सावळ्या हरीची सानुलीशी तनु
सानुल्याला माझ्या भरजरी पीतांबरू
अंगरख्यावर त्याच्या मोत्यांची किनार
सोनसळी मुकुट गळा वैजयंती माळ
दृष्ट ना लागो माझ्या सावळ्या हरीला
टिट लावते भाळी अष्टगंध भरूनिया
नैवेद्याला ठेविली लोणी भरून हि वाटी
ह्या वाटीला हो नवविध भक्तीच्या कला कुसरी
स्वीकारावी हि वाटी माझ्या लाडक्या हरीराया
गोडी लागो तुझ्या नामाची भवसागर तरावया
