mazionjal

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

मी एक वटवृक्ष


 मी एक वटवृक्ष 

माझ्या मुळांनी, मला जमिनीला घट्ट 

धरून उभं रहावंच लागेल ,

 मुळांना खोल जमिनीत जावच लागेल 

पाण्याच्या शोधात 

कारण मी एक वटवृक्ष आहे 

 

असंख्य वेलींचा मला आधार व्हायचय 

चिमण्या पाखरांच घर व्हायचंय 

अनेक पांथस्थानचा विसावा व्हायचंय 

आणि म्हणून मला भक्कम उभं राहावंच लागेल 

कारण मी एक वटवृक्ष आहे 


वटवृक्षला कमजोर होऊन चालत नाही 

कीड लागून चालत नाही ,

पान गाळून तर अजिबात चालत नाही 

आपल्या असंख्य भुजा विस्तारून 

अनेकाना कवेत घ्यायचय 

कारण मी एक वटवृक्ष आहे 


माझ्याशी अनेकांच्या श्रद्धा तर काहींच्या अंधश्रद्धा 

जोडलेल्या आहेत 

अगणिक सूक्ष्म जीवांचं जीवन जोडलेलं आहे 

धरेचा समतोल मला साधायचाय 

कारण मी एक वटवृक्ष आहे


गौरी