समुद्र कणखर , अफाट तेवढच अथांग , शांत, स्वतःच्या मर्यादा जाणणार आणि जपणारा
समंजस , गूढ तितकाच रागीट , उग्र अस एक भक्कम व्यक्तिमत्व लाभलेला
खरतर व्यक्तिमत्व म्हणण सुद्धा त्याच्या दृष्टीने खूप तोकड आहे
तो एक महा जल आलय आहे
सागराच्या अस्तित्वामुळेच पृथ्वीला सजीवत्व प्राप्त झालंय
कितीतरी ज्ञात अज्ञात जलचरांचा , मानवांचा तो एक भक्कम आधार आहे, त्याही पुढे जाऊन अस म्हणावस वाटत कि तो त्यांचा पोशिंदा च आहे
जेवढा तो भक्कम , कणखर ,धीर- गंभीर तेवढाच रसिक वाटतो
त्याला स्वतःची एक आवड आहे
सागराच स्वतःच अस एक संगीत आहे , त्यात तो कायम हरवलेला असतो
त्याच्या लाटांची तर मैफिलच कायम रंगलेली असते
आणि ह्या संगीतात सामील व्हायाल नद्या हि उस्तुक असतात
अगदी हिमालया पासून त्या त्याच्या सुराच्या मोहिनीने बेभान होऊन धावत येत असतात
अशा ह्या रसिक आणि गंभीर नदीश ने खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले , अनुभवलेले .
अनुभवलेले काय ते तर त्याच्याच मुळे, त्यानेच निर्माण केलेले .
असा हा वयस्कर , भारदस्त जलधि जितका प्राचीन तितकाच तो तरुण हि
जणू तारुण्याच वरदान च मुक्त हाताने त्याला देवाने दिलय
अजुनहि लहानान पासून मोठ्यान पर्यंत सगळ्यांना तो भावतो
मोहित करतो , एक वेगळीच आकर्षकता आहे त्याच्यात.
असा हा शामवर्णीय कितीतरी गूढ अगम्य गोष्टी उदरात साठून शांततेत उभा आहे
एक वेगळच गुढतेच वलय त्याच्या भोवती आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा