mazionjal

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

काही माणसं ........ माणुसकी हरवलेले

काही माणसं ........ माणुसकी हरवलेले

खरंच कधी कधी असे हि माणसं  भेटतात माणुसकी हरवलेले
आणि थोड विचारात टाकणारे कि खरंच आपलंच चुकलं कि त्याच ... आपण बरोबर होतो कि तो .... आपण चिडलो हे  बरोबर कि चूक
जाऊ देत ना , तो वरचा बघतोय तोच  ठरवेल आणि योग्य तो न्याय पण करेल
असच काहीस घडलेलं
(आई आणि मयु त्यांच्या Two-wheelerवर , वेळ रात्री ९:३० ,, आणि तुफान पाऊस ) 
आई : खूप उशीर झाला ना आज , पाऊस पण ना ,,, थांबताच नाही ...मयु नीट बस पकडून . अरे पावसाने सगळे खड्डे पाण्याने भरलेले लक्षात नाही येत आहे 
आणि अंधार पण , मेली लाइट पण आताच जायची होती 
रेनकोट च टोपी नीट आहे ना डोक्यावर 
मयु : हो ग मम्मा चल लवकर , तूच ओली होते आहे 
आई : हो .. अरे सकाळी रेनकोट विसरले घरीच .
मयु : ह्म्म्म
आई : हा चढ ना आणि ती गाडी बघ समोरून च आली ... आता बाजूला थांबला तर बर नाही तर गेलो आपण खड्यात ....
(एक मोठी suv समोरून येते फुल हेडलाईट आणि मयु आणि आई चढावरून कशीतरी गाडी चढवतात , आणि ती suv चढाच्या टोकावरच थांबते ती दोघे तिथे यायला आणि suv च दार उघडायला एकच वेळ )
आई : अरे भैया दिसत नाही का रे .. गेली ना गाडी खड्यात .
भैया : ओ तुम्हाला नाही का दिसत .. माझी एवढी मोठी गाडी थांबायचं कि थोडं
आई : अरे पाऊस बघ कि ....
भैया : कशाला निघतात मग
आई : मयु उतर .... मागच चाक गेलय खड्यात आणि निघत पण नाही थोडं ढकल
भैया : (त्याच्या बरोबरच चा मदत करायला येतॊ ) अरे सोड कश्याला , करतील ते , काढतील .. चल
मयु : मम्मा मी ढकलतो तू ओढ
आई : माणुसकीच गेलीय मेली ....
(दोघे गाडी काढतात आणि घरी निघतात )

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

अंतरग्रहीय प्रेम

अंतरग्रहीय प्रेम



आई : काय ? ... पृथ्वी वरील मुलगा ? तू केव्हा गेलीस पृथ्वी वर ? तो कुठे भेटला तुला ? हे कस शक्य आहे ? नाही नाही माझा तर विश्वासच नाही माझ्या कानांवर ..... पृथ्वीवरचा ........ शी ..... 
अग आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस ...... आपल्या ग्रहावर काय कमी स्मार्ट लोक आहेत ?
अहो ..... काय करायचं हो ...... 
मुलगी : अग आई तू का एवढी पॅनिक होते आहे ,,,,,, खूप छान आहे तो ,,,,, त्याचा स्वभाव पण ....
आई : स्वभाव ..... अग हि पृथ्वी वरची मनुष्य जात .... काय सांगू तुला .... ह्यांच्या ्रहावर भौगोलिक ग्रॅव्हिटी जास्त आणि माणसांची मानसिक ग्रॅव्हिटी कमी पोरी ..... कुठल्या तरी आभासी दुनियेत असतात हि ..... नको ... नको असं .... सोड त्याचा नाद ... एकतर आभासी जग नाही तर मानसिक दुनिया ..... ह्यापलीकडे ह्याच जग नाही पोरी ... हि मानव जात शापित आहे ..... इच्छा , अपेक्षा ह्यातून ते बाहेर नाही निघत ..... आपल्या सारखं त्यांना मोकळं जगता नाही येत ... ते कायम अतृप्त असतात ..... आणि त्यांचं आयुष्य पण कमी जेमतेम ७० वर्ष .... अंग आपण कमीत कमी १००० वर्ष जगतो .... ऐन उभारणीच्या कष्टाच्या दिवसात तो हे जग सोडेल ....... पोरी ....
मुलगी : अग पण ...... 
आई : अग नाही आणि काही नाही , उद्या पासून तुझं प्लॅनेट बाहेर जण बंद