mazionjal

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

प्रचार

 बाई बाई बाई, काय ही निवडणूक,

प्रचाराच्या रिक्षे ने केली दुपारच्या झोपेची पिळवणूक

आज हे चिन्ह, तर उद्या घेऊन येते दुसरं,

कर्कश्श हिच्या आवाजात ,सुचत नाही काही दुसरं- तिसरं

 

सतत लाऊडस्पीकरची चालूच असते गडबड,

कधी शब्द असतात  गोड, तर कधी असते बडबड

"हेच तुमचं भलं करणार," सांगत असतात हात जोडून

पण निवडून गेल्यावर सगळं जातात विसरून .

 

भाजी घ्यायला जाताना दिसतात रंगीत मोठे बॅनर

हात जोडून , पांढरे शर्ट घालून दादा दाखवतात मॅनर

गल्ली गल्ली तुन पायी फिरून विनवतात हात जोडून

आपलं मत आम्हालाच द्या सांगतात  गोड बोलून

 

झोप मोडली, मन थकवलं, प्रचाराच्या गोंगावात ,

माझा दिवस रोज जातो गोंगाटाच्या ह्या  धबधब्यात.

कधी लागते एकदाची आचारसंहिता असं मला झालय

थांबेल सगळं , संपेल गोंगाट , नको नको केलय

 

गौरी एकबोटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा