mazionjal

रविवार, १६ एप्रिल, २०१७

तुझं....माझं....

सुख दुःखाच्या ओढा ओढीत
फुललं नातं तुझं माझं

संसाराच्या ऊन सावलीत
सांभाळलं मन तुझं माझं

कधी लटका राग कधी मोहक रात
उमललं प्रीतफुल तुझं माझं

कधी पावसाचा मार कधी उन्हाची तीव्रता
जपलं घरकुल तुझं माझं

गौरी ......  

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

मी......तू



मी विसराळू तू हुशार
मी प्रेमळ तू खट्याळ
मी शांतता तू गोंधळ
 मी घर तू अंगण

तू संताप मी वैताग
तू प्रेम मी साथ
तू यश मी कौतुक

तू सरगम मी साज

सोमवार, १० एप्रिल, २०१७

दुःख

दुःखाची तीव्रता वाढली कि 
ते प्रयन्तांना हाक देते 
प्रयन्तानानी यत्नांचा जोर 
लावला कि सुख धावतच येते 

दुःख कधी कधी दुःखाला कंटाळते 
आणि म्हणूनच ते माणसाच्या आतील आवाजाला उठवते 

ढवळून , पेटवून काढत सार 
उलथापालथ करून मोडून टाकत सार 
आणि देत ढकलून एका टोक पर्यंत नेऊन 

स्वतःला सावरण्यासाठी , स्वतःला घवडण्यासाठी 
स्वतःच्या सीमा , कक्षा रुंदावण्यासाठी 

म्हणूनच म्हणतात बहुतेक :
जब अंधेरा घना हो , समजलो सबेरा नजदिक है । 

गौरी 

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

विठू मूर्ती










सावळी सुबक शोभे विठ्ठलाची मूर्ती
सुंदर मुकुट शोभे भाळावरती

विलोभनीय मुख
कानी मत्स्याकार कुंडले
कंठी कौस्तुभमणी
दंडा शोभे कडी , बाहुभूषणे

दोन्ही कर कटेवर
हाती शोभे शंख कमळ
सावळ्या विठूला माझ्या
मनगटी काडी दोन

कटीवर मेखला
विठू विटेवरी उभा
साऱ्या जगताचा त्राता
आजी डोळा म्या देखिला 

वाळवंटालाच मंजूर नव्हतं बहरण .......

परक्यांच्या जगात
आपल्या माणसांना शोधायला
निघाले होते
कोरड्या वाळवंटात
पाण्याचा झरा सापडवत होते

आशा होती कि दगडालापण
पाझर फुटेल
पण रुक्ष वाळवंटात
का कधी वृक्ष बहरेल

खूप प्रयन्त केला
ओलावा टिकवण्याचा
यत्नांचा जोर लावला
हिरवळ जोपासण्याचा

पण वाळवंटालाच
मंजूर नव्हतं बहरण .......

 ..... गौरी  

विठ्ठल बरसला

आनंदाचा घनु होऊन
विठ्ठल बरसला
तहानलेल्या जीवाला
परीस स्पर्शुनी गेला

जिव विठ्ठल विठ्ठल
श्वास विठ्ठल विठ्ठल
देही विठ्ठल विठ्ठल
सार आयुष्य विठ्ठल

नको जन्मरणाचा हा फेरा
नको ऐहिकाचं ओढा
तुझ्या नामात गर्जुऊ
आसमंत हा सारा

गौरी ......

घर


सुंदर माझ्या घराला
आंब्याचं तोरण
नक्षीदार रांगोळी
अंगणी तुळशी वृंदावन

पारिजातकाचा सडा
चाफा, मनमोहक मोगरा
हा आहे माझा परसातला वाडा

चंदनाचा उंबरा
नक्षीदार दरवाजा
आत शिरताच जाणवते
निखळ अशी माया