वसुंधरा ल्यायली
आकाशी शाल
हिरवा भरजरी
शालू अन सप्तरंगी इंद्रधनू ची माळ
क्षितीजाच्या
भाळावर सूर्याचं गोंदण
रात्रीच्या
आकाशाला चंद्राचं कोंदण
वाऱ्याच्या
बांगड्यांची किणकिण ती फार
नदीच्या बटांमध्ये
बदकांची रांग
दाट धुक्याची
पावडर ,सुगंधी दवाचा शिडकाव
रात्रीच काजळ
कमल नयनात
रंगीत रंगीत
फुलपाखरा सम कर्णफुले ती छान
भाळावर रुळे
इंद्रधनू ची कमान
प्राकृतिक तिचे
सौंदर्य , अलौकिक ती धरा
अशी आहे माझी
अचलकीला -अचला,रत्नगर्भा,वसुधा-वसुंधरा.
गौरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा