सुजय वय १५ , लहान पणा पासूनच एक वेगळीच शक्ती घेऊन जन्माला आलेलो मला लोकांचं बोललेल समजत म्हणजे मनात बोललेलं . माझे मित्र मला MK म्हणजे मन-कवडा म्हणतात , शाळेत मी सगळ्यांना MK म्हणूनच माहित आहे . खूप वेळा मी आई बाबा ना पण विचारलं हे असं कस पण त्यांनि टाळाटाळीची उत्तर देऊन मला गप्प केलं , पण तुम्हाला सांगू आई ला पण मनात बोललेलं कळायचं ... म्हणजे मागच्या वर्षी ती देवा कडे गेली . आज मी बाबाना विचारणारच आहे कि नक्की का असं होत.
"यार बाबा
आज तर तुला सांगावंच लागेल माझ्या MK च राज ... मला पण कळायला हवं ना कि हे असं माझ्या
आणि आई च्या बाबतीत का होत ,... तू सांग बर ... आज मी कुठे जाणार नाही दिवस भर , घरीच राहणार आहे , नो क्लास ,नो फुटबॉल ,नो अभ्यास
.... आणि मला माहित आहे कि तुला सुद्धा मनात बोललेलं कळत . तू सुद्धा MK च आहेस ..
पण तू आणि आई हे लपवून का ठेवता .. खूप प्रश्न ... डोक्यात भुगा होतोय, सो आज तू हे
सगळं क्लिअर करणार आहेस . "
बाबा
" ओक सांगतो बस ..पण हि एक गोष्ट समजून ऐकायची आणि नंतर विसरून जायचं नो पब्लिसिटी
नो इन्स्टा स्टोरी .... हे आपलं फॅमिली सीक्रेट ओके . तू प्रॉमिस देणार असशील तर पूर्ण स्टोरी सांगतो
... " सुजय " yes I प्रॉमिस . तू सांग
" आज तब्बल 30-40 वर्ष झाली ह्या घटनेला घडून पण अजूनहि ते सगळं मला जसच्या तस आठवतंय .
हे सगळं सुरु
झालं होत ते आमच्या ग्रहा वरून सौरमालेच्या किती तरी लांब पासून म्हणजे मला जेव्हा पासून हि परिस्थिती कळायला लागली ती परिस्थिती खूप आधी पासून होती असं मला आई सांगते
,प्रचंड मोठा दुष्काळ होता प्यायला पाणी नाही
,कडक ऊन , जिकडे पहावं तिकडे फक्त वाळवंट , नदया
सगळ्या सुकून गेलेल्या ,छोटे छोटे ओढे
आणि नाले पांढरे पडलेले आणि ती पांढरी रेष
त्या ओहळाच अस्तित्व. सगळे सायंटिस्ट ह्या गोष्टीवर दिवस रात्र अभ्यास करत होते , सगळा ग्रह सुकून चालला होता . खूप कमी ठिकाणी आता छोटस
तळ राहील होत पण लोकांची संख्या एवढी कि ते आम्हाला पुरत नव्हतं . इतकी वाईट परिस्थिती
होती कि…… मी, बाबाना आणि काही लोकांना बोलताना
ऐकलेलं कि हा ग्रहच सोडून जाव लागेल किंवा दुसरा ऑपशन म्हणजे पाण्यावाचून जीव गमवावा
लागेल.
माझे बाबा हे
जिवंत राहिलेल्या आमच्या ग्रुप चे main पुरुष म्हणजे लीडर , आमच्यात काही सायंटिस्ट
काका पण होते ते रोज कसला तरी अभ्यास करत , वेगवेगळे प्रोटोटाईप बनवत असत पण यश काही
येत नव्हतं.
एकदिवस संध्याकाळी
ते अचानक ओरडतच बाहेर आले काय बोलावं हे त्यांना अजिबात समजत नव्हतं , भावना जेव्हा
उच्च पराकोटीच्या टोकाला असतात ना तेव्हा शब्द
असे एकदम नाहीसेच होतात अगदी तस त्यांना झालेलं , आज त्यांच्या प्रयन्तांना यश आलं
होत काहीस खूप कठीण मोठ मोठं ते बोलत होते.
मला एवढंच कळलं कि आमच्या ग्रहापासून काही
तरी million km अंतरावर , सूर्यमालेतील तिसरा
एक सुंदर ग्रह आहे , तो दिसायला निळा म्हणून त्याला नीलग्रह असं नाव ठेवलय
, तिथे म्हणे दिवस फक्त १ तास छोटा असेल , आताच्या आमच्या परिस्थिती हे आम्हला काही
मोठं वाटलं नाही , आणि काका सांगत होते कि तिथे वर आकाशा कडे बघितलं कि फक्त एकच चंद्र
दिसेल ...... हे असं कस, इथून आज मी वर बघितलं कि आम्हाला दोन दोन चंद्र बघायची सवय
, तर
तिथे आम्ही पोहोचू शकलो तर जिवंत राहू
, श्वास घेऊ शकू, पाणी तर भरपूर पियू शकू , तिथे म्हणे पाण्याचा खूप मोठा स्रोत आहे,
हिरवी झाड , वेली आहेत . त्या ग्रहाचा ७०% भाग पाणी आणि ३०% भाग जमीन आहे . मोठे मोठे
समुद्र पाण्याने गच्च भरलेले , खळखळ वाहणाऱ्या मोठ्या नद्या आहेत , ,उंच उंच डोंगर आहेत , आणि तिथे पाऊस
पडतो असं काका सांगत होते पाऊस म्हणजे वरून आकाशातून पाणी येत म्हणे ,,,,,, कसलं छान
ना ... मी तर कधीच पाऊस पहिला नाही मला तर पाऊस बघायला जायचंच ह्या निळ्या ग्रहावर. आणि मी ठरवलंच आहे कि मी काका ना ह्या ग्रहावर कस
जायचं , कस पोहोचता येईल ह्या संशोधनात मदत करणार
आता ठिकाण पृथ्वी
:
अंतरिक्षातल्या
गूढ शोध यंत्रणांनी पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना एका अद्भुत घटनेची जाणीव करून दिली.
आपल्या सौरमालेच्या सीमेवर काही अद्भुत वस्तू आल्या होत्या. त्या पृथ्वीवरील कोणत्याही
यानासारख्या नव्हत्या. त्या मोठ्या आणि चमचमीत
होत्या, असं वाटत होतं की त्या फक्त बुद्धिमान योजनेनेच तयार केलेल्या असतील. हे खगोलयान
इतर ग्रहांवरून आलेले अंतराळयान असावेत, अशी शंका शास्त्रज्ञांना येत होती.
हे दृश्य पाहून
पृथ्वीवरील सर्वच देशांमध्ये भीती आणि उत्सुकता पसरली. शास्त्रज्ञ, अंतराळ संस्था,
आणि खगोलशास्त्रज्ञ प्रत्येक क्षणाला त्यांच्यावर लक्ष ठेवीत होते, त्यांच्या हालचाली
तपासत होते. पण या यानांचा कोणताही आक्रमक हेतू दिसत नव्हता. उलट, त्यांच्या संथ चालणाऱ्या
गतीतून असं जाणवत होतं की, ते कुठेतरी सुरक्षित निवारा शोधत असावेत.
मग एके दिवशी,
पृथ्वीच्या कक्षेत येताच त्या यानांतून एक संदेश आला. संदेशाचं भाषांतर करण्यात शास्त्रज्ञ
यशस्वी झाले, आणि त्या संदेशाने सगळ्यांच्याच मनाला हेलावून टाकलं.
“आम्ही एका
मरणासन्न ग्रहाची लेकरं आहोत,” संदेश असं म्हणत होता. “आमचा ग्रह कोरडा पडला आहे. थांबवता
न येणाऱ्या दुष्काळाने आणि असह्य हवामान बदलामुळे आता तो राहण्यायोग्य राहिलेला नाही.
आम्ही तुमच्याकडे संरक्षणाची आशा बाळगून आलो आहोत. आमचं जग उद्ध्वस्त झालं आहे आणि
आमचं भवितव्य इथल्या बालकांमध्येच आहे. कृपा करून आमच्या मुलांना आश्रय द्या, त्यांचं
जीवन सुरक्षित ठेवा.”
हा संदेश पृथ्वीभर
प्रसारित झाला, आणि सर्वजण या आर्त विनंतीने भावविव्हल झाले. हे यान म्हणजे एका नष्ट
होणाऱ्या संस्कृतीचा आशेचा शेवटचा किरण होता. ते मुलांनी भरलेलं होतं – निष्पाप, भीतीने
भरलेलं आणि या नवं ग्रहावर केवळ जगण्याची आशा ठेवलेलं.
पृथ्वीवर आल्यावर
त्या मुलांचा चेहरा पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला. दुष्काळ आणि अतीव
हवामान बदलांमुळे हे मुलं खूपच सुकलेली, पांढरट आणि कृश दिसत होती. त्यांचे मोठे आणि
खोल डोळे, पातळ आणि अत्यंत अशक्त शरीर बघून सगळ्यांना त्यांच्याविषयी करुणा वाटली.
आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीराची रचना आपल्यासारखीच होती. त्यांचे हात,
पाय, डोळे, सर्व अवयव आपल्या मानवांसारखेच होते, आणि हे पाहून शास्त्रज्ञ विस्मयचकित
झाले. या मुलांचे शरीरशास्त्र आणि मानवी शरीरात आश्चर्यकारक साम्य होते, जणू काही ते
पृथ्वीवरीलच एक भाग होते.
पण या मुलांकडे
एक आणखी आश्चर्यजनक कौशल्य होतं—ते पृथ्वीवरील भाषा समजू शकत होते आणि त्याहीपेक्षा
अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ते मानवांचे विचार देखील वाचू शकत होते. शास्त्रज्ञांनी
त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आलं की, त्यांना कोणतीही भाषा शिकवण्याची गरज नव्हती.
त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती, जणू त्यांच्या डोळ्यांनीच संवाद साधत होते.
आपल्यावर लक्ष ठेवणारं प्रत्येक व्यक्ती काय विचार करतंय, हे ते सहजपणे समजू शकत होते.
पृथ्वीच्या
नेतृत्वाने लगेचच मदतीसाठी एकत्रितपणे प्रतिसाद दिला. अत्यावश्यक चर्चा घेऊन, मानवांनी
या मुलांसाठी सुरक्षित निवारा देण्याचं ठरवलं. त्यांनी त्या मुलांचं स्वागत केलं आणि
त्यांचं सगळ्या प्रकारे रक्षण करण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या आरोग्यासाठी आणि भावनिक
आवश्यकतांसाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली, आणि वैज्ञानिक, वैद्यकीय तज्ञ एकत्र येऊन
त्यांचे संगोपन करू लागले.
हे फक्त काही
scientist आणि काही लोकांनाच माहित आहे . जस त्यांनी हे गुपित सांभाळलं तस आम्ही देखील
आणि तस तू सुद्धा सांभाळ आणि आता हि एक
sci - fi समजून विसरून जा ओक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा