समस्त शस्त्र
विद्येत पारंगत , एक लाख हत्तीचं बळ असलेला , प्रचंड , विशालकाय , बलवान असा बळी राजाचा मुलगा मंदगती , हा अतिशय उन्मत्त ,राजकुमार
होता पण तो रंगनाथ चा निस्सीम भक्त होता .
रंगनाथ च्या
यात्रे साठी लोक खूप लांबून पायी चालत येत, हातात झेंडे , पताका मृदंग वाजवत ते यात्री
त्या यात्रेस जात , त्यात अनेक प्रकारचे लोक असत , बायका, माणसं , मुलं , साधू , संन्यासी
, त्या परम ईश्वराचे नाव घेत भजन कीर्तन करत ते आपला मार्ग क्रमण करत
एकदा मंदगती
रंगनाथ च्या यात्रा साठी पायी जायला
निघाला , तो ह्या गर्दीत घुसून झपाझप आपल्या
विशाल बहू मागे पुढे हलवत , हत्तीची चाल चालत ढांगा टाकत चालू लागला , त्याच्या त्या विशाल बाहुंचा धक्का लागून अनेक
माणसं , बायका मुलं खाली पडत होते काही त्याच्या पायाखाली चिरडले जात होते
आणि अश्यातच
त्याचा धक्का मुनिवर्य त्रित ह्यांना लागला आणि ते खाली पडले. आजूबाजूची जखमी मानस
बघून , मंदगतीचा उन्मत्तपणा बघून मुनी त्रित ह्यांना प्रचंड राग आला त्यांनी त्याच
क्षणी मंदगतीला शाप दिला " तू हत्ती सारखा उन्मत्त होऊन वाटेतील सगळ्यांना चिरडत
पुढे जात आहेस , तू आत्ता ह्या क्षणा पासून
एका हत्तीचं जीवन हत्ती होऊन जगशील " आणि मंदगतीला ह्या शापाचा परिणाम लगेचच दिसू
लागला , मुनींच्या त्या तेजाला त्याने ओळखलं आणि हात जोडून त्यांची माफी मागितली आणि
तुम्ही कृपासिंधु आहांत , श्रेष्ठ योगीन्द्र आहेत , मला माझी चूक कळली आहे , मला माफ करावं , तुमच्या सारख्या महात्म्यांचे मी
ह्या पुढे अवहेलना न करता आदराचं करेल , अशी चूक परत नाही करणार , तुमच्या सारखे योगीच
एखाद्याला शाप आणि उपशाप देण्यासाठी समर्थ असतात , मला उपशाप द्यावा हि विनंती तो करू
लागला. त्याच्या विनवणिला , आर्जवाला मुनींनी होकार दिला आणि त्याला उपशाप दिला तो
असा कि - माझी वाणी कधी हि खोटी नाही होणार , मी तुझ्या श्रीरंगाच्या भक्ती ला जाणतो
, आणि म्हणूनच मी तुला असा दिव्य वर देणार आहे कि जो कोणत्याची देवाला ह्या आधी मिळालेला
नाही , हे मंदगती तू शोक करू नको श्रीहरीची नागरी मथुरा मध्ये स्वतः श्रीहरीच्या हाताने
तुझा उद्धार होईल तुला मुक्ती मिळेल "
त्या नंतर बरेच
वर्ष मंदगती हत्ती हा मगध राज्य जवळील अरण्यात भटकत राहिला , मगध देशाचा राजा एकदा
आपला संपूर्ण ताफा घेऊन शिकारी साठी जंगलात गेला असता त्याला मंदगती हा बलाढ्य हत्ती
दिसला आणि हा आपल्या हत्तीच्या कळपात असावा म्हणून त्याने मंदगतीला हजारो हत्तीच्या मदतीने पकडले आणि मगध देशात घेऊन आला , पुढे हा
बलाढ्य हत्तीला मगध राजा जरासंध ने कंस ह्याला आपल्या मुलींच्या लग्नात हुंड्यात प्रदान
केला .
कंस ला हि हा
मदमस्त , बलिष्ठ , बलाढ्य हत्ती खूप आवडला , कंस ने ह्या हत्तीचे नाव कुवलयापीड़ असं
ठेवले आणि त्याला विशेष प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली , बलराम आणि कृष्ण ह्यांना
मारण्याचे विशेष प्रशिक्षण त्याला देण्यात
आले .
मथुरे मध्ये
जेव्हा अक्रूर बलराम आणि कृष्णाला घेऊन आले तेव्हा नगर , रंगशाळा बघायला हि दोघे निघाले
असता रंगशाळेत आले , तेव्हा दरवाज्यातच कुवलयापीड त्याच्या माहूत बरोबर उभा होता .
कृष्णा ने माहुताला त्यांचा रास्ता सोडणायचा आग्रह केला पण माहुताने कुवलयापीडला अंकुश
चा जोरदार मारा केला आणि श्री कृष्णच्या पुढे जायला भाग पडले , त्या मारा ला चिडून
कुवलयापीड ने कृष्णाला आपल्या सोंडेत पकडला आणि आपटू लागला , श्री कृष्णाने स्वःताला
त्याच्या तावडीतून सोडून त्याच्या पायाखाली लपले , ते दिसत नाही म्हणून तो बलिष्ठ हत्ती
आजून चिडला , त्याने वासाने कृष्णाला सापडवल आणि
सोंडेने बाहेर काढले , पण परत श्री कृष्ण त्याच्या तावडीतून सुटले त्यांनी त्याची
शेपूट पकडून जस ते वृंदावनात गायीनशी खेळत तसे खेळू लागले . कुवलयापीड ह्या मुळे आजून
चिडला आणि श्री कृष्णावर जोरात धावून गेला , श्री कृष्ण ने त्याची सोंड पकडून त्याला
खाली पडले आणि त्याचे दोन्ही दात उपटले आणि कुवलयापीड चा वध केला त्याचा उद्धार केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा