mazionjal

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

ग्रहाच्या पलीकडले


सुजय वय १५ , लहान पणा पासूनच एक वेगळीच शक्ती घेऊन जन्माला आलेलो मला लोकांचं बोललेल समजत म्हणजे मनात बोललेलं . माझे मित्र मला MK म्हणजे  मन-कवडा म्हणतात , शाळेत मी सगळ्यांना MK म्हणूनच माहित आहे .  खूप वेळा मी आई बाबा ना पण विचारलं हे असं कस पण त्यांनि  टाळाटाळीची उत्तर देऊन मला गप्प केलं , पण तुम्हाला सांगू आई ला पण मनात बोललेलं कळायचं ... म्हणजे मागच्या वर्षी ती  देवा कडे गेली   . आज मी बाबाना विचारणारच आहे कि नक्की का असं होत.

"यार बाबा आज तर तुला सांगावंच लागेल माझ्या MK च राज ... मला पण कळायला हवं ना कि हे असं माझ्या आणि आई च्या बाबतीत का होत ,... तू सांग बर ... आज मी कुठे जाणार नाही दिवस भर ,  घरीच राहणार आहे , नो क्लास ,नो फुटबॉल ,नो अभ्यास .... आणि मला माहित आहे कि तुला सुद्धा मनात बोललेलं कळत . तू सुद्धा MK च आहेस .. पण तू आणि आई हे लपवून का ठेवता .. खूप प्रश्न ... डोक्यात भुगा होतोय, सो आज तू हे सगळं क्लिअर करणार आहेस . "

 

बाबा " ओक सांगतो बस ..पण हि एक गोष्ट समजून ऐकायची आणि नंतर विसरून जायचं नो पब्लिसिटी नो इन्स्टा स्टोरी .... हे आपलं फॅमिली सीक्रेट ओके .  तू प्रॉमिस देणार असशील तर पूर्ण स्टोरी सांगतो ... " सुजय " yes  I  प्रॉमिस . तू सांग

 

" आज तब्बल 30-40 वर्ष झाली ह्या घटनेला घडून पण अजूनहि ते सगळं मला जसच्या तस आठवतंय .

हे सगळं सुरु झालं होत ते आमच्या ग्रहा वरून सौरमालेच्या किती तरी लांब पासून  म्हणजे मला जेव्हा पासून हि परिस्थिती कळायला लागली  ती परिस्थिती खूप आधी पासून होती असं मला आई सांगते ,प्रचंड मोठा दुष्काळ होता  प्यायला पाणी नाही ,कडक ऊन , जिकडे पहावं तिकडे फक्त वाळवंट , नदया  सगळ्या सुकून गेलेल्या  ,छोटे छोटे ओढे आणि नाले पांढरे पडलेले  आणि ती पांढरी रेष त्या ओहळाच अस्तित्व. सगळे सायंटिस्ट ह्या गोष्टीवर दिवस रात्र अभ्यास करत होते , सगळा  ग्रह सुकून चालला होता . खूप कमी ठिकाणी आता छोटस तळ राहील होत पण लोकांची संख्या एवढी कि ते आम्हाला पुरत नव्हतं . इतकी वाईट परिस्थिती होती कि…… मी,  बाबाना आणि काही लोकांना बोलताना ऐकलेलं कि हा ग्रहच सोडून जाव लागेल किंवा दुसरा ऑपशन म्हणजे पाण्यावाचून जीव गमवावा लागेल.

माझे बाबा हे जिवंत राहिलेल्या आमच्या ग्रुप चे main पुरुष म्हणजे लीडर , आमच्यात काही सायंटिस्ट काका पण होते ते रोज कसला तरी अभ्यास करत , वेगवेगळे प्रोटोटाईप बनवत असत पण यश काही येत नव्हतं.

एकदिवस संध्याकाळी ते अचानक ओरडतच बाहेर आले काय बोलावं हे त्यांना अजिबात समजत नव्हतं , भावना जेव्हा उच्च  पराकोटीच्या टोकाला असतात ना तेव्हा शब्द असे एकदम नाहीसेच होतात अगदी तस त्यांना झालेलं , आज त्यांच्या प्रयन्तांना यश आलं होत काहीस खूप  कठीण मोठ मोठं ते बोलत होते. मला एवढंच कळलं कि  आमच्या ग्रहापासून काही तरी million km अंतरावर , सूर्यमालेतील तिसरा  एक सुंदर ग्रह आहे , तो दिसायला निळा म्हणून त्याला नीलग्रह असं नाव ठेवलय , तिथे म्हणे दिवस फक्त १ तास छोटा असेल , आताच्या आमच्या परिस्थिती हे आम्हला काही मोठं वाटलं नाही , आणि काका सांगत होते कि तिथे वर आकाशा कडे बघितलं कि फक्त एकच चंद्र दिसेल ...... हे असं कस, इथून आज मी वर बघितलं कि आम्हाला दोन दोन चंद्र बघायची सवय ,  तर  तिथे  आम्ही पोहोचू शकलो तर जिवंत राहू , श्वास घेऊ शकू, पाणी तर भरपूर पियू शकू , तिथे म्हणे पाण्याचा खूप मोठा स्रोत आहे, हिरवी झाड , वेली आहेत . त्या ग्रहाचा ७०% भाग पाणी आणि ३०% भाग जमीन आहे . मोठे मोठे समुद्र पाण्याने गच्च भरलेले , खळखळ वाहणाऱ्या मोठ्या नद्या आहेत , ,उंच उंच डोंगर आहेत , आणि तिथे पाऊस पडतो असं काका सांगत होते पाऊस म्हणजे वरून आकाशातून पाणी येत म्हणे ,,,,,, कसलं छान ना ... मी तर कधीच पाऊस पहिला नाही मला तर पाऊस बघायला जायचंच ह्या निळ्या ग्रहावर.  आणि मी ठरवलंच आहे कि मी काका ना ह्या ग्रहावर कस जायचं , कस पोहोचता येईल ह्या संशोधनात मदत करणार

 आणि आम्ही एक भलं मोठं यान तयार केले कि ज्यात आम्ही सगळे सामावू आणि त्या निल ग्रहावर जाऊ , पाण्याचा शोध आणि इथे असलेली कमतरता , रोज कोणा चा  तरी पाण्यावाचून , खाण्यावाचून मृत्यू ह्या अश्या परिस्थितून बाहेर येऊन हे यान आम्ही बनवलं आणि खरं सांगू ते बनवून , उडण्या योग्य बनावे पर्यंत आम्ही खूप कमी लोक म्हणजे खर सांगायचं तर फक्त लहान मुलंच राहिलो होतो आणि आमच्या बरोबर फक्त माझे बाबा बाकी एक एक करून सगळे त्या उष्ण हवेत विरून गेले होते... पण सगळं बाजूला ठेऊन आम्ही सगळे त्या यानात चढलो आणि त्या नीलग्रहा कडे लाँच झालो .

 

आता ठिकाण पृथ्वी :

अंतरिक्षातल्या गूढ शोध यंत्रणांनी पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना एका अद्भुत घटनेची जाणीव करून दिली. आपल्या सौरमालेच्या सीमेवर काही अद्भुत वस्तू आल्या होत्या. त्या पृथ्वीवरील कोणत्याही यानासारख्या नव्हत्या. त्या  मोठ्या आणि चमचमीत होत्या, असं वाटत होतं की त्या फक्त बुद्धिमान योजनेनेच तयार केलेल्या असतील. हे खगोलयान इतर ग्रहांवरून आलेले अंतराळयान असावेत, अशी शंका शास्त्रज्ञांना येत होती.

हे दृश्य पाहून पृथ्वीवरील सर्वच देशांमध्ये भीती आणि उत्सुकता पसरली. शास्त्रज्ञ, अंतराळ संस्था, आणि खगोलशास्त्रज्ञ प्रत्येक क्षणाला त्यांच्यावर लक्ष ठेवीत होते, त्यांच्या हालचाली तपासत होते. पण या यानांचा कोणताही आक्रमक हेतू दिसत नव्हता. उलट, त्यांच्या संथ चालणाऱ्या गतीतून असं जाणवत होतं की, ते कुठेतरी सुरक्षित निवारा शोधत असावेत.

मग एके दिवशी, पृथ्वीच्या कक्षेत येताच त्या यानांतून एक संदेश आला. संदेशाचं भाषांतर करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले, आणि त्या संदेशाने सगळ्यांच्याच मनाला हेलावून टाकलं.

“आम्ही एका मरणासन्न ग्रहाची लेकरं आहोत,” संदेश असं म्हणत होता. “आमचा ग्रह कोरडा पडला आहे. थांबवता न येणाऱ्या दुष्काळाने आणि असह्य हवामान बदलामुळे आता तो राहण्यायोग्य राहिलेला नाही. आम्ही तुमच्याकडे संरक्षणाची आशा बाळगून आलो आहोत. आमचं जग उद्ध्वस्त झालं आहे आणि आमचं भवितव्य इथल्या बालकांमध्येच आहे. कृपा करून आमच्या मुलांना आश्रय द्या, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवा.”

हा संदेश पृथ्वीभर प्रसारित झाला, आणि सर्वजण या आर्त विनंतीने भावविव्हल झाले. हे यान म्हणजे एका नष्ट होणाऱ्या संस्कृतीचा आशेचा शेवटचा किरण होता. ते मुलांनी भरलेलं होतं – निष्पाप, भीतीने भरलेलं आणि या नवं ग्रहावर केवळ जगण्याची आशा ठेवलेलं.

पृथ्वीवर आल्यावर त्या मुलांचा चेहरा पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला. दुष्काळ आणि अतीव हवामान बदलांमुळे हे मुलं खूपच सुकलेली, पांढरट आणि कृश दिसत होती. त्यांचे मोठे आणि खोल डोळे, पातळ आणि अत्यंत अशक्त शरीर बघून सगळ्यांना त्यांच्याविषयी करुणा वाटली. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीराची रचना आपल्यासारखीच होती. त्यांचे हात, पाय, डोळे, सर्व अवयव आपल्या मानवांसारखेच होते, आणि हे पाहून शास्त्रज्ञ विस्मयचकित झाले. या मुलांचे शरीरशास्त्र आणि मानवी शरीरात आश्चर्यकारक साम्य होते, जणू काही ते पृथ्वीवरीलच एक भाग होते.

पण या मुलांकडे एक आणखी आश्चर्यजनक कौशल्य होतं—ते पृथ्वीवरील भाषा समजू शकत होते आणि त्याहीपेक्षा अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ते मानवांचे विचार देखील वाचू शकत होते. शास्त्रज्ञांनी त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आलं की, त्यांना कोणतीही भाषा शिकवण्याची गरज नव्हती. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती, जणू त्यांच्या डोळ्यांनीच संवाद साधत होते. आपल्यावर लक्ष ठेवणारं प्रत्येक व्यक्ती काय विचार करतंय, हे ते सहजपणे समजू शकत होते.

पृथ्वीच्या नेतृत्वाने लगेचच मदतीसाठी एकत्रितपणे प्रतिसाद दिला. अत्यावश्यक चर्चा घेऊन, मानवांनी या मुलांसाठी सुरक्षित निवारा देण्याचं ठरवलं. त्यांनी त्या मुलांचं स्वागत केलं आणि त्यांचं सगळ्या प्रकारे रक्षण करण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या आरोग्यासाठी आणि भावनिक आवश्यकतांसाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली, आणि वैज्ञानिक, वैद्यकीय तज्ञ एकत्र येऊन त्यांचे संगोपन करू लागले.

 आणि असं आम्ही ह्या भूमीत वाढलो ,मोठे झालो ,पृथ्वी ने ,पृथ्वी वरच्या लोकांनी आम्हाला आपलंस केलं, सांभाळल, सामावून घेतल.

हे फक्त काही scientist आणि काही लोकांनाच माहित आहे . जस त्यांनी हे गुपित सांभाळलं तस आम्ही देखील आणि तस  तू सुद्धा सांभाळ आणि आता हि एक sci - fi समजून विसरून जा ओक.

 Gauri Ekbote

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

प्रचार

 बाई बाई बाई, काय ही निवडणूक,

प्रचाराच्या रिक्षे ने केली दुपारच्या झोपेची पिळवणूक

आज हे चिन्ह, तर उद्या घेऊन येते दुसरं,

कर्कश्श हिच्या आवाजात ,सुचत नाही काही दुसरं- तिसरं

 

सतत लाऊडस्पीकरची चालूच असते गडबड,

कधी शब्द असतात  गोड, तर कधी असते बडबड

"हेच तुमचं भलं करणार," सांगत असतात हात जोडून

पण निवडून गेल्यावर सगळं जातात विसरून .

 

भाजी घ्यायला जाताना दिसतात रंगीत मोठे बॅनर

हात जोडून , पांढरे शर्ट घालून दादा दाखवतात मॅनर

गल्ली गल्ली तुन पायी फिरून विनवतात हात जोडून

आपलं मत आम्हालाच द्या सांगतात  गोड बोलून

 

झोप मोडली, मन थकवलं, प्रचाराच्या गोंगावात ,

माझा दिवस रोज जातो गोंगाटाच्या ह्या  धबधब्यात.

कधी लागते एकदाची आचारसंहिता असं मला झालय

थांबेल सगळं , संपेल गोंगाट , नको नको केलय

 

गौरी एकबोटे

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

भेट ना रे एकदा.......

 


माझ्या गावा मधलं कोणी मथुरेला येणार हे कळलं ना तरी मनात हुरहूर सुरु होते , भावना इतक्या अनावर होतात कि डोळे पाण्याने भरून येतात , मन जड होऊन जात, उर भरून येतो ,  काय करू काय नको काही सुचत नाही , तुझ्या साठी काय बनवू , काय पाठवू तुझ्या साठी , काय काय देऊन काय नाही काही उमगतच नाही . सतत तुझा चेहरा डोळ्यापुढे येत असतो तस हे असं होणं रोजच बर का ... पण इथून तुझ्या कडे कोणी निघालय ह्या बातमी नेच काय होत काही कळत नाही बघ .

 मन… ते तर केव्हाच त्या येणाऱ्या व्यक्तीच्या मागे पुढे करत असत , त्या च्या बरोबर मनाने मी कधीच तुझ्या पर्यंत पोहोचलेली पण असते

तू काय करत असशील , काय बोलत असशील , तू कोणता पेहराव केला असशील , माझी चौकशी करशील का त्या व्यक्ती कडे

तुला भेट म्हणून दिलेली बासुरी त्या व्यक्तीने तुला दिल्यावर तुझी काय प्रतिक्रिया असेल

हे सगळं सगळं जाणून घ्यायचय , मला मी तिथे नसताना सुद्धा हे अनुभवायचं , मला तुझ्याकडे यायचं . आई पासून खूप दिवस एखाद मुलं लांब असलं आणि अचानक आई समोर आली कि जे वाटत ना , जी सैरभैर भावना असते ना , तिच्या गळ्यात पडून ती नसताना तिची किती आठवण आली , हे सांगायचं तस अगदी तसच अनुभव करते आहे

भेट ना रे एकदा.......


रविवार, १ सप्टेंबर, २०२४

भांडण

     

नाही बोलायचं तुझ्याशी मला , जाऊ दे ना ,सोड आता

खूप चीड चीड होते आहे माझी ,वैतागले आहे मी तूर्तता

 

मला नाही बोलायचं आज कोणाशी , का मी बोलू ?

परत तोच विषय निघणार ,परत आपलं भांडण होणार

परत तीच चीड चीड , राग, रुसवा आणि  फुगवा ..... 

हि प्रोसेस च  नको मला आता

नाही बोलायचं तुझ्याशी मला , जाऊ दे ना ,सोड आता

 

 

त्या पेक्षा थांबू यात का काही दिवस आपण ?

परत विचार करू यात दोघंहि जण

का भांडलो होतो ?,तो विषय खरंच गरजेचा आहे का  ?

तस वागणं गरजेचं आहे का ?, आपलं नातं ह्यामुळे बिघडतंय का ?

काय महत्वाचं आहे तो विषय कि नातं ?

थांबूयात थोडा वेळ  , देऊ यात  ह्या वेळेला हि वेळ

सोडवायला हा गुंता

नाही बोलायचं तुझ्याशी मला , जाऊ दे ना ,सोड आता

 

मग ह्यातून काय मार्ग आहे ?  कि जेणे करून ह्या चक्रातून पडू  बाहेर

ह्याला पळपुटे पण तर नाही ना म्हणणार ?

खूप ओव्हरीथींक होतंय का ?

 

Gauri Ekbote

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

आठवणींची पोटली

 


सांज वेळी आठव तुझी, अथांग समुद्र भासे 
आठवणींच्या लाटांनाही उगाच उधाण येतसे 
नसतो दिवस नसते रात्र, हि संधिप्रकाशाची वेळ 
कातरवेळी हूर हूर मनी, भास तुझे हे खेळी खेळ 

तो पहा, तो सूर्य हि  जातसे 
चांदणीस भेटावया 
सोडूनि सर्व किरणांचा  पसारा 
 होऊनि चंद्र, चांदणं बरसावया 

एकटाच मी ह्या किनाऱ्यावर तू पल्याड पोहोचली 
सोबतीस आहे आता तुझ्या आठवणींची पोटली


शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

कट्टर चहाप्रेमी

 


प्रिय चहा 

तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस हे तुला मी शब्दात नाही सांगू शकत , रात्री झोपेतून उठवून सुद्धा कोणी विचारल ना कि "चहा घेणार का ?" मी झोपेत "हो " म्हणेल . तुला नाही म्हणणे म्हणजे मोठ्ठं पाप आहे माझ्यासाठी.

तुझ्या संगती मुळेच MBA चा फायनल चा अभ्यास रात्रभर जागून करू शकले 

तुझ्या साथीमुळेच आज किती हि टफ situation आली तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो , एक कडक चहा आणि अहाहा ... डोक्यातले सगळे lights  ON . 

घरातले सगळे काम संडे ला संपवले कि तुझ्या सोबतचे  ते फक्त १० मिनिट आणि mind , body  एकदम उत्साही . 

तू ना .... तू एक अविभाज्य घटक आहेस माझ्या  आयुष्यातला. तू नाही तर माझ्यातला उत्साह नाही बघ .. दिवसातून तुला ४वेळा भेटलं ना कि बास्स्सस ,,, सगळा कंटाळा गायब .   


आणि मला पण माहित आहे कि तू सुद्धा माझ्या शिवाय नाही राहू शकत , कालचच बघ ना , दहीहंडी चा कार्यक्रम बघायला गेलेलो आणि येताना सगळे बोलले कि मस्त पाऊस पडतोय सो सगळे मस्त कॉफी घेऊ गरम गरम ,,,, म्हणून कॉफी ची ऑर्डर दिली पण त्या माणसावर काय जादू झाली काय माहित त्याने सगळ्यांना अगदी pure दुधाचा कडक चहा दिला .... तो एकटाच इतका भारी होता कि कुणी त्या ऑर्डर घेणाऱ्याला त्याची चूक दाखवलीच नाही .... मस्त तिथे चहा सोबत शेजारची दहीहंडी एन्जॉय केली आणि घरी आलो.

पण तुला सांगू का तुझे ते सारखे मूड स्विंग होता ना ते काही मला नाही आवडत बर का ... यार काय हे ... कधी तू ग्रीनटी होतो , कधी ब्लॅक टी ,

 कधी गुळाचा , तर कधी अमृततुल्य ,तर कधी तंदुरी, कधी मसाला चहा.... हे तुझे  स्विंग काही मला नाही आवडत बघ   .... तू मला फक्त आणि फक्त घट्ट वाफाळलेला च आवडतो , घरच्या कपबशीत  हां .... म्हणजे कधी कधी तुला मी आल्याबरोबर किंवा त्या गवता  बरोबर पण accept करते. सो you are my favorite मधला. आणि मी एक चहाप्रेमी .(फक्त तुझे ते mood स्विंग सोडून , ते काही मला नाही चालणार )


तुझीच कट्टर चहाप्रेमी

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आकाश

 


दूर डोंगर क्षितिजाशी बसून निळाईला न्याहाळत हरवून जायला होत

हे आकाश मोठं चमत्कारिक हं , आणि तेवढंच fashionable.

म्हणजे बघ ना - सकाळ होताच गुलाबी रंगाची उधळण त्यात हि खूप वेग वेगळया सुंदर  छटा

उगवतीला बघितलं तर लाल रंग आणि त्या नंतर इतरत्र फिकट गुलाबी त्या हि पुढे निळा आणि काळा असा मिश्रित रंग कि ज्याला  थोडी गुलाबी किनार आणि त्यात पहाटेचा शांत गार वारा अहाहा .....

जसा जसा सूर्य वर येईल तस तस ती लाली आजून वाढत जाणार आणि दुपार पर्यंत पिवळ्या रंगाचे कपडे घालून केव्हा तयार होऊन येईल कोणाला कळणार देखील नाही

किती तरी रंग , रंगाच्या छटा हे आकाश पांघरून असत

कधी निळा , कधी लाल,तर कधी गुलाबी   

कधी काळा , कधी पिवळा तर कधी केशरी

रात्रीच्या आकाशाची तर सजण्याची मजा काही न्यारी

नुसतं काळया रंगाचे कपडे घालून नाही तयार होणार  तर त्या गडद काळ्या कपड्यावर चांदण्याच जरी वर्क

आणि चंद्राचं कोंदण करून घेणार, रातराणीच्या अत्तराचा छोटासा फाय जवळ ठेवणार

आणि शांत स्तब्ध तलावात एक सारखं स्वःताच रूप न्याहळत बसणार ,

संध्याकाळी बगळ्यांच्या रांगेत गप्पा गोष्टी करणार    

तर घारी  बरोबर उंच उंच जाण्याची शर्यत जमवणार

 एखादा भरकटलेला ढग आलाच मध्ये तर हवे च्या बरोबर त्याला त्याच्या घरी सोडणार

नदी बरोबर उद्या मारत अवखळत समुद्राला जाऊन भेटणार

डोंगराच्या पलीकडे जाणाऱ्या सूर्याला चिमण्या पाखरांन बरोबर बाय बाय करणार आणि त्याला स्वतःत सामावून घेणार आणि परत म्हणणार "उद्या भेटू रे ... "

गौरी एकबोटे