mazionjal

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

काही माणसं ........ माणुसकी हरवलेले

काही माणसं ........ माणुसकी हरवलेले

खरंच कधी कधी असे हि माणसं  भेटतात माणुसकी हरवलेले
आणि थोड विचारात टाकणारे कि खरंच आपलंच चुकलं कि त्याच ... आपण बरोबर होतो कि तो .... आपण चिडलो हे  बरोबर कि चूक
जाऊ देत ना , तो वरचा बघतोय तोच  ठरवेल आणि योग्य तो न्याय पण करेल
असच काहीस घडलेलं
(आई आणि मयु त्यांच्या Two-wheelerवर , वेळ रात्री ९:३० ,, आणि तुफान पाऊस ) 
आई : खूप उशीर झाला ना आज , पाऊस पण ना ,,, थांबताच नाही ...मयु नीट बस पकडून . अरे पावसाने सगळे खड्डे पाण्याने भरलेले लक्षात नाही येत आहे 
आणि अंधार पण , मेली लाइट पण आताच जायची होती 
रेनकोट च टोपी नीट आहे ना डोक्यावर 
मयु : हो ग मम्मा चल लवकर , तूच ओली होते आहे 
आई : हो .. अरे सकाळी रेनकोट विसरले घरीच .
मयु : ह्म्म्म
आई : हा चढ ना आणि ती गाडी बघ समोरून च आली ... आता बाजूला थांबला तर बर नाही तर गेलो आपण खड्यात ....
(एक मोठी suv समोरून येते फुल हेडलाईट आणि मयु आणि आई चढावरून कशीतरी गाडी चढवतात , आणि ती suv चढाच्या टोकावरच थांबते ती दोघे तिथे यायला आणि suv च दार उघडायला एकच वेळ )
आई : अरे भैया दिसत नाही का रे .. गेली ना गाडी खड्यात .
भैया : ओ तुम्हाला नाही का दिसत .. माझी एवढी मोठी गाडी थांबायचं कि थोडं
आई : अरे पाऊस बघ कि ....
भैया : कशाला निघतात मग
आई : मयु उतर .... मागच चाक गेलय खड्यात आणि निघत पण नाही थोडं ढकल
भैया : (त्याच्या बरोबरच चा मदत करायला येतॊ ) अरे सोड कश्याला , करतील ते , काढतील .. चल
मयु : मम्मा मी ढकलतो तू ओढ
आई : माणुसकीच गेलीय मेली ....
(दोघे गाडी काढतात आणि घरी निघतात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा