mazionjal

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मराठी दिन

खरं आहे , नुसतं ओरडून शुभेच्छा देऊन काही होत नाही , मराठीपण जपावं लागत, त्याची लाज बाळगता चार चौघातही शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे. तरच खरा मराठी , नाहीतर बरेच लोक पाहिलेले कि बाहेर कुठे गेले कि सुरुवात हिंदी किंवा English  मध्ये करतात , खरं पाहिलं तर बोलणारा पण मराठी असतो आणि ऐकणारा पण मराठीच .
आज सगळी कडे मॅसेजस ,images  share  होता आहेत , मराठी दिनाच्या शुभेच्छा पण खरंच मन पासून आहेत का त्या?
आपण महाराष्र्टीयन म्हणजे मराठी लोक , पण किती लोक मराठी वर्तमानपत्र विकत घेऊन आवर्जून वाचतात  , वर्षभरात किती मराठी पुस्तक विकत घेऊन वाचतात , विकत सोडा पण किती लोक मराठी पुस्तक वाचतात ,असे किती मराठी चित्रपट पाहिलेले  आठवतात .

मराठी भाषा हि  समृद्ध , वैभवशाली , सर्वसमावेशक , सालंकृत  , ऐतिहासिक  वारसा असलेली, वळेल तशी , समजायला सोपी , आणि भरपूर वाचनीय संग्रह असलेली अशी आहे ,तिचा मन सन्मान , जपवणूक आपणच केल पाहिजे . तरच पुढल्या पिढी ला ती आनंदाने स्वीकारेल .
आपण आपले विचार हे मातृभाषेतूनच योग्य आणि परिणामकारक मांडू शकतो दुसऱ्या कोणत्याच भाषेत ते तितक्या योग्य पद्धतीने नाही मांडता येत
मराठी भाषेचा उगम संस्कृत मधूनच झाला असं एक मत आहेबरेच संस्कृत शब्द मराठीत आहेत . गाथा सप्तशती,  ज्ञानेश्वरी,  ज्योतिषरत्नमाला हे ग्रंथ मराठीतच आहेत.. ६८० च्या ताम्रपटात 'पन्नास, आणि प्रिथवी' हे शब्द आहेत म्हणून ती मराठीची सुरुवात आहे असे मानतात , मराठी भाषा सुंदर कामिनीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची आहे, असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे

असाच एक मराठीला आपली माय मानून जन्मलेला आणि तिच्या कुशीत वाढलेला , कवी, लेखक, नाटककार , आत्मनिष्ठ समाजनिष्ठ, मराठीतले महत्त्वाचा लेखक, कि ज्याच्या नावाशिवाय मराठी लेखन संपदा सुरु होत नाही , सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत् असे त्यांचे वर्णन करतात, वि.. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर, त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या मते अनुभवाने साहित्याचा आशय ठरवत असतो , साहित्याच पोतं , त्यातील धागे म्हणजे अनुभव , जर अनुभव संकुचित, वरवरचा असेल तर ते साहित्य  रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते. अनुभव माणसा माणसा चा वेगळा , तो कधी सारखा नसतो त्यामुळे मिळणारे विषय हि संपत नाही आणि त्यामुळेच साहित्य वृद्धिगंत होत राहते , हे सगळं अनुभवानेच होत . एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता केवलता प्राप्त होते..

हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला.................

तर कधी 

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही............................

 कधी कधी :
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा

 ह्या सारख्या कविता लिहिणारा हा कवी वयाच्या २० व्या वर्षी सत्याग्रहात उताराला , तो काळ असेल १९३२ चा , असा काळ  कि ज्या वेळेला स्पृश्य अस्पृश्य असा भेद चाले , त्यावेळेला नासिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्याना जाण्याची मनाई होती , त्यांना हि रामाचे दर्शन व्हावे , ह्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी  जो सत्याग्रह केला त्यात आपले कवी कुसुमाग्रज सुद्धा होते .
१९४२ हा शिरवाडकरांच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा ठरला , वि खांडेकर ह्यांनी स्व खर्चाने कुसुमाग्रजांच्या कवितांचा संग्रह विशाखा नावाने प्रसिद्ध केला.
आणि त्यात प्रस्थावनेत लिहिलं "रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही , डोळ्यांना ते आपोआपच जाणवते , रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करत बसत नाही , वाऱ्याच्या झुळुकेबरोबर तो आला कि मन क्षणार्धात प्रसन्न होऊन जात , लहान मुलाच्या नाजूक पाप्याची अवीट गोडी कळायला पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही , एका स्पर्शात  ओठांना त्या अमृताची माधुरी कळते, सुंदर आणि सजीव कवितेचहि असाच आहे तिला प्रस्तावना हवी कशाला ?"

वि व शिरवाडकर ह्यांनी  १९६४ सालच्या मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद  भूषवले.
१९९१ साली भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार आणि  वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
अश्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
Gauri Ekbote 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा