि  हसताना तुझ्या डाव्या गालावर पडलेली ती खळी अजूनही आठवते मला ... किती वेड लावलं होतस तू सगळ्यांना ... मोहून च टाकलं होत

आम्ही एकत्रच मोठे झालो . आम्हा सगळ्या मुलींना कान्हा खूप आवडायचा , आणि कान्हाला पण आम्ही आवडत  होतो  . तेव्हा सुधा सगळ्यांच्या मनात तीच भावना होती  .....फक्त एकदा कान्हा आपला पती  झाला तर ,,,,

पण हा कान्हा ना थोडासा खोडकर होता , नदीवर आम्ही स्नान करायचो तेव्हा मुद्दाम कपडे लपवायचा, मटकी फोडायचा  , आमच्या वेण्या पण कधी कधी एकत्र बांधून ठेवायचा आम्ही सगळ्या कितीदा तरी त्याच्या  घरी गेलो होतो त्याच्या खोड्या सांगायला पण ...... पण कान्हा   समोर यायचा आणि सगळं विसरून जायचो ,,,, अजूनही प्रश्न पडतो कान्हा  …..  तूला रे कस कळायचं कि तुझ्या बद्दल सांगायला, तक्रार करायला आम्ही येतोय ते ?

दिवस एका मागून एक जात होते आणि आम्ही सगळे आता मोठे झालो होतो , म्हणजे घरात माझ्या लग्नाच बोललं जाऊ लागलं, आई बाबानी छान घर आणि मुलगा बघून माझं लग्न पण ठरवलं .. लग्नाच्या दिवशी एक वेगळीच , आश्चर्यकारक घटना घडत होती माझ्या बरोबर आणि ते फक्त मलाच दिसत होत, ते फक्त मीच अनुभवत होते , झालं असं कि मी ज्याच्या बरोबर सप्तपदी चालत होते तो चक्क चक्क साक्षात श्री कृष्णच होता, मला तर असं वाटत होत कि मी स्वप्न तर नाही ना पहात ,,, मी किती तरी वेळेला जमलेल्या सगळ्या सभामंडपा कडे पहिले , सगळ्या लोकां कडे पहिले आणि परत शेजारी उभ्या आलेल्या नवरा बनलेल्या माझ्या शेजारी पहिले तरी मला तिथे स्वतः श्री कृष्णच दिसला , माझी इच्छा , स्वप्न , मनोकामना आज पूर्ण होत होती . जगातलं खूप मोठं सुख आज माझ्या वाट्याला , माझ्या पदरात मिळालं होत , जन्मो जन्मीची हि एकच इच्छा आज ह्या जन्मी पूर्ण होत होती .    . आनंदाने हसावं कि रडावं असं होत होत , मी स्वतः ला चिमटा पण काढून बघितला , पण त्या मुळे हात मात्र लाल झाला होता , आज ह्या जन्माचं सार्थक झालं होत . आज त्या माझ्या प्राणप्रिय कृष्णला मी वर होत , आज तो माझा झाला होता , आम्ही आता एक जीव होणार होतो मी पूर्ण पाणे  त्याला अर्पण होणार होते, त्याच्यात लिन होणार होते , किती तरी जन्माची ती ओढ इच्छा आज पूर्ण होणार होती माझी भक्ती आज परमसीमा गाठणार होती , आज मला सर्वार्थाने मुक्ती मिळणार होते त्या परमेश्वरात आज मी एकरूप होणार होते , किती तरी ऋषी मुनी ह्या गोष्टीत साठी ह्या अद्भुत आनंदा साठी जन्मोन जन्म तपः श्चर्य करतात , आज माझ्या  तपः श्चर्य ला फळ मिळालं होत . साक्षात श्रीकृष्णाची सेवा करायचं भाग्य मला आज लाभलं होत , दोन वर्ष मला ह्या अतुलनीय परमानंदाचा अनुभव तू दिलासा , आणि ... आणि तो दिवस उगवला , तू मथुरा जायला निघाला , मला सोडून तू तुझ्या कर्तव्या कडे निघाला होतास .... तू माझ्यासाठी तुझं कर्तव्य सोडावं अशी माझी अजिबात इच्छा नाही . पण तुझं जाण हे माझ्या साठी असहनीय होत ... कृष्णा मी तुझ्या साठी लोकधर्म लोकाचार ह्याचा त्याग केला , कोण काय म्हणेल ह्याची पण काळजी नाही केली , माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम होत, आहे आणि राहणार . मी तुझ्या साठी निरंतर ह्या वृंदावनात तुझी वाट बघेल तू येशील माझ्या साठी असं तू मला बोलला होता आठवतंय तुला .. ...जाता - जाता आपण भेटलो होतो त्याच तुझ्या आवडत्या पारिजातकाच्या झाडा जवळ आणि  मला बोलला होतास ना ,कि मी परत येईल तुला भेटायला .... बघ ना अजून तुझी वाट बघते आहे, मला माहित आहे तू तुझं वचन पाळतोस तू नक्की येशील मला भेटायला ... गेले कितीतरी युग मी  रात्री  झोपले सुद्धा नाही ह्याच विचाराने कि तू येशील आणि मला झोपेत कळणार नाही .... ये रे आता लवकर ,,,

जीव जडला तुझ्यावर , वेड लागले तुझे

दर्शनाची आस आता फक्त माझ्या उरी वसे !!

आतुरले नयन कासावीस झाले मन

आले शरण तुला  कर मुक्त हे देहासन  !!