सांज वेळी आठव तुझी, अथांग समुद्र भासे
आठवणींच्या लाटांनाही उगाच उधाण येतसे
नसतो दिवस नसते रात्र, हि संधिप्रकाशाची वेळ
कातरवेळी हूर हूर मनी, भास तुझे हे खेळी खेळ
तो पहा, तो सूर्य हि जातसे
चांदणीस भेटावया
सोडूनि सर्व किरणांचा पसारा
होऊनि चंद्र, चांदणं बरसावया
एकटाच मी ह्या किनाऱ्यावर तू पल्याड पोहोचली
सोबतीस आहे आता तुझ्या आठवणींची पोटली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा