mazionjal

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

प्रित


मनिष आणि राधिकाच जमलं. स्वभावात काही साम्य आणि खरं पहाता अनेक मतभेद असूनही जमलं. Opposite attract म्हणतात ते कारण असेल कदाचित! राधिका हळवी, सतत हसणारी, कुणालाही न दुखावणारी, सर्वात मिसळणारी. मनिष डोक्याने चालणारा आणि डोक्याचे खाणार. माणसाच्या बाह्य रूपाच्या आरपार जाऊन आतला खरा माणूस ओळखू शकणारा. त्याचा लोकांविषयीचा अंदाज सहसा चुकत नसे. त्यामुळे कमी लोकांना जवळ येऊ देणारा. पण ते दोघे जवळ आले.
काही छान महिने एकत्र घालवल्यावर मनिषला एक ऑन साईट प्रोजेक्ट मिळाला. आठवड्याभरात तो गेला देखील. मग फोन, स्काईप ह्या माध्यमातून दोघे भेटत होते. मनिष राधिकाला "लोक ओळखायला शिक, अमुक माणसापासून लांब रहा" असे सांगत असे. राधिका "आपण दोघे भिन्न व्यक्ती आहोत. मी तुझ्यासारखी लोकांना आधीच जज नाही करणार!" असे सांगायची. तिला मनीषने सांगितलेल्या लोकांचे त्याने सांगितल्याप्रमाणेच अनुभव आले. तरही ती "अनुभवातून शिकण्याचा" हट्ट सोडायला तयार नव्हती.
कार्तिक एक मनस्वी मुलगा. मनिष सारखाच बिनधास्त, हुशार. आता ह्या दोघांचा मित्र झालेला. खरं तर तो मनिषचा कलीग. लंडनला अनेक वर्ष ऑन साईट असलेला. पण थोडा opportunist प्रकारचा. त्याच्या व्हेकेशनमध्ये भारतात आल्यावर ह्या दोघांना काही वेळा भेटलेला. प्रत्येक भेटीत राधिकाशी अघळपघळ बोलणारा. राधिका देखील महाइंप्रेस झालेली. पण तो ऑन साईट असल्याने मनिष निश्चीन्त होता. तो क्वचित राधिकाला मेसेज, जोक फॉरवर्ड करत असे. राधिका ते मानिषला सहज सांगत असे. मनिष देखील त्याकडे दुर्लक्ष करत असे. मनिष प्रोजेक्ट संपवून तीनेक महिन्यात भारतात आला की दोघांनी लग्न करायचा निश्चय केला होता.
इतक्यात एक दिवस राधिकाने "आज संध्याकाळी कार्तिकला भेटायला जाते आहे" असा मेसेज मनिषला केला! "शीट! कार्तिक इंडियात परत गेला आणि मला बोलला पण नाही! आता राधिकाला भेटणार? Wtf??" कार्तिकला व्यवस्थित "ओळखून असलेल्या" आणि राधिकाला व्यवस्थित ओळखत असलेल्या मनिषला पुढील चित्र व्यवस्थित दिसू लागले. "आज जाते आहेस तर जा. पण ह्यापुढे त्याला अव्हॉईड कर" असे त्याने राधिकाला स्पष्ट सांगितले. राधिकाने मात्र "तू काळजी करू नकोस. I can handle him." असे म्हणत, त्याचा सल्ला धुडकवत अनुभवातून शहाणपण घ्यायचा हेका सुरु ठेवला. मनिषने तिला वॉर्न केले की "तो काहीतरी कारण काढून तुझ्याशी संपर्क वाढवेल. तुझ्याशी सतत संपर्कात राहायची व्यवस्था करेल. मी इथे खूप दूर आहे.आजच्यानंतर त्याला प्लिज अव्हॉईड कर. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको!" पण राधिका त्याकडे दुर्लक्ष करून कार्तिकला भेटायला गेली.... तिला कार्तिक पासून असलेल्या धोक्याची सूचना मिळून देखील. मनिष ती असं का करत असेल ह्या विचाराने हैराण झाला होता.
पुढे काही दिवस सर्व ठीक होतं पण मनिषच्या मनात कुठेतरी काहीतरी चुकत असल्याची भावना होती. मग एका चॅट मध्ये राधिकाने त्याला सांगितलं की "कार्तिक पप्पाना भेटला. त्याला PG accommodation हवे आहे. आमच्या बंगल्यातील ग्राउंड फ्लोर वरची रूम तो रेन्ट करतोय!" हे ऐकून मनिषच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तिला एकच प्रश्न केला "मी सांगितलेलं असताना देखिल तू हे असं का केलंस?" त्यावर तिने साचेबद्ध उत्तर दिलं "आपण दोघेही भिन्न व्यक्ती आहोत. I cannot think the way you do!" तिचा वेडेपणा (की स्वभावातील भिन्नता हे कारण पुढे करून कार्तिकशी जवळीक वाढवायचा convenience?) पाहून मनिष निर्वाणीचे बोलला. "तू कार्तिकला सांगून टाक की त्याला तुमच्या घरात रहाता येणार नाही. तसंच ह्यापुढे त्याच्याशी कोणतेही संभाषण कुठल्याही माध्यमातून करायचे नाही!"
पण हे चाट सुरू असतानाच कार्तिक ने मागून राधिकाला जोरात "भो " आवाजाने घाबरवलं . ती जवळ जवळ दचकलीच काय झालं दोन मिनिट तिला कळलंच नाही , ...
राधिका : अरे कार्तिक तू ...केवढी घाबरले मी ... आणि तू ... तू इथे कसा तू तर पुढच्या week मध्ये येणार होता ना ?
कार्तिक :    ग हो पण मेरी जान ... तुझ्या सोबत राहायचं मी कंट्रोल नाही करू शकलो , म्हणून आलो सगळं चंबूगबाळ उचलून ....
राधिका : काही तरी काय नीट सांग काय झालं
कार्तिक : काही नाही ग ... आधीच्या मालकाने काढलं बाहेर त्याची मुलगी राहायला येतीय तिथे म्हणे ... so  he want to repaint ... मग काय
काढला मला बाहेर .
राधिका : ओह ...
इकडे मनीष चे दोन msg  pending  होते read करायचे राधिका च्या मोबाइलला ... पण कार्तिक ने तिला इतकं व्यस्त केलं कि ती विसरली ती मनीष  शी बोलत होती ..
ती कार्तिक बरोबर रूम ओपन करून द्यायला गेली ,, रूम  साफ नव्हती ..
राधिका ; अरे तू उशिरा येणार होता न ... सो अजून साफ नाही केली ,,, मी उद्या मावशींना सांगते त्या उद्या सगळं स्वछ करून देतील
कार्तिक : पण मॅडम आज मी कुठे थांबू रात्र कुठे काढू ... तुझ्या सोबत चालेल मला वाव ... मज्जा तुझे बाबा आहेत का घरी....
राधिका : काय रे ... तू आजच्या पुरत गेस्ट रूम मध्ये थांब .... हो आणि बाबा आहेत हो ...
असं म्हणून तिने त्याला गेस्ट रूम दाखवली ,, त्याच सामान सध्या आऊटहौस  मध्ये ठेवलं . आणि ती परंत तिच्या रूम मध्ये गेली
गेल्या गेल्या तिने फोन बघितला त्यात मनीष चे ४-५ msg  आणि शिवाय २-३ misscall पण होते काय झालं ,, म्हणून तिने त्याला विडिओ कॉल केला
मनीष फोन जवळच बसला होता ,
मनीष : अशी मधूनच कुठे offline झालीस, बोलत होतो आपण ,,, काय झालं ... मला काहीच कळत नव्हतं .. कॉल पण केले तुला ... बाबाना,  कुठे गेली होतीस आणि बाबांनी पण फोन का नाही उचलला ते असं नाही करत ,,,, सगळं ठीक आहे ना ... ते कसे आहेत काय झालाय ..
राधिका : अरे हो .. हो .. थांब .. किती प्रश्न विचारशील श्वास घे थोडा ...
मनीष : मी श्वास घेऊ त्या पेक्षा काय झालं ते तू सांग
राधिका : काही नाही ... आणि बाबा ठीक आहेत ते बाहेर गेले आहते आणि फोन घरीच विसरले ,  आपण बोलत होतो ना .. तेव्हा कार्तिक आला त्याच सगळं 
सगळं सामान घेऊन .. त्याच्या घर मालकाने आजच त्याला रूम रिकामी करायला सांगितली म्हणे ...
मनीष : राधिका मी सांगतो तुला तू लांब राहा त्याच्या पासून ....पण तू ऐकायचं नाहीच ठरवलं आहेस माझं .. तो दिसतो तेवढं साधा नाही .. तू ... तू बस लांब राहा ... पुढचं सगळं बाबा ना सांग त्याच्याशी बोलायला ... खरं तर मला पटलंच नाही तो तिथे आलाय ते ... आले का बाबा
राधिका : हो आलेत ... आणि तू येवढं पॅनिक नको होऊ मी करेल handel  बरोबर dont worry my sweet heart .I miss you ..... आणि mostly I ... Miss ...all that kisses too ये ना लवकर किती वाट बघते आहे मी तुझी माहित आहे का तुला
मनीष : हा project almost संपायला आलाय लवकरच परत येतोय , पण तू त्या कार्तिक पासून लांब राहा .. चल बाय ...
राधिका : बाय sweety
मागून बाबा येतात
बाबा : राधा कार्तिक आलाय चल त्याच्या  बरोबर चहा घेऊ , आणि हो मी फोन विसरलो , आलो तर बघतो कि मनीष चे २ misscall  काय झालाय काय ..
राधिका ; काही नाही बाबा ,, मी कार्तिक शी बोलत होते सो त्याचा फोन नाही उचलला म्हणून कदाचित तो तुम्हाला करत असेल
बाबा : बर.. ये लवकर
राधिका बाबाच्या मागूनच हॉल मध्ये येते कार्तिक हॉल  मधेच TV बघत बसलेला असतो ...
राधिका : अरे तू बाहेरच .. बाबा बोलले कि तुझ्या बरोबर चहा घेऊ म्हणून
कार्तिक : चहा माझ्या बरोबर ... ओक .. पण मला तुझ्या बरोबर coffee प्यायला खूप आवडेल ..
राधिका : किती रे तू ....
कार्तिक : काय ... किती काय .. रोमँटिक ना ... तो मी आहेच .. मनीष पेक्षा सुद्धा .. बघ ...
तेवढ्यात बाबा चहा घेऊन येतात ,
बाबा :काय कार्तिक काय चाललंय सध्या
कार्तिक : काही नाही काका ऑफिस घर आणि परत ऑफिस
बाबा : चांगलंय , घे चहा मी केलाय ..
कार्तिक : मस्तच असेल मग
बाबा : तू जेवणाची काय सोय केली आहे .. नाही म्हणजे आमच्या काकू येतात दोन वेळेला आम्हा दोघां साठी करायला तुझं पण सांगू का त्यांना
कार्तिक : हो चालेल
बाबा : राधा आज आता मावशी येतील तू सांग त्यांना ह्याच पण करायला
राधिका : हो सांगते
थोडं बोलणं होत आणि चहा चे कप घेऊन बाबा ते kitchen  मध्ये जातात
कार्तिक :राधा .. मी राधाचं म्हणतो तुला ... आज जाऊयात का आपण बाहेर जेवायला ..
राधिका : अरे पण बाबा एकटेच
कार्तिक ; सांगतो मी त्यांना ...
तो kitchen  कडे जाताच चालत चालत बोलतो
कार्तिक : काका मी आणि राधा आज जाऊ का बाहेर जेवायला चालेल का तुम्हाला
बाबा : तिला विचार तिला चालेल का .. आणि हो बोलली तर फक्त लवकर या
कार्तिक ; बघ बाबा हो बोलले चल आता
राधिका तयार व्हायला आत गेली , कार्तिक च्या डोक्यात आज प्लॅन शिजत होता
तेवढ्यात राधिका आली , कमाल दिसत होती ती , full स्लीव्ह ब्लॅक अनारकली त्यावर मरून color चुडीदार आणि मारून दुपट्टा , तिचा अनार काली परफेक्ट fitting होता , मोकळे सोडलेले लांब केस , आणि एक बारीक चमकणारी टिकली , कार्तिक दोन मिनटं  तर बघतच बसला
(साला हि पूर्ण कपड्यात पण काय चाबूक दिसते ... )
राधिका ; काय रे काय झालं .. निघायचं ना कि असच बघत राहणार
कार्तिक : जॅम सॉलिड दिसते यार तू ...
राधिका ; हो माहित आहे मला निघू यात का ...निघायला  उशीर झाला तर यायला पण उशीर होईल
(कार्तिक : मनात : मला ते च तर हवंय )
कार्तिक : चल निघू
एका मस्त ५स्टार हॉटेल मध्ये दोघे आले मंद प्रकाश आणि हळुवार instrumental मस्त वातावरण होत
हॉटेल मध्ये येताच कार्तिक चे दोन मित्र तिथे दिसले ,,,
कार्तिक ; अरे यार हे कसे इथे ...... हाय तुम्ही दोघे इथे
मित्र : अरे असच पार्टी ला ,, उद्या संडे ना सो ... अरे राधिका तू आणि मनीष ...
कार्तिक : अरे तो Onsite  आहे ना ... चल बाय
आणि तो ढकलतच राधिकाला table  जवळ घेऊन गेला , तिला थोडं विचित्र वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं
राधिका : का रे काय झालं बोलला का नाही त्यांच्याशी
कार्तिक ; जाऊ दे ग उगा timepass , काय मागवू सांग आज माझ्या कडून तुला पार्टी ...
राधिका ; अरे वा  आणि कोणत्या खुशीत
कार्तिक ; आज मी नवीन मस्त घरात राहिला आलोय आणि ते हि एका सुंदर मुलीच्या सो त्या मुलीला माझ्या कडून एक छोटी शी पार्टी
राधिका : ओक
स्टार्टर , मेनकोर्स , आणि नंतर मस्त icecream  ... खाऊन दोघे निघतात
घरी पोहोचायला त्यांना ११ वाजतात बाबा जागेच होते
बाबा ; राधा उशीर झाला ...
राधिका ; हो सॉरी बाबा ..
बाबा ; ओक जा तू रूम मध्ये ,, आज मावशी झोपतील तुझ्या रूम मध्ये आज त्या गेल्या नाही घरी ,मीच त्यांना थांबवून घेतली , उद्या मला urgent मध्ये मुंबई जायचंय  ते पेन्शन च काम आहे , त्यांना तुझ्या सोबत थांबवलं आहे
कार्तिक ; मूड गेल्या सारखा ओक goodnight  बाय
दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक ला उशिरा जाग येते , रात्री चा प्लॅन सगळा फसल्या मुळे त्याचा मूड गेला होता , रात्री तो हळूच राधिकाच्या रूम मध्ये शिरणार होता पण ... त्यामुळे तो जाम चिडला होता आणि खूप प्यायला साला म्हातारा जागा होता आणि त्या बाई ला पण ठेऊन घेतला .. सगळा प्लॅन चौपट केला
पण आज नाही सोडणार नाही तरी आज म्हातारा नाही घरी आणि त्या बाई ला पाठवतो कुठे तरी
मग राधा माझी
त्याने सकाळी च मावशींना मार्केट ला पाठवलं आणि खूप मोठी लिस्ट दिली ,, आज मी स्वयंपाक करतो सांगून त्याने बऱ्याच भाज्या आणि काही मसाले ह्याची लिस्ट करून पाठवलं , जेणे करून त्यांना २-३ तास तरी लागतील
मावशी जाताच तो हॉल मध्ये आला राधिका रूम मध्ये होती घरात कुणी नाही ह्याची त्याने खात्री केली आणि राधाच्या रूम मध्ये शिरला
राधा तिच्या बेड वर पडून काही तरी वाचत होती अचानक कार्तिकला पाहून ती बावचळली
राधा ; अरे तू .. काही हवंय का .. ठाम मावशी ना बोलावते
कार्तिक ; मी मावशींना दिलाय पाठवून मार्केट ला आता २-३ तास तरी त्या काही यायच्या नाही , आणि हे काही तास फक्त आणि फक्त माझे आहेत राधा
किती दिवस पासून ह्याची वाट बघत होतो ...
असं म्हणून त्याने तिच्यावर झडपच घातली , राधाला त्याच्या डोळ्यात वासने शिवाय काहीच दिसत नव्हतं , ती जोरात ओरडली , किंचाळी , तेवढ्यात कार्तिकच्या मागून एका राकट  हाताने त्याला कुणीतरी जोरात ओढलं आणि मागे फेकलं ,,, तो मनीष होता ..
कार्तिक ; मनीष तू
मनीष ; हो मीच ... मला माहित होत असच काही तरी तू करशील
मनीष ला बघून कार्तिक घाबरला , तेव्हाडयात दाराजवळ राधाचे बाबा आणि मावशी पण आल्या सगळ्यांना बघून कार्तिक जाम घाबरला
मनीष ; का वागलास ... का असं केला खर सांग नाही तर करतो तुला पोलीस च्या हवाली
कार्तिक ; मनीष मला तुला दाखवायचं होत कि आपला स्वप्न भंग होत तेव्हा कस वाटत , मला तुला ते फील करून द्यायचं होता , तुला राधाशी लग्न करायचं होत ना , मी तिलाच तुझ्यापासून लांब करणार होतो मग तुला कळलं असत कि स्वप्न तुटल्यावर एक व्यक्ती किती अगतिक होते
मनीष ; अरे पण का ,,, मी असं काय केलं होत
कार्तिक ; काय ... हे तू मला विचारतोय तू ज्या प्रोजेक्ट वर होतास ना तो प्रोजेक्ट माझा होता मी जाणार होतो पण मॅनेजर ला तू काही तरी सांगून स्वतः तिकडे गेला   , माझ्या तोंडाचा घास तू हिरावला .. मला माहित आहे ह्या प्रोजेक्ट मधून खूप पैसे मिळणार होते म्हणून तू असं केलं
मनीष ; कार्तिक तू हे काय बोलतोय अरे मला हे माहित पण नाही ,,,, आणि तू मला स्पष्ट सांगायचं ना ... आणि त्याचा तू असा डाव रचला .. आणि कार्तिक काय कमी आहे रे तुला .. एक छान घर आहे ,प्रेमळ  आई वडील आहेत , किती छान मुलगी बघितली आहे त्यांनी तुझ्यासाठी , मला त्यांनी दाखवलं होता तिचा फोटो .. आणि ते हि जाऊ दे निदान तुझ्या करिअर चा तर विचार करायचा अस काही करायच्या आधी  ,अरे तुझ्या वर पोलीस केस होईल ह्याची पण तुला भीती नाही वाटली बर  जाऊ दे आई बाबाना कुठल्या तोंडाने भेटला असता ,, त्यांचा विचार केलाय , त्यांना जर हे कळलं असत तर ... आई तर पुरती कोसळली च असती ,,, अरे एका शिक्षिकेचा मुलगा आहेस तू, ,,, come on कार्तिक grow up , 
राधा ला तर काहीच सुचत नव्हतं ती पुरती  घाबरली होती , पण मनीष ला पाहून तिला बर  वाटलं
बाबा : मी पोलिसांना बोलावतो
कार्तिक ; नको काका  ... मला माफ करा मी दोषी आहे माफ करा.. ह्या पेक्षा जास्त काय बोलू ...
आणि कार्तिक तिथून निघून जातो , राधा मनीष च्या गळ्यात पडून रडू लागते
मनीष ; राधा मी बोललो होतो ना तू लांब राहा ,,,
राधा ; (थोडं सावरून ) पण तू कधी आला आणि बाबा तुम्हीत तर मुंबई गेलेला ना
बाबा :हा सगळं प्लॅन मनीष चा , ज्या दिवशी कार्तिक घरी आला , माझ्या फोन वर मी त्याचे २-३ misscall  पहिले तो खुप धीरगंभीर मुलगा आहे तो असे इतके  कॉल कसा करेल म्हणून तुम्ही हॉटेल ला गेल्यावर मीच त्याला विडिओ कॉल केला ,,त्याला तुला surprise  द्यायचं होत तो त्या दिवशीच निघणार होता , मी  त्याला सांगितलं कार्तिक आणि तू जेवायला गेलात ते ,,, आणि मग त्याने मला कार्तिक चा काहीतरी प्लॅन आहे तो काही बरोबर नाही हे सांगितलं आणि मावशी ना बोलवायला सांगितलं आणि पुढचा प्लॅन पण त्याचा च होता ,,, तुला सगळं अनुभवायचं होत ना ...

राधा : मनीष thank you तू वाचवलंस मला ,,, म्हणूनच मला तू खुप्प आवडतो
बाहेर येऊन बघतात तर कार्तिक ने एक टॅक्सी मागवून सगळं सामान भरून निघालेला असतो कायमचा