mazionjal

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

Humalien


हि गोष्ट सुरु होते  जुलै १९६९ , नासा ने पाठवलेल्या Apollo ११ ह्या spaceflight च sucessfull landing नंतर ह्या space शिप मध्ये नील आर्मस्ट्रांग आणि ऐडविन "बज़" ऐल्ड्रिन. हे पहिले असे मानव आहेत जे चंद्रावर जाऊन आलेले. परत येताना त्यांनी तिथली माती आणि काही खडकांचे नमुने आणले . अस म्हणतात कि नील ने तिथे काही वस्तू ठेवल्या एक सोनेरी पान आणि एक recored संदेश ज्यात मानवच्या अस्तित्वा बद्दल माहिती होती . आणि ते तिथून निघाले .
पृथ्वीय वेळेच्या नुसार ऑगस्ट १९६९ चंद्रावर पहिलेच असलेल्या अलिएन spece center ला ते पान आणि तो संदेश मिळाला . त्यांच्याच एका निरीक्षण करणाऱ्या विमानाला ते सापडलं , मानवाचं चंद्रावर येण आणि काही नमुने घेऊन जाण  हे त्यांना आधीच माहित होत , even त्यांच्या एका यंत्राने त्याचं हे सर्व mission  कॅमेरा मध्ये रेकॉडे पण केल होत . ते कसे उतरले, किती लोक चंद्रावर उतरले , कोण चंद्राच्या orbit मध्ये घिरट्या घालतं होत  , परत कसे गेले, उतरल्यावर काय केल , काय बोलले , काय सोडून गेले , त्यांचा उद्देश काय होता , हे सर्व त्यांनी रेकॉर्ड केल .
ह्या massage मिळाल्यावर लगेचच चंद्रावर एक मीटिंग बोलावण्यात आली , Mars वरून महत्वाचे  VIP लोक चंद्रावर बोलावण्यात आले . कारण त्यांच्या दृष्टीने चंद्र हीच सध्यासाठी सगळ्यत सुरक्षित अशी जागा होती.  खूप विचार मंथना नंतर ठरवण्यात आले कि पृथ्वी वरची मानव हि आपल्या दृष्टीने योग्य पर्याय आहे , मानव जात चंद्रा वर पाउल ठेऊन जाते म्हणजे त्यांनी बौद्धिक दृष्ट्या आपल्या basic level ला पार केल आहे. ते आपल्याला ह्या संकटातून वाचवतील, मदत करतील ,आणि ते आपल्या बाबतीत खूप उस्तुक हि आहेत , हे आपण केल्यालेल्या त्यांच्या अभ्यासावरून लक्षात येते तर आपण स्वतः हून त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी बोलन करून करार करायचा. आता ह्या शिवाय आपल्या कडे पर्याय नाही. आपल्या ग्रहीय जातीच अस्तित्व टिकवायच असेल तर आता पृथ्वी ची मदत आपल्याला घ्यावीच लागेल , आता लांबून त्याचं निरक्षण करण बंद करून direct संवाद साधायला हवा अस ह्या मीटिंग मध्ये ठरवण्यात आल .
इकडे पृथ्वीवर आणलेल्या नमुन्याची चाचणी सुरु झाली होती , आपल mission sucessful झाल ह्याची party सुरु होती . नील आणि ऐल्ड्रीन च्या मुलाखती सुरु होत्या . आणि अशाच एका संध्याकाळी नासा center ला एक संदेश चंद्र्वरून पाठवण्यात आला ,त्यात फक्त “हेल्प ...need you ...” असाच होत , आणि विशेष म्हणजे हा massage इंग्लिश मध्ये होता .
नासा ने त्या massage ला reply पाठवला , “we are ready to help”,  हा massage मिळताच चंद्रावर सगळ्यांना आनंद झाला , एक आशेचा किरण दिसल्या सारख त्यांना जाणवल , आपण जगू हि एक आशा निर्माण झाली आणि लगेचच पुढची भेटण्याची तयारी दाखून आम्हीच तुम्हाला भेटतो म्हणून कळवण्यात आल .
पृथ्वी वरचे तर उस्तुक होतेच , अलिएन शिप पृथ्वीवर वाळवंटात land झाल आणि तिथेच मीटिंग ठरली .
त्यांनी Mars वरची सध्याची त्यांची परिस्थिती सांगितली , आम्हीच निर्माण केलेले जैविकअस्त्र आम्हालाच घातक ठरले . आमच्या  इथे खूप मोठ्ठ युद्ध सुरु आहे , त्यात जैविक हत्यार ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे , कुणीच कोणच ऐकायच्या परिस्थिती नाही , ह्या युद्धा चा परिणाम म्हणजे आमची नवी पिढी हि अपंग , आजारी होत आहे , आमच आयुष्यमान पण कमी झालय , सगळी कडे आजार वाढतच आहेत .तुम्ही जे आमची काही फोटो पाहिलेत ते सगळे ह्या जैविक अस्त्राचे शिकार आहेत , आम्ही दिसायला अगदी तुमच्या सारखेच आहोत पण ह्या अस्त्राचा परिणाम ... हे आम्ही आमच्या लोकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती लोक ऐकण्या बाहेर गेलीत .Mars ग्रह सोडून दुसरी कडे जाण  हा एकच पर्याय आमच्या पुढे आहे म्हणून आम्ही राहण्याची वेगळी जागा आणि आमची नवी सुदृढ पिठी निर्माण करण्यासाठी पृथ्वीच्या चंद्राची निवड केली पण ह्यात आम्हाला तुमची मदत व्हावी अशी अपेक्षा ठेऊन तुमच्याशी स्वतः संपर्क साधला.
पृथ्वीय लोकांनी त्याचं म्हणन ऐकल , आणि मदत करण्याची तयरी पण दाखवली , शिवाय तुम्ही पृथ्वीवर या म्हणून पण सुचवलं , पण त्यांच्या म्हणण्या नुसार पृथ्वी वर राहाण हे त्यांना जमणार नव्हत , तुम्ही पृथ्वीवासी खूप लवकर दुसर्या वातावरणात सामाऊन जातात , खूप लवकर परिस्थिती नुसार बदल घडून आणतात , पण आम्ह्च्या लोकांना ते शक्य नाही आम्ही एकदा तुम्हाला न सांगता काही आमची लोक तुमच्या इथे प्रस्थापित करून पहिली पण ती रुळू नाही शकली ,थोड्याच वेळात त्यांना आम्हाला परत बोलावाव लागल , त्या साठी आम्हाला एक वेगळा ग्रहच शोधावा लागेल आणि तो म्हणजे चंद्र .
पण मग तुम्ही पृथ्वी वासियांन कडून कोणती मदत मागता हे नाही कळाल आम्हाला ?
“आम्हाला एक करार करायचा आहे तुमच्याशी “.  “करार ? कोणता करार?” “सांगतो आम्ही Mars वासी बुद्धीने जरी तुमच्या पेक्षा चौपट असलोत तरी सध्या आम्ही शारीरिक दृश्य कमकुवत झालो आहोत आम्हाला तुमच्या लोकांच्या मदतीने आमची पुढची पिढी भक्कम आणि सुदृढ करायची आहे , त्या साठी तुमच्या ग्रहावरचे लोक आमच्या ग्रहावरच्या लोकां बरोबर राहून त्यांचा संक्रमणातून एक नवी पिढी तयार करतील तरच ते शक्य आहे. त्यांना आमच्या आजाराचा कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ आणि तुम्ही आम्हाला ती सुदृढ पिढी द्यावी “
तस बघितल तर खूप सोप्पा उपाय होता हा पण ह्यात हि एक अट होती  Mars वरील स्री किवा पुरुष हे आनंदाने जर मनुष्य स्त्री किवा पुरुषाला स्वीकारतील तर च नवनिर्मिती होईल नाही तर नाही , ह्या साठी त्यांनि एकमेकांना  आकर्षित करण, एक विश्वास निर्माण कारण गरजेच , आणि त्या साठी एकत्र राहण गरजेच आहे .
ह्यावर खूप विचार केल्यावर एक निष्कर्ष काढण्यात आला कि Mars काही सुदृढ उरलेले लोक, काही दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवतील , त्यांना ह्या करार बद्दल काही सांगण्यात येणार नाही आणि तसच पृथ्वी वासियांनी पण गोपनीयता ठेवावी , त्यांच्यातून ज्यांची मन जुळतील त्यांना पुढे चंद्रावर राहण्या योग्य वातावरण करून शिफ्ट करण्यात येईल . आणि तेव्हाच सत्य सांगण्यात येईल .”
ह्या बदल्यात Mars पृथ्वी वासियांना बौद्धिक क्षमता कशी वाढवता येईल ह्याचे तंत्र देइल शिवाय नवीन तयार होणारा ग्रह म्हणजे त्यांची नवी पिढी हि पृथ्वी शी मैत्रीचे संबंध ठेवेल आणि मदत देखील करेल आणि नवीन शोधात सुद्धा Mars सर्व प्रकारे पृथ्वी ला मदत करत राहील. शिवाय Mars वरील वातावरण परत पूर्ववत झाल कि पृथ्वी वासी हव तेव्हा येऊ जाऊ शकतील .त्यासाठी सर्व योग्य ती दळणवळण हे Mars बघेल .
सर्व अटी मान्य होतात , आणि mars वरून काही लोक पृथ्वी वर येतात त्यात निओ पण असते . निओ अतिशय सुंदर आणि धाडसी मुलगी . सुंदर म्हणजे पृथ्वीच्या भाषेत एकदम अप्सराच , अलीएन असे पण असतात हा  तिला बघितल्यावर पडणारा प्रश्न , सावळी  तुकतुकीत कांती , लांब भूरे केस , नाजूक जिवणी , कामनीय बांधा , पाणेदार टप्पोरे तपकिरी डोळे, सुमधुर आवाज , लांबसडक नाजूक बोट , आणि कमालीची धाडसी वृत्ती , पृथ्वीच्या एखाद्या लावण्यवती सारखीच होती निओ , बघितल्यावर कोणीही तिच्या प्रेमातच पडेल आणि लक्षात पण येणार नाही कि हि परग्रहीय आहे . ह्या आधी सुद्धा  एका research साठी Mars ने तिला पृथ्वीवर पाठवले होते ,पण तो कालावधी खूप कमी होता , आता हि एका research साठी आणि Observation साठी आपण येथे पाठवण्यात आलेलो आहोत असच तीला सांगण्यात आल होत. आधीच्या visit मध्ये ती समीर ला भेटली होती , आणि तेव्हाच तो तिला आणि ती समीर ला खूप आवडली होती . पण कमी कालावधी असल्यामुळे ती कधी त्याच्याशी बोलली नाही .
ह्या वेळेला तिला Task अजून appoint  झाल नव्हत . म्हणून तिने समीर चा शोध घ्यायला सुरुवात केली .मागच्या वेळेस ते जेथे भेटले होते तिथे ती पोहोचली . तिने खूप शोधलं पण समीर काही भेटला नाही . हताश होऊन परतांना वाटेवर तिला समीर दिसला , आणि न कळत तिने त्याला हाकच मारली , समीर सुद्धा तिला बघून खुश झाला , पण हि इथे कशी , आपण तर फक्त नजरानजर भेटलेलो , मग हिला माझ नाव कस माहित  , हा विचार करत असता निओ त्याच्या समोर उभी राहिली , “hello समीर मी निओ , ओळखलस का आपण भेटलेलो मागच्या वर्षी, ”हो मी ओळखल, पण तुंला माझ नाव कस माहित आणि आपण बोललो पण नव्हतो ‘’ “अरे हो , माझा प्रोजेक्ट खूप कमी दिवसाचा होता तुझ्या कंपनी मध्ये , आपण बोललो नाही पण माझ्या एका सहकाऱ्याने तुझ नाव मला सांगितल , तू मला तेव्हा development  ला मदत केली त्या बद्दल मला तुला thank you म्हणायचं होत पण माझ काम झाल आणि मला परतावं लागल आणि आपण भेटूच शकलो नाही ” “हो ,,, मला पण तुंला काही सांगायचं होत पण राहून गेल .... ” , “ह्यावेळेला मी खूप दिवसासाठी आलेली so भेटूयात आपण”.  “हो,  नक्की ” “तू कुठे राहतोस , सध्या माझी राहण्याची काही सोय होऊ शकेल का रे कारण ह्या वेळेला माझ्या parent शिप ने काही सोय नाही केली ” ‘काय parentship ? ‘’, “हो ... म्हणजे office ने ” , “ok , काही प्रोब्लेम नाही , माझ्या घरा शेजारी एक flat आहे तो आपण विचारू , तुला सोबत पण होईल ” “ok , चल ” , समीर निओ ची सोय करून देतो , ह्यावेळेला तिला फक्त Observation करायचं काम होत आणि report दिवसाच्या शेवटी Mothership ला सेंड करायचे . हे काम खूप सोप्प होत , म्हणून मग निओ रोज वेग वेगळ्या area स्कॅन करत होती , कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने एक DSLR कॅमेरा सोबत घेतला होता आणि ती फोटो पण घेत होती कि जेणे करून एक Traveler  वाटेल . संध्याकाळी परतत असताना ती समीर बरोबर येत असे , ह्या मुळे दोघात खूप कमी दिवसात खूप मस्त मैत्री झाली होती . आणि समीर ला तर ती पहिल्या भेटीतच आवडली होती .
एक दिवस समीर च्या office मध्ये break मध्ये गप्पा सुरु होत्या , त्याच्या एका सहकाऱ्याचा  ज्योतिष विषयी अभ्यास चांगलाच दांडगा होता  , त्या दिवशी त्याने गम्मत म्हणून  समीर चा हात बघितला आणि ते बघून तो थोडा हादरलाच , “समीर तू एका विशिष्ट कामा साठी ह्या जगात आहेस , तुझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ होणार आहे , ती नक्कीच चांगलीच आहे पण तुला ती , तुला काय आख्या जगासाठी ते नवीन असणार आहे , आणि लवकर ते तुझ्या आयुष्यात घडेल , एक नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझ जगच बदलून जाईल ” एवढच सांगून तो निघून गेला . समीर विचार करत होता , नवीन व्यक्ती कदाचित ती निओ असेल , ती आहे च मुळी  वेगळ्या देशाची , म्हणून हा अस बोलला , पण जे काही होणार ते चांगलच न मग काही प्रश्नच नाही .
आज तो निओ ला prapose करणार होता , तस त्याने ठरवलच होत . दुपारीच त्याने तिला फोन केला आणि नेहमी भेटतो  तिथे संध्याकाळी ये म्हणून सांगितल , संध्यकाळ कधी होते ह्याचीच तो वाट बघत होता , ती हो म्हणेल का , कि नाही म्हणेल ह्याच विचार तो होता , दुपार काही लवकर सरत नव्हती त्याची , तो सतत घड्याळात बघत होता , उस्तुकता, आनंद आणि भीती अस सगळच एकदम त्याला जाणवत होत , शेवटी office सुटल आणि तो निघाला , निओ आधीच तिथे पोहोचली होती , मारून रंगाच्या चुडीवर ड्रेस मध्ये ती जास्तच सुंदर दिसत होती , समीर ने एक rose bouquet तिच्या साठी घेतला होता , गेल्या गेल्या लागलीच कुठलाही आडपडदा न ठेवता कुठली हि लाज न बाळगता , कुठली हि भीती आपल्यावर हावी होण्याच्या आत समीर गुडघ्यावर बसला आणि त्याने तिला माझ्याशी लग्न करशील म्हणून विचारल , निओ ला हे अपेक्षित होतच पण इतक्या sudden नव्हत , तिने लगेच त्याला हो म्हंटल . त्या दिवशी जाम खुश होते दोघे , समीर एक अनाथ मुलगा , त्याच्या एका लांबच्या नातेवाईक त्याला सांभाळ होते , त्याचे आई वडील एका अपघातात गेले आणि त्या नंतर तो त्या त्याच्या नातेवाईक कडेच मोठा झाला त्यांना हि मुलबाळ नसल्याने स्वतः च्या मुला प्रमाणे त्याला वाढवल होत , काकाचं हि वय झाल होत आणि काकू जाऊन एक वर्ष झाल होत .
हि सगळी गोष्ट त्याने निओ ला सांगितली , काकाच माझे सर्वेसर्वा आहेत . पण सध्या खूप आजारी असतात .  म्हणून आपण उद्याच लग्न करूयात , निओ काही बोलण्याच्या आतच समीर तयारी साठी निघून गेला , उद्या सकाळी आपण भेटू मी येतो तुला घ्यायला तयार रहाअस म्हणून तो तयारीला लागला . निओ रात्रभर विचार करत होती , तेव्हा तिला तिच्या mothtership मधून Congratulation  असा massage आला . ह्यांना कस कळल ,आणि Congratulation ? हे सगळ काय आहे ? तेव्हा mothtership मधून तिचे वडील तिला भेटायला आले आणि त्यांनी तिला सांगितल कि तुंला एक योग्य आणि सुदृढ जोडीदार मिळावा म्हणूनच तुला पृथ्वी वर आम्ही पाठवल होत , समीर खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे , तुझी निवड नक्कीच बरोबर आहे . ह्या पुढे आम्ही तुम्हा दोघानसाठी चंद्रावर एका सुंदर ठिकाणी तुमची राहायची सोय केली आहे , आम्ही त्याच्या काकांना पण हे सगळ सांगितल आहे .
लग्न होताच तुम्ही तिकडे शिफ्ट व्हाल आणि सुखी संसार करा . येवढ बोलून तिचे वडील परत अदृश्य झाले . दुसर्या दिवशी समीर तिला घ्यायला आला , लग्नाच्या ठिकाणी लग्नाच्या अगोदर निओ चे वडील आणि अजून काही लोक निओ आणि समीर ला भेटायला आले . समीर ला लग्ना अगोदर सर्व कळाव अशी निओ ची इच्छा होती , म्हणून निओ चे वडील तीथे आले त्यांनि  जे निओ ला सांगितला ते सर्व समीर ला सांगितल , हे समीर साठी खूप नवीन आणि आश्चर्यकारक होत . निओ एक अलीएन आहे , हे सुद्धा , निओ ने अगोदर खूप वेळा त्याला सांगण्याचा प्रयन्त केला पण समीर ऐकण्याचा परीस्थित नव्हता .काकांना हि हे सर्व माहित आहे हे कळल्यावर तर समीर अजून आशर्यचकित झाला .
निओ चे बाबा त्याला बोलले कि आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच आहोत फक्त बुद्ध्यांक  आणि खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या , बाकी तू निओ ला ओळखतोस . आता तूच ठराव काय निर्णय घ्यायचा. समीर विचार करतो त्याला त्याच्या त्या मित्राच बोलण  आठवत आणि  हे हि आठवत कि तो एका विशिष्ट कामा साठी येथे आलाय कदाचित ते काम म्हणजे हेच असेल . बराच वेळ विचार केल्या नंतर समीर एक निर्णय घेतो आणि सगळ्यांना सांगतो , मी निओ वर खरच खूप मनापासून प्रेम केल , मला ती पहिल्या भेटीतच खूप आवडली , मला तिच्यात वेळ अस काही जाणवलच नाही . आणि आता जेव्हा कळतय कि ती एक परग्रहीय आहे तर मी तिला सोडून देऊ , कस शक्य आहे ,त्याच हे बोलन ऐकताच निओ त्याला मिठीच मारते . ती दोघ लग्न करतात . काही दिवस पृथ्वीवरच राहून मग त्यांना चंद्रावर एका सुंदर वस्तुत शिफ्ट केल जात , ते तिथे पोहोचण्या आगोदरच तिथे अजून ४-५ संसार आधीच सुरु झालेले असतात ,   








शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

बंध


एका स्त्री च आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असत ,प्रत्येक बदल  काही स्त्रिया स्वीकारता  , परिस्थिती वर मात करून परत हिम्मतीने ती  पुढे वाटचाल करता  एका नवीन सुरुवातीसाठी,  अवनी अशीच एक .....
नानासाहेबांना एकुलती एक लेक,,,,, खूप लाडात वाढलेली ... पण लाड हे कधी उतू नाही गेले
नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान ,वागणूक ,खंबीरपणा पण दिला ... जन्मच्या वेळेलाच आई गेली पण त्यांनी आई ची कमी कधी तिला नाही जाणवू दिली
मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिल , स्वतःच्या पायावर उभं केलं . तिला कॉम्पुटर मध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कॉम्पुटर इंजीनीरिंगला घातलं .
पुढे तीला एका मोठ्या कंपनी मध्ये चांगला जॉब पण मिळाला . सगळं कस छान चाललं होत , पण नियतीने काही वेगळंच वाढून ठेवलेलं होत अवनीच्या आयुष्यात

कंपनी मध्ये काम करत असलेल्या अनुराग ला ती खूप आवडायची आणि तिला हि तो .. खूप हिमतीने त्याने तिला propose केलं ,,, आणि तिला हि ते खूप अपेक्षित होत  तिने ते स्वीकारलं
खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिल . लग्ना नंतर अवनीने जॉब सोडून दिला  , पुढच्या महिन्यातच अनुराग ला Tech lead म्हणून प्रमोशन मिळालं  , सोन पावलांनी सून घरात आली म्हणून आई बाबाना अवनीच  खूप कौतुक होत , तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अट्याक मध्ये नानासाहेब गेले , त्यांच्या जाण्याने अवनी ला खूप त्रास झाला , तिच्या साठी ते खूप मोठा आधार होते , नानासाहेब तिचे आई, वडील आणि एक चांगला मित्र हि होते . एखाद वासरू कस त्याच्या आई पासून दुरावला कि कावरबावर होत तशी अवस्था अवनीची झाली होती पण  आई बाबानी त्यांची जागा अवनीच्या आयुष्यात घेतली तिला ती एकटी आहे हे जाणवू पण नाही दिल , तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईनी खूप  साथ दिली त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या, स्वतःच्या मुली सारखं ते तिला समजत सून म्हणून कधी अवनी त्यांना वाटलीच नाही . लग्नाला एक वर्ष झालं त्या दिवशीच अनुराग ला पुढचं  Architect म्हणून प्रमोशन  मिळालं, सगळे खूप खुश होते . असे आनंदात दिवस जात होते ,  पण ह्या सुखाला कुणाची नजरच लागली जणू , लग्नाला आता २ वर्ष झाली होती काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अनुराग कडचे मागे लागले होते . पण अनुराग ला अजून नवी जवाबदारी नको होती . त्याला करिअर   job वर concentrate करायचं होत , त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध अवनी च होत तीच स्वप्न एका छोट्याश्या घरट्याच राजाराणीच्या संसारच होत ,,, अशामुळे अताशा त्यांच्यात भांडण व्हायला सुरवात झाली होती , चीड चीड होत होती दोघांची ,, अनुरागच्या आई वडील ह्यांनी खूप समजावलं म्हणून अनुराग बाळा साठी तयार झाला खरा .....
त्या नंतरचे तीन चार महिने व्यवथित गेले आणि गुड news आली .... अनुराग चे आई वडील खुप खुश होते पण अनुराग अजूनही त्याच्या करिअरच्या मागे  होता त्याला  abroad  settle व्हायचं होत . त्यातून हि नवी जवाबदारी त्याला नको होती , त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती , खूप उशिरा पर्यंत तो ऑफिस मध्ये काम करू लागला होता , घरी खूप कमी वेळ तो यायचा अवनीला  वाटायचं कि बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्या साठी तो हे सगळं करतोय म्हणून ती हि काही बोलायची नाही . अश्याच मनस्थिती मध्ये अनुराग ची ओळख शालिनी शी झाली,  शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वय वर्ष ३०, अविवाहित . तिलाही कुठलीच जवाबदारी बंधन नको होती परदेशात जाऊन राहायचं मज्जा करायची  , पार्ट्या करायच्या , आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा गरजा  पूर्ण करायच्या अशी होती शालिनी. ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती , ह्यात बडे लोग शोधन हा प्रमुख उद्धेश होता .
एका ऑफिस मीटिंग मध्ये अनुराग आणि शालिनी ह्याची भेट आणि ओळख झाली होती. शालिनीला अनुराग खूप आवडला होता शिवाय त्याच background कळल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही , हळू हळू ती त्याच्या जवळ जाऊ लागली , ओळख वाढवू लागली , तो ज्या मीटिंग ला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बघून बसू लागली , अनुराग ला पण तीच असणं आवडू लागलं ती नसली तर तो बेचैन व्हायला लागला , तिला ऑफिस मध्ये तो शोधू लागला , त्याने तिला त्याच्या प्रोजेक्ट मध्ये सामील करून घेतलं होत  

आता अवनीला तीन महिने पूर्ण झाले होते , अनुराग आपल्याला टाळतोय हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होत ,आता तर तो दिवस  दिवस बाहेर राहू लागला होता , रात्री सुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिस जात होता . तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयन्त पण केला   पण नेहमी प्रमाणे त्याने तिला टाळलं ,
इकडे ऑफिस मध्ये त्याला महिन्यासाठी US मध्ये कॅन्सास ला onsite  जायचं होत , नवीन प्रोजेक्ट तिथे सुरु होणार होता , त्यावर त्याने काम पण खूप केलं होत . आता शालिनी आणि त्याच प्रेम बरच फुललं होत , जस शालिनीला कळलं कि तो आता कॅन्सास ला जाणार ती लगेच त्याच्या कॅबिने मध्ये गेली आणि मला हि घेऊन चल म्हणून मागे लागली , तिच्या लडिवाळ बोलण्याला आग्रहाला अनुराग भुलला आणि स्वखर्चाने तीच पण बुकिंग केलं

जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं , अवनीला तर काय बोलू काहीच सुचलं नाही , अनुराग रात्रीच तयारी करून पहाटेच  बॅग घेऊन अवनीला सांगता निघून गेला  . सकाळी उठल्यावर तिला आईनी सांगतील तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता . म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं . त्या संपूर्ण दिवस अवनी ला काहीच सुचल नाही . असं अनुराग का वागतोय तिला कळत नव्हतं . इकडे अनुराग ने शालिनीला pickup  करून मुंबई गाठलं होत . त्यादिवशी मुंबई हुन रात्री :३०च flight  होत , ते दुपार पर्यंत मुंबईत पोहोचले होते , मुंबईतच त्यांनी शॉपिंग ठरवलं होत , शॉपिंग नंतर ते एका हॉटेल मध्ये मस्त जेवण आणि मग एअरपोर्ट  असं प्लॅन प्रमाणे चाललं होत ,

इकडे अवनी मन कशातच लागत नव्हतं काहींतरी विचित्र होतंय असं सारखं तिला जाणवत होत , पण नक्की काय हे काही कळत नव्हतं . रात्री कसतरी करून झोप लागली तिला पण अचानक दचकून जाग आली , स्वप्न खूप घाणेरडं पडलं होत , कुणीतरी अनुरागला तिच्या पासून ओढत दूर नेत होत परत थोडं पाणी पिऊन तीन  झोपायचा प्रयत्न केला

असेच दिवस  जात होते इकडे अनुराग आणि शालिनी मजेत चाललं होत , अनुराग ला जाऊन तीन महिने झाले होते
ह्या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता  बाबांनीच त्याला दोन वेळा खुशाली साठी कॉल केलेला
नंतर त्याने बरयाचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं . तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅट वर राहतोय हे त्यांना नंतर कळलंतो असं का वागतोय त्यांना नाही समजलं
अवनीला आता सातवा महिना सुरु होता , आणि अचानक रात्री बाबांच्या (सासऱ्यांचा ) मोबाइल वाजला , अनुराग चा आहे  असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला ते तिघेही खूप खुश झाले अवनीला तर आनंदच मावत नव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला , काय होतंय हे तिला आणि त्याच्या सासू ला काही काळात नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलतोय अनुराग हे मात्र नक्की
आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते काय झालं म्हणून आईनी विचारलं तर बाबा बोलले कि तो दुसरं लग्न करतोय  आणि तो अवनीला डिवोर्स ची नोटीस पाठवतो आहे .
हे एकूण तर अवनीच्या पाय खालची जमीनच निसटली, रडणं सुद्धातिला सुचलं नाही , आई बाबा तर खचूनच गेले. दुसरं लग्न , कोणाशी , कोण आहे ती , का , कशाला असे  अनेक प्रश्न एकदम अवनीला भेडसावून गेले
ह्या नंतर तिसऱ्याच दिवशी अनुराग ने एका वकील तर्फे अवनीला नोटीस पाठवली . सातवा महिना संपायला आलेला होता , आणि अवनीला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला आई बाबानी तिला लगेचच दवाखान्यात ऍडमिट केलं . ब्लीडींग सुरु झाल्यामुळे डॉक्टर नि तिच ऑपेरेशन सांगितलं सिझिरेयन करून डिलिव्हरी केली, मुलगी होती , येवडूस बाळ एका पेटीत ठेवलं , अवनीला तर अजून शुद्धच आली नव्हाती . त्या दिवशी अनुरागचा बाबाना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून  , बाबानी बाळच त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेऊन दिला ,
अवनीला शुद्ध  आली बाळ कस आहे तिने विचारल , आईनी सांगितलं मुलगी आहे , बाळ व्यवस्थित आहे . फक्त हे ऐकून अवनीला जरा बर वाटलं
एक आधार वाटला तिला , तिने सगळं बळ एकवटून बाबानं कडून त्या डिवोर्स पेपर वर सही केली , आणि बाबाना बोलली बाबा सांगा त्याला कि तू आता मुक्त आहेस आमची कुठलीही जावबदारी तू मानू नको किंवा आमचा कुठलंही तुला त्रास होणार नाही .

बाबानी खूप दिवसांनी पहिली लग्न करून आणलेली अवनी बघितली , खूप छान वाटलं त्यांना , अवनी बेटा तुला माझा आणि हीचा कायम पाठींबा असेल , आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला ,,,, पण वाईट वाटून घेऊ नको तू आमची मुलगीच आहेस

दोन दिवस बाळ खूप छान response देत होत पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते , डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण ..... शेवटी व्हायचं तेच झालं ते त्या छोट्याच्या नाजूका ला नाही वाचवू शकले

अवनी वर तर संकट जस काही एक एक करून वारच करत होते , आई बाबा आणि अवनी त्या दिवशी खूप रडले , त्या एका आशेवर अवनी सगळं विसरायला तयार झाली होती , तिच्यात हिम्मत आली होती , पण ती किरण सुद्धा विझली होती देव इतका निष्ठुर कसा होऊ शकतो ,

दुसऱ्या दिवशी आई बाबानी अवनीला घरी आणलं ,,, पण अनुरागच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या ....
अनुराग मात्र पूर्णपणे शालिनीमय झाला होता , लिव्ह इन रेलशनशिप मध्ये अनुरागच्या  पुण्याच्या कल्याणी नगरच्या  फ्लॅट मध्ये  ती दोघे राहत होती  , पैसा तर शालिनी पाण्या सारखा खर्च करत होती
.अनुराग कमावत होता आणि शालिनी उधळत होती ,पण अनुराग च्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती

अवनी ला एक एक दिवस युगा सारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अनुराग तिला डोळ्यापुठे दिसत होता
तिची अवस्था बघून आई बाबा सुद्धा हळवे झाले होते 
पोरीला ह्यातून कस बाहेर काढायचं , ह्याचाच ते विचार करत होते .
अवनीला तर वेळ , दिवस , तारीख , काहीच लक्षात नव्हतं , जेवण पण आई नि बोलावलं तर बाहेर यायची काहीतरी मोजून दोन घास खायची कि परत रूम मध्ये . काय होऊन बसलं हे .. पोर तरी हिम्मतवाली पण एकावर एक घाव कसे सहन करत असेल तीच तिलाच माहित आई आणि बाबा म्हणत
काही तरी करून तिला ह्यातून बाहेर पडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होत
बाबांचे एक मित्र कुलकर्णी, हे प्राध्यापक होते एकदा असच बोलता बोलता त्यांनी त्यांची हि इच्छा त्यांना बोलून दाखवली , त्यांनी बाबाना सुचवलं कि त्यांच्या कॉलेज मध्ये lecturer साठी जागा आहे आपण तिला मनवू , थोडावेळ हि जाईल आणि मन हि रमेल कामात व्यस्थ राहील ती .
बाबाना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला .. ते लगेच घरी पोहोचले ,  आईना  त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णी च बोलणं सांगितलं आई पण खुश झाली पण अवनीला कस तयार करायचं हा मोठा प्रश्न होता .
आई तस तिच्याशी बोलायला तिच्या रूम मध्ये जात असत, आज हि त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या अवनीला  बोलल्या "तू ह्यातून बाहेरपड बाळ , तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सहन होत , निदान आमच्यासाठी तरी ... मी एक स्त्री म्हणून तुझं दुखणं समजू शकते .. पण तुझ्या पुढे आजून खूप मोठं आयुष्य आहे ,,, आम्ही काय वय झालेली मंडळी ,, आज आहोत उद्या च माहित नाही .... आहोत तो पर्यंत तुला नक्की साथ देऊ .. तू ह्यातून बाहेर पड  मला ह्यांना तुझ्यावर , तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे ... तू मनातून तयार हो ... उभारी धर ... ह्या आघाताला, तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे  .. उठ अवनी झटक हे सगळं ... " आणि त्या निघून जातात .
अवनि हे सगळं फक्त ऐकत  असते , त्या गेल्या नंतर ती त्याच्या बोलण्याचा विचार करते .
संध्याकाळी जेवायला आई अवनीला  आवाज देतात , टेबल वर आई बाबा तिची वाटच बघत असतात . अवनी येते पान वाढलेली असतात , सगळे सुरुवात करतात , थोड्याच वेळात बाबा हि आईनी बोललेला विषय काढतात ,, अवनी आई तुझ्याशी दुपारी  बोलली .... ते खरच आहे ... मला हि तू ह्यातून बाहेर यावं असं वाटत . तुझ्या साठी जे काही आम्हा दोघ म्हातार्यांना करता येईल ते आम्ही करू .. तुला नक्की साथ देऊ बाळ .. तू आमचीच आहेस ...आमच्यासाठी तू उभारी धर ... आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू नक्की ह्या परिस्थितून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णी शी बोललो त्याच्या कॉलेज मध्ये lecturer  ची vacancy आहे  . तू विचार करावा ह्याचा असं आम्हा दोघांना वाटत .
अवनी बाबांचं म्हणणं ऐकत असते .. जेवण संपवून ती परत तिच्या रूम मध्ये जाते . आत गेल्यावर तिला आईच बाबाच बोलणं आठवत , तिला नानासाहेब आठवतात त्यांना अवनीच असं वागणं कधीच आवडलं नसत ... त्यांनी सुद्धा जे आईबाबा बोलले तेच तिला सांगितलं असत . रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसत . अवनी रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करते . दुसऱ्यादिवशीची सकाळ हि अवनी बाबा आई ह्यांच्या साठी एक नवीन सुरुवात घेऊन येते
सकाळी आन्हिक आटोपून न बोलवता अवनी बाहेर येते , ती चहा साठी टेबले वर बसते , आई त्यांचा , बाबांचा आणि अवनीचा चहा आणतात , ती दोघांना सांगते मी तयार आहे interview साठी कधी जायचंय सांगा . आई बाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो , बाबा लगेचच कुलकर्णी ना फोन लावतात , उद्याची सकाळची ११वेळ ठरते , त्या दिवशी अवनी तिची जुनी पुस्तक चाळत  बसते आई ना ते बघून खूप छान वाटत .. पोर बाहेर पडते आहे ,,, हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असत . सकाळी ती आणि बाबा कॉलेज ला जातात अवनीचा interview  होतो , तो पर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात . ती दोन तासांनी बाहेर येते , बाबा खूप उत्सुकतेने तिच्या कडे बघतात ,,, ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबां जवळ येते आणि सांगते बाबा परवा पासून जॉइनिंग आहे . इतका आनंद बाबाना अनुरागच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला , जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आई ने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात आई ह्यातच सर्व समजून घेतात आणि अनानंदाश्रूनी दोघांचं स्वागत करतात . आणि अवनीच कॉलेज सुरु होत.
इकडे अनुराग आणि शालिनी च लिव्ह इन सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललं होत . कुठलाही बंधन नाही , ना कुणाची काही जवाबदारी, ना कुणी प्रश्न विचार होत , हवं ते हवं तेव्हा करता  येत होत , सगळं एकदम बिनधास्त चाललं होत , अनुराग शालिनी मध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता , even तिनेच त्याला गुंतवून घेतलं होत . त्यात तिचा double फायदा होता एकतर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेग वेगळ्या टूर मध्ये त्याच्या  बरोबर जाता येत होत . कधी अगदीच नाही जमाल त्याच्या बरोबर जायला तर हिला एक हक्कच घर मिळालं होत जेथे ती आरामात तिच्या गरजा , पार्ट्या मित्र गोळा करू शकत होती .अनुराग ला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता , बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही , घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे , रात्री आला तरी official कॉल असत  त्या मुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता . अशातच शालिनीला राहुल भेटला,  राहुल एक businessman होता त्याचा स्वतःचा फॅमिली business  होता, शिवाय पिझाच्या रेस्टॉरंट chain होत्या पुणे आणि मुंबई मध्ये , राहुल अनुरागचा शाळेपासून चा मित्र . एकदा असच दमून अनुराग घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून मनवला , ते एका छान शॉप मध्ये गेले अनुरागला तर केव्हा एकदाच खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होत तो खूप दमला होता , ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून राहुल आला , ते त्याचाच शॉप होत , अनुराग ने राहुल शी शालिनीशी ओळख करून दिली , बघताच शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं कि हे शॉप आणि असे chain शॉप त्याने पुणे मुंबई आहेत तिचे तर डोळेच चमकले. त्या नंतर अनुराग ऑफिस ला गेल्यावर त्या शॉप ला जाऊ लागली राहुलशी ओळख वाढवू लागली 

असच एकदा अनुराग onsite जावं लागणार होता  , त्याला 1 महिन्यासाठी काम होत तिथे  , ह्या वेळेला  शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्या बरोबर यायचा , तू जा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्या बरोबर , आता तिचा  अनुराग मधला इंटरेस्ट संपला होता , तिला राहुल आवडू लागलं होता, .
राहुल स्मार्ट तर होताच शिवाय भरपूर पैसा हि होता त्याच्या कडे . शिवाय आता अनुराग तिला बोअरिंग वाटू लागला होता .  ती आता राहुल ला टारगेट करू लागली होती , अनुराग  गेला  त्या दिवशी तिने राहुला फोन केला कि ती अनुराग नाही तर एकटी आहे , असं ती कधी राहिली नाही , खूप भीती वाटते तू  सोबत येशील का , असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं , पण राहुल पक्का businessman होता शिवाय शालिनी काय आहे ह्याची त्याला थोडी आयडिया हि होती . 
आता हि च वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तीच इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्यातासात येतो म्हणून बोलला , शालिनीला वाटलं लागला मासा गळाला .
एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वथ झाली , तिला आता कंट्रोलच होत नव्हतं तिने परत त्याला कॉल केला , १०मिनिटात पोहोचतो म्हणून त्याने कळवलं
शालिनी ने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती , घरात सगळीकडे रेड कलर candels लावलेल्या होत्या, मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच, डिनर ची सगळी तयारी होती घरत एक मंद प्रकाश होता सर्वत्र शिवाय शालिनी कमालीच्या  आकर्षक गाऊन मध्ये होती घरातलं वातावरण एकदम रोमँटिक होत .
१०मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजली , अगदी आनंदाने रोमँटिक मूड मध्ये शालिनी ने दार उघडलं . दार उघडताच राहुल आत आला , तस शालिनी त्याच्या  गळ्यातच पडली ,आणि अगदी लटक्या आवाजात म्हणाली  केव्हाची वाट बघत होते मी तुझी dear , किती हा उशीर , किती कंट्रोल करायचं .
अगदी असाच ती अनुरागशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुलला होता ,
शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती , आणि अश्याच एका क्षणी एकदम बाल्कनी मधून अनुराग फिल्मी style ने आत आला . हे सगळं राहुल च प्लांनिंग होत , त्याला अनुराग ला पटवून द्यायचं होत कि शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेते आहे
अनुराग च onsite  जाणं , पण त्या प्लॅनिंग चा च एक भाग होता , आणि जेव्हा शालिनी त्याच्या बरोबर यायला तयार नव्हती तेव्हा त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास बसला , राहुलने शालिनीचा आलेला कॉल सुद्धा अनुरागला ऐकवला त्या वेळी अनुराग त्याच्या सोबतच होता . आज शालिनी पूर्ती अडकली होती .. आणि अनुराग चे  डोळे खाडकन उघडले होते
त्याला शालिनीचा खूप राग येत होता , तिला मारणार पण राहुल ने त्याला अडवलं , अगदी त्या क्षणी त्याने तिला घरा बाहेर काढला , आणि आत येऊन अनुराग एका लहान मुला  सारखा राहुल च्या कुशीत रडला , त्याला तो आई बाबा आणि अवनीशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होत . प्रत्येक गोष्टीत तो शालिनीमुळे कसा त्याच्याच लोकांशी चुकीचा वागला हे त्याला जाणवत होत , आता त्याला अवनी आठवण येत होती , आई बाबां चा चेहरा डोळ्यापुढे येत होता पण प्रायश्चित करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होत आणि रडू अनावर होत होत , त्याला स्वःताचीच लाज वाटायला लागली होती .

दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आई बाबानं कडे जाऊन माफी मागू म्हणून मागे लागला , पण ते माफ करतील कि नाही , आणि अवनी ,,,,,
कस तरी समजून राहुल त्याला आई बाबानं कडे घेऊन गेला , दाराची बेल वाजवली आई ने दार उघडलं अनुरागला आणि राहुल ला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलावलं , बाबा हॉल मधेच होते , अवनी कॉलेजला होती . बाबा अनुरागला बघून खूप चिडले कशाला आला आता परत ... आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो  परत का आलास ,,, तुझी हिम्मत तरी कशी झाली घराचा उंबरा ओलांडायची , अरे ज्या अवनीने जीवा पलीकडे तुझ्यावर प्रेम केलं , तिला तू त्या नटवी साठी सोडलं , तू आमचा मुलगा आहेस ह्याचीच लाज वाटते मला , कुठे कमी पडलो आम्ही ,, कधी विचार केला कि अवनी च काय झालं असेल तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे , तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला , अरे तुला तर ऐकून पण घ्यायला वेळ नव्हता कि तुझं बाळ कस आहे , मुलगा आहे कि मुलगी ... नाही तू निघ इथून असं   म्हणून बाबानी एक जोरात अनुरागच्या काना खाली वाजवली ... ज्या दिवशी तू divorce चे पेपर  पाठवले त्या दिवशी आपला सुद्धा संबंध संपला . आता काय घ्यायला आलाय .. निघून जा इथून .. असं म्हणून बाबानी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुल ने त्यांना थांबलं आणि सगळं कस घडत गेलं ते सर्व सांगितलं अनुरागने हि माफी मागितली , तो दोषी आहे आणि ह्या साठी ते जी शिक्षा देतील ती  भोगायला तयार होता
बाबा नि त्याला सर्वात पहिले अवनीची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं . हे सगळं सुरु असतानाच अवनी दारात होती , खूप रडू येत होत तिला , अनुराग ने जेव्हा तिला पहिला त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली ... तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे .... अवनीने त्याला तिथेच थांबवलं . तिने अनुराग वर मनापासून प्रेम केलं होत पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती. तिने त्याला माफ केलं , फक्त आणि फक्त आई बाबां साठी , पणनवरा म्हणून ती कधीच स्वीकारू शकली नाही .


मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

सुहास्य वदना प्रसन्न ललना





















सुहास्य वदना , प्रसन्न ललना 
यौवनाचा तो वसंत बहरे 
बघुनी तिचे ते रूप मनोहर 
हृदय माझे भान हरे 

केस जणु ते काळे मेघ 
छेडी सुमधुर प्रेमगीत 
नयनांचा तो एक कटाक्ष 
काळजाची स्पंदन छेडे 

अधर तिचे ते गुलाब पुष्प 
भान हरवती शब्दांचे 
सुहास्य वदना , प्रसन्न ललना 
गुंतले तिच्यात मन बावरे 
... गौरी 

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

अश्वत्थामा आणि डॉक्टर यामिनी



अश्वत्थामा  आणि डॉक्टर यामिनी

काही लोक आपल्या आयुष्यात येतातच मुळी थोड्या काळासाठी पण जे काही  देऊन  जातात ते अविस्मरणीय , अद्भुत , अनाकलनीय पण असू शकत , असाच काहीसा अनुभव डॉक्टर यामिनी ला आला
डॉक्टर यामिनी म्हणजे एक शापित अप्सरा , दिसायला एकदम अप्रतिम .... हा शब्द पण कमी पडतोय , आरसपाणीच , बहुतेक देव खूप निवांत होता हिला बनवताना.. फिकट तपकिरी मोठे डोळे , सावळा वर्ण , उंची . , सडपातळ अंगकाठी , कमरेपर्यंत रुळणारे केस , वय वर्षे २६ . Beauty with Brain  हे समीकरण यामिनी ला बघितल्यावर काळत
यामिनी  पेशाने Dermatologists होती पण तिला  ट्रॅकिंग ची , भटकंती ची विशेष आवड होती , जेव्हा केव्हा तिला वेळ मिळे ती एकटी किंवा ग्रुप बरोबर  जात असे . नर्मदा परिक्रमा करण्याचं खूप दिवस पासून तिच्या मनात होत , त्या बद्दलची जवळपास सगळी माहिती तिने घेतली होती एका ग्रुप बरोबर तिने जाण्याचं ठरवलं
१४ दिवस १३ रात्र लागणार होते . सर्व इंदोर ला भेटून ओंकारेश्वर पासून परिक्रमा सुरु होणार होती. Online search , पुस्तक ह्यामुळे बरीच माहिती तिला मिळाली होती .एकदा असच वाचता वाचता यामिनीला झोप लागली आणि कुणीतरी खूप जुन्या दुखण्याने विव्हळत असलेला आवाज तिला आला . तो इतका जवळून आल्याचं तीला जाणवलं कि ती झोपेतून जागी झाली . सकाळचे . ३० झाले होते. ती उठली . फ्रेश झाली , योगा केला , आणि कामाला लागली ..
निघण्याचा दिवस आला मोजकंच सामान घेऊन यामिनी इंदोर पोहोचली , तो दिवस ते इंदोर मार्केट फिरून दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर ला निघणार होते
ओंकारेश्वर ला ग्रुप मधील काही लोकांनी पूजा करून संकल्प केला आणि परिक्रम सुरु झाली, ग्रुप मधले जबलपूर चे शर्मा uncle आणि यामिनी ह्यांची छान गट्टी जमली . त्यांना पण ट्रेकिंग , adventure ट्रेकिंग मध्ये इंटरेस्ट होता .
असच बोलता बोलता ते यामिनीला सांगत होते, “मा नर्मदा कि महिमा अपार है ! जिसे आम लोगों के लिये समझन और सुलझाना संभव नाही है !उनकी कृपा हमेशा अपने भक्तोपर बनी रहती है! यही वजह है कि वह ऊन भक्तो का भी ध्यान राखती है जो अपने किसी बुरे कर्म कि वजह से भटक गए और प्रायश्चित करना चाहते है !ऐसे हि एक चिरंजिव अश्वत्थामा है ! जो कहते है कि महाभारत के काल  से मा कि परिक्रमा के परिसर मे रहते है” आणि त्यांनी तिला अश्वत्थामाची सर्व माहिती सांगितली तो कोण होता , कसा युद्धात कौरवां बरोबर पांडवां विरुद्ध उभा होता आणि कसा त्याला कृष्णा ने शाप दिला . बोलता बोलता खूप रात्र झाली होती म्हणून शर्मा uncle  झोपायला   निघून गेले पण यामिनीला काही झोप येत नव्हती , का कुणास ठाऊक आज तिला तो स्वप्नातला विव्हाळालेला आवाज आठवला , थोडे पाय मोकळे करायला म्हणून ती बाहेर पडली , काकांनी सांगितलेली गोष्ट आठवत ती चालत होती . आणि नकळत ती कॅम्प पासून खूप दूर गेली तिला कळलं पण नाही , आजूबाजूला खूप अंधार आणि जंगल होत एकी कडे नर्मदा नदी आणि दुसरी कडे जंगल असा तो परिसर होता ,, एक ठेच लागल्यामुळे यामिनी भानावर आली आणि तिच्या लक्षात आलं कि ती खूप लांब जंगलात निघून अली आणि मोबाइल पण कॅम्प मधेच  राहिला , सुरुवातीला ती घाबरली पण थोड्यावेळाने सावरली नदीच्या  काठावर बसू सकाळी नक्की कोणी तरी दिसेल असं तिला वाटलं

म्हणून काठावर एका जागी दगडावर बसली , वातावरण खूप मस्त  आणि सात्विक होत  , चंद्र पुर्ण होता , पौर्णिमेच चांदणं, भरून वाहणारी नर्मदा ,आल्हाद दायक हवा , वातावरण दैवि झालं होत , खूप मस्त वाटत होत यामिनीला कुठलीही भीती मनात नव्हती , आणि मागून कुणीतरी येतंय असं तिला जाणवलं एवढ्या रात्री आपल्या सारखंच कुणी असेल असं तिला वाटलं आणि ती मागे वळली , बघते तर मागे एक उंचपुरा , पिळदार शरीरयष्टीचा , रुबाबदार ,  व्यायाम करून कमावलेलं शरीर , एका योध्या सारखा पण डोक्याला काहीतरी बांधलेला एक तरुण उभा होता. " कोण आहात तुम्ही , रस्ता भटकलात का ? मी काही तुमची मदत करू शकतो , तुम्ही खूप जंगलात निघून आला आहात " तो व्यक्ती बोलला. यामिनी "हो मी ... कदाचित खरंच रस्ता चुकले , पण तुम्ही ? तुम्ही पण का same pinch , बसा की इथेच सकाळ पर्यंत नक्की कुणीतरी येईल नदी काठी " तो व्यक्ती  यामिनीच्या पुढे उभा राहतो " नको मी उभाच राहतो ,, तुमचं नाव यामिनी ना ... डॉक्टर यामिनी , पुणे " यामिनी दचकते "हो पण मी तुम्हला नाही ओळखत तुम्हाला माझं नाव कस माहित " "मी एक अंदाज बांधला असं काही नाही तूमच्या गळ्यात असलेल्या त्या (Icard कडे  बोट दाखवत )बघितलं " "oooo  हो मी डॉक्टर यामिनी डर्मिटोलॉजिस्ट आहे  " "म्हणजे ? " यामिनी हसून "म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ " "म्हणजे एक वैद्य .... , चला वैद्यबाई आपण चालत चालत बोलू कदाचित योग्य रस्ता सापडेल , तुम्ही कसकाय इकडॆ आलात म्हणजे जवळपास कुणा कडे भेटावयास " यामिनी "नाही मी इकडे ट्रेकिंग ला आलेले आणि थोडा विचार करत करत रस्ता चुकले " "बर " , यामिनी - "तुम्ही इथलेच का ?" ती व्यक्ती  "हो वर्षानुवर्ष , कदाचीत  युगांयुग " "काय ?" "हो मी इथलाच " , यामिनी "ह्या जंगलात तुम्ही काय करताय "मधेच तीच बोलणं थांबवत  "अरे तो खड्डा सांभाळा वैद्यबाई,  नाही तर तुमच्या साठी आत्ता लगेच वैद्य शोधावा लागेल " "ooo  इथली बरीच माहिती आहे तुम्हाला " "हो मी इथेच असतो बोललो ना " "हम्म , एक विचारू का "यामिनी म्हणते , "हो विचार कि " "हे डोक्याला काय बांधलय"   "हे….. ती एक प्रायश्चित पट्टी आहे " , यामिनी" प्रायश्चित पट्टी?", ती व्यक्ती "हो खूप मोठी गोष्ट आहे ती " , यामिनी "बर , ती open करता का , I  mean  काढता का , मी एक डॉक्टर…….. , तुमच्या भाषेत वैद्य आहे बघू काय आहे ते " "नको " "अहो बघू कदाचित मी काहीतरी मदत करू शकेल " "अहो राहू द्या हो " "बघा बोलत बोलत आपण गावा जवळ आलो " "इथून पुढे जा तुम्ही,   तुम्हाला तुमचा योग्य  मार्ग सापडेल  " यामिनी बघते तर दूरवर कॅम्प असतो , बऱ्यापैकी उजाडलेलं असत , आणि मागे वळून बघते तर ती व्यक्ती गायब झालेली असते