**माझी ओंजळ….**
_— अबोल शब्दांचा कल्लोळ_
दाटून आलेल्या मनात,
भावनांचा कल्लोळ…
ओठांनी मात्र निवडला मार्ग तो — अबोल,
शब्द जणू विसरले ओठांच्या वाटा.
मनातल्या गोष्टी, मनातच रुतल्या आता,
नजरेत कधी असतात कथा अंतरीच्या.
तर कधी आसवे सांगतात — वेदना जिव्हाळ्याच्या.
कागदावर उतरू पाहतात कितीतरी विराणी,
पण गोठते लेखणी अन हरवते
शब्दांची शिदोरी…
गौरी