आपण खूप म्हणतो कि
असं काही नसत हो... हे फक्त पुस्तकात किंवा सिनेमातच होत ,
खरं आयुष्य खूप वेगळं
असत , किती त्रास असतो , हे मनोरंजना साठी ठीक
आहे वैगरे वैगरे ....
पण आज हि अशी माणसं
आहेत कि जी खूप ,,, अतिशय प्रामाणिक असतात , आपली मत आपले संस्कार जीवापाड जपतात .
एखाद्याच मन मोडणं
त्यांना लवकर नाही जमत , आणि जेव्हा अशी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा .... तेव्हा ते
अगदी जीव ओतून , मनाच्या अगदी खोल तळा पासून बाहेर पर्यंत प्रेम करतात ,प्रेमात झोकून देणं म्हणजे काय हे ह्यांना पाहिल्यावरच लक्षात
येत , प्रेमात आंधळे नाही पण वेडे नक्की होतात . त्या व्यक्ती साठी वाट्टेल ते ...
वाट्टेल तेव्हा काही हि करू शकतात ... हो ना ..... असाच आहे सुजय . सुजय साधा सरळ ,प्रेमळ आणि तेवढाच रांगडा . उंची
ने ६फूट, निळे डोळे , पिळदार शरीरयष्टी ,सावळा
वर्ण , आणि कायम बेअर्ड style change कधी बोल्ड
beard style , कधी full Beard , कधी cool Beard style , तर कधी teenagers style , कोणतीही
style त्याला इतकी सूट होई कि ती त्याच्या साठीच तयार केली असं वाटे ,त्याला बघताच
एकही मुलगी परत वळून बघणार नाही असं शक्यच
नाही , मुलींच्या स्वप्नातला tall , Dark , handsome charming असा होता. त्याच हे stylish राहणं ,stylish वागणं एक impression सोडून जायच, एकदा कोणाला भेटल्यावर त्याला
कोणी विसरूच शकत नव्हतं .मुली तर फिदा होत्याच त्याच्यावर.
आई वडील मोठा भाऊ
, एक बहीण आणि सुजय असं हे पंचकोनी कुटुंब , पंचकोनात जसा एक कोन थोडा लांब असतो तसा
सुजय होता घरात सगळ्यात वेगळा , अतिशय stylish पण तितकाच समंजस, अतिशय आगाऊ पण तितकाच
शांत, नुकतंच मास्टर डिग्री संपवून त्याला जॉब लागलं होता , त्यामुळे घरातले आणि तो
स्वतः खूप खुश होते , सुजय मुळातच हुशार त्याच्या हुशारी मुळे , त्याच्या हजार जबाबी
पणा मुळेच त्याच्या HR ने त्याला पहिल्याच मीटिंग मध्ये ऑफर लेटर दिल होत , पगार पण चांगला होता . मग काय कॉलेज आणि ते संपत
नाही तोच छानसा जॉब सगळं कस मस्त चाललं होत आणि ठरल्या प्रमाणे होत होत. ऑफिस मध्ये
सुद्धा तो खूप लवकर रुळला .
ऑफिस मध्ये सुनंदा
हि त्याची Colleague , सुजय आणि सुनंदा एकाच दिवशी ऑफिस जॉईन केलेलं . सुनंदा हि मुंबई
ची पण जॉब मुळे ती बंगलोर ला शिफ्ट झालेली
, ती एका private Girls Hostel ला राहत होती
सुनंदा हि हुशार , देखणी, महत्वकांक्षी मुलगी
कुठल्याही मुलाला बघितल्यावर नक्की वाटेल “काय सुंदर मुलगी” आहे अगदी अशी. अतिशय stylish आणि तितकीच हुशार . एकाच प्रोजेक्ट
वर एकाच दिवशी ती दोघे appoint झालेली , दोघेही
स्वभावाने , वागण्या बोलण्याने , आवडी निवडी हि same . ह्या मुळे हळू हळू त्यांची मैत्री
झाली , रोज च्या भेटीगांठीं मुळे मैत्री वाढत जाऊन घट्ट झाली. दोन वर्ष केव्हा संपले
हे कळलं पण नाही.
ऑफिस ला आता
workload हि वाढला होता पण सुनंदा बरोबर असली
कि वेळ कसा जाई हे सुजयला कळत नसे . सुजय ला सुनंदा आसपास असली कि आवडे , सुनंदा हि
त्याच्या बरोबर मिळून मिसळून वागत होती, ह्या दोन वर्षात मैत्री इतकी घट्ट झाली कि
सुनंदा सुजय च्या घरी
पण येऊ जाऊ लागली ,थोड्याच दिवसात ती घरातीलच आहे इतकी रुळली होती. सुजय ला सुनंदा आवडू लागली , तो तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे तिच्या प्रेमातच पडला, तिची ऑफिस मध्ये काम करण्याची
पद्धत , कामाच्या बाबतीत पद्धतशीरपणा , सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणं , सुजय ला आवडू
लागलं , सुजय सुनंदाच्या मोकळ्या स्वभावला
प्रेम समजू लागला , आणि तिच्या प्रेमात आकंठ बुडाला . ऑफिसला ती दोघे बरोबर जात , तो तिला तिच्या हॉस्टेल वरून pick करत असे .आणि
संध्याकाळी सोडत असे . संध्याकाळी कधी कधी पाणीपुरी पार्टी , भेळ पार्टी तर कधी कट्ट्यावर
गप्पा रंगत . सुजय साठी खूप मस्त मोरपंखी दिवस होते ते. पण ह्या दोन वर्षात सुजय ची तिला विचारायची हिम्मत नाही झाली , ती कदाचित
नाही बोलली तर ... ह्या विचारानेच तो शब्द ओठात गोठवत.
आता दोघांना हि ह्या
कंपनी मध्ये दोन वर्ष झाली , सुनंदा ला मुंबई ला चांगल्या पगाराची ऑफर आली आणि ती तिने
accept हि केली , एकतर ऑफर hometown ची होती दुसरं म्हणजे पगार आणि पोस्ट पण चांगली होती खूप आनंदात होती , सुजय मात्र हिरमुसला आता ती रोज
नाही भेटणार ह्या विचारानेच त्याला काय करावं काही सुचत नव्हतं पण सुनंदा साठी आकाश ठेंगण होत , ती खूप उत्साहात
होती . , आज सुजय ने ठरवलं, आज सुनंदाला सगळं
मनमोकळं करून सांगायचं ... संध्याकाळी जाताना त्याने गाडी एका कॉफी शॉप जवळ थांबली
थोडावेळ बसुयात .. दोघांनी कॉफी घेतली , सुरुवात कुठून करावी हे त्याला समजत नव्हतं
... पण आज तिला सांगायचंच त्याने ठरवलं आणि
सुनंदाचा हातात हात घेऊन “सुनंदा माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर नको ना जाऊ मला
सोडून ,,, काय वाईट आहे ह्या नौकरीत…. खूप छान संसार होईल आपला. थांब ना…. नको जाऊ मला सोडून . खूप खूप प्रेम करतो
मी तुझ्यावर तुला कधीच अंतर नाही देणार , तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल , खूप सुखात
ठेवेल तुला .. थांब ना माझ्या साठी .” सुनंदा
हे ऐकून सुन्नच झाली काय बोलावं तिला कळत नव्हतं , हा असं काय बोलतो आहे , कस
react व्हावं तिला समजत नव्हतं .
सुनंदा एक करिअर
oriented मुलगी , तिची स्वतः ची खूप मोठ्ठी
स्वप्न होती , खूप पैसे कमवायचे , नवीन नवीन देश बघायचे, लग्न वैगरे ह्यावर तिचा विश्वास
नव्हता . लग्न म्हणजे तडजोड’, लग्न म्हणजे सर्वसामान्य
बाब, आणि लग्न कधी हि करू शकतो त्याला वयाची अट
नाही , एवढ्या लवकर लग्न वैगरे म्हणजे खूपच होत , लग्न केलं म्हनजे बांधिलकी
आली आणि ती आत्ता तिला नको होती . आणि लग्न
करायचाच तर settle person बरोबर असं तिने
पक्क ठरवलं होत . सुजय ला तिने नीट समजावून सांगितलं कि ह्या पगारात माझी कुठली स्वप्न
पूर्ण होतील आणि मी जर खुश नाही राहू शकले तर तू पण कसा आनंदी राहशील . त्यातून तुझं
च घर म्हणजे जॉईन फॅमिली आई वडील मोठा भाऊ
, एक बहीण असं एकत्र कुटुंब नको कारण अनेक
माणसं एकत्र आल्याने मतमतांतरे होऊन वाद होऊ शकतात. मला अजून खूप फिरायचं जग बघायचंय
लग्नाच्या बंधनात अडकून नाही बसायचं . तू सुद्धा तुझ्या करिअर कडे लक्ष दे असच काही
सांगून तिने तिचा नकार सुजय ला सांगून निघून गेली .
सुजय कितीतरी वेळ तिथेच
सुन्न होऊन बसला होता , दोन तीन तासाने तो भानावर आला . आणि तसाच घरी निघाला . आज त्याला
काहीच सुचत नव्हतं . सुनंदा बरोबर घालवले एक एक क्षण तो आठवत होता ... आणि मला एकदा
सुद्धा का नाही समजलं कि तीच माझ्यावर प्रेम नाही .... किती मी वाहवत गेलो .. सगळंच
जग त्याला स्तब्ध झाल्या सारखं झालं होत . खूप रडला त्या दिवशी . घरी पोहोचल्यावर तो काही हि न बोलता सरळ त्याच्या
रूम मध्ये निघून गेला , जेवायला सुद्धा नाही आला . आई ला वाटलं काम जास्त असेल दमला
असेल म्हणून कुणी त्याला disturb नाही केलं
.
दुसऱ्या दिवशी सुजय
ऑफिस ला पण नाही गेला .. बर नाही म्हणून घरीच होता रूम च्या बाहेर पण नाही आला . त्याच्या
दादाला थोडा अंदाज आला काय झालं असावं पण नक्की काय झालय म्हणून तो सुजय च्या रूम मध्ये
आला . सुजय काय झालय कालपासून पाहतोय तू शांत दिसतोस जेवलास पण नाही ,, खूप काम होत
का ? कि ताप आलाय ….बघू ? हे शब्द ऐकताच सुजय दादाच्या कुशीत शिरून हुंदके देऊन रडू लागला
दादाने त्याला मनसोक्त रडू दिल थोडा शांत झाल्यावर सुजय ने झालेला प्रकार दादाला सांगितलं
. दादाने सुजय ची समजूत काढली , त्याला समजावलं अरे हे असं होत, सगळ्यांना सगळंच मिळत
अस नाही , कधी कधी न मिळालेलंच बर असं हि असत . आणि सुनंदा म्हणते ते देखील खरं आहे अजून वय तरी
काय तुमचं , करिअर कडे लक्ष द्यायलाच हवं ….अरे हे च तर वय आहे पुढे जायचं , जग बघायचं
, ह्याच वयात तू जे करू शकशील ते कर , ह्या एका नकारला तू positively घे , इतका सक्षम हो कि सुनंदाला आपण
ह्याला नकार का दिला ह्याचा विचार करावा लागेल . आणि सुजय मी तुला लहानपणा पासून ओळखतो तू हे challenge नक्की पूर्ण करशील ह्याची मला खात्री आहे .
रडणं सोड तिझ्यासाठी , उघड्या डोळ्याने
या दुनिये कडे पाहा. तू हुशार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू handsome आहे,, हो ना , अरे किती तरी मुली तुझ्या कडे मागे
वळून बघतात ... तुला तर कुठलाही style शोभून
दिसत पण अशा handsome ला असं रडणं नाही शोभून दिसत . आणि आई म्हणते ना
कि तू वेगळा आहेस , समजूतदार आहेस , तिचा श्रावणबाळ आहेस मग आई साठी हे असं रडणं थांबावं
. असं रडत कुढत नको बसू ,उठ ऑफिस ला जा . आणि मस्त एक गिफ्ट घेऊन सुनंदाला दे आणि आनंदाने
तिला निरोप दे . उठ फ्रेश हो ... आणि जा ऑफिस ला after all Duty is Beautiful my boy . let’s back to work
. ह्या अश्या छोट्या गोष्टींमुळे रडत नाही बसायचं तर हि एक आपल्याला मिळालेली शिकवून
धडा आहे आयुष्याकडून असं समजायचं आणि पुढे अजून जोमाने नवीन सुरुवात करायची मग बघ तुझी
गाडी कशी एक्सप्रेस way वर धावते .
सुजय ला दादाच्या ह्या
बोलण्याने हुरूप आला , तो ऑफिसला जायला तयार झाला , ऑफिस ला हि तो जस काही झालाच नाही
असं वागत होता , पण मनात अजूनही वाटत होत कि सुनंदाने थांबावं माझ्या साठी , धावत येऊन
म्हणावं.... नाही जात मी ,,, थांबते फक्त आणि
फक्त तुझ्यासाठी . पण सुनंदाचा मूड काही वेगळाच होता, ती खूपच खुश होती आज सुनंदाचा
शेवटचा दिवस होता ऑफिस मध्ये तिने एक छोटी party organised केली होती सगळ्या
ना तिने invite केलेलं. सुजय नाही
गेला . तिच्या ते लक्षत आलं पण तिने ते जास्त
मनावर न घेता ती मुंबई shift झाली .
पहिले २ महिने सुजय
ला खूप जड गेले त्याला सुनंदा ची खूप सवय झाली होती .. पण त्याने मनाशी ठरवलं होत कि
त्याच प्रेम हे खूप निर्मळ होत . त्याने ते अगदी मनाच्या तळा पासून केलं होत . सुनंदाला
ते नाही सजमजु शकलं ह्यात आपला तर नाही ना दोष . आणि ते माझं होत तर मी ते तिच्यावर
का लादू , ती एक खूप सुंदर आठवण आहे . हि तो
कायम त्याच्या मनाच्या कपाटात खूप खाली तळाला जपून ठेवणार होता . एका सुगंधी अत्तराच्या
कुपी सारखी . आणि एकांतात ती सुगंधी कुपी उघडून त्याचा मोहक सुगंध अनुभवायचा आणि परत
तिला त्या कपाटात व्यवस्थित झाकून परत ठेऊन द्यायचं. वास आणि सुगंध
आपल्या मनाच्या कल्पना आहेत...समोरच्याविषयी आपली भावना
महत्वाची... चांगली भावना असेल
तर सुगंधच सुगंध
. सुजय न ते अत्तर खूप छान जपून ठेवलय त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात , कधीतरी आठवण
आल्यावर ती कुपी उघडून त्या सुगंधात तो धुंद नाहून घेतो आणि परत फ्रेश मूड ने रोजच्या
कामाला सुरुवात करतो
Gauri Ekbote
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा