mazionjal

बुधवार, १८ जून, २०२५

वारी निघाली बघा, ओढ जीवाला तेजाची

 

विठ्ठल विठ्ठल, चैतन्याचा जयघोष

टाळ मृदूंगाची साथ, वारकऱ्यांचा जल्लोष  ।।

 

साथ ज्ञानोबा तुकोबाची , आस विठूला पहायची

वारी निघाली बघा,  ओढ जीवाला तेजाची  ।।

 

भाळी चंदन टिळा , मुखी हरिनामाच्या हो माळा

भजन कीर्तनाच्या ओव्या , वारी हा आनंदाचा सोहळा ।।

 

 काय वर्णू वेळापूर महिमा ,भक्तराज धरती  रिंगणा

धूळ उडे ती पावन माती , तेज असे  त्या घोड्याच्या पाठी ॥

अभीर धुळी लोळे भगवाधारी , अलौकिक असे हरे एक वारी

ओढ आवरेना भेटण्या मुरारी , धावतो बघा हर एक माळकरी  ।।

 

एका वर्षाने बघा भेटली ती माय , शब्द गोठले ओठात  मनी  भावनांना पूर ,

डोळा आसवांची दाटी माय लेकराच्या भेटी , पंढरपुरात ह्या मज भेटला श्रीहरी ||

  

Gauri Ekbote