बस झालं कि आता , किती ते एखाद्याने दुसऱ्याच्या घरात ठाण मांडून बसायचं ,, जा.. रे... बाबा आता तुझा आम्हाला खूप कंटाळा आलाय !!!
असच झालय ना सगळ्यांचं .... हो.. हो मी त्या कोरोना बद्दलच बोलते आहे. गेले एक संपूर्ण वर्ष झालं हा काही आपल्या घरातून जायचं नाव नाही घेत . शाळा तर बंद पाडल्याचं पण सगळे व्यवहार ठप्प केलेत , सारख आपलं फक्त कोरोना कोरोनाच , पेपर उघड ला कि कोरोना, TV लावला कि कोरोना , इंटरनेट ओपन केलं कि कोरोना जिथे तिथे फक्त तोच घुसून बसलाय . आपल सगळं जगच त्याने ओढून घेतलय एखाद्या ब्लॅकहोल सारख.
आजीच्या गोष्टीत कस एक राक्षस होता तो सगळ्यांना त्रास द्यायचा, ऊत मात करायचा, उच्छाद मांडायचा , तसंच ह्या कोरोनाराक्षस ने सगळी कडे नुसता गदारोळ घातलाय, ना नवीन काही करू देत, ना आहे ते टिकाऊ देत .
हा बाबा आपल्या घरात आला कि सगळं घर काय सगळी सोसायटी घरातच ह्याचा पाहुणचार करायला, कुठे बाहेर पण निघता येत नाही याची सरबत्ती करताना . आणि थोडे थोडके नाही तर १४ दिवस ह्याच्या मुळे quarantine व्हावं लागत .
थोडं कुठे जरा बाहेर फिरून यावं म्हटलं तर तोंड बंद मास्क लावून , हाता मध्ये हँडग्लोव्हज नाही तर येतोय आहे आपल्या मागे घरात घुसायला .
म्हणजे ह्याच्या भीतीने कुठे जात पण येत नाही ... किती ना छळवाद ...
हो पण आजार सुद्धा काही तरी नवीन शिकवून जातो हे आपल्याला कोरोना ने शिकवलं , ह्याच्या मुळे आपल्याला स्वच्छतेचि सवय लागलीय , घर- घरातील मंडळींना आपण वेळ देऊ लागलोय हे हि तितकंच खरं. जस एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात तश्या ह्या कोरोनाची एक चांगली बाजू सुद्धा अनुभवायला आली, समजली उमगली , रोज ची जी धावपळ होती, आपली आणि घड्याळाची ती थोडी कुठे तरी थंडावली . एक शांतात अनुभवता आली हे पण तेवढं खरं
सुट्टीला कुठे तरी बाहेर जाण्या पेक्षा घरातच सगळ्या बरोबर सुट्टी ची ती लहानपाणीची मज्जा परत अनुभवता आली . रविवारी मस्त थोडं उशिरा उठून , मस्तपैकी आवडीचा नाश्ता करायचा , TV वर छान गाणी बघायची , सगळे एकत्र बसून एखादा मूवी बघायचा , दुपारी छान जेवण झाल्यावर ताणून वामकुक्षी घ्याची संध्याकाळी छान दिवा वैगरे लावून चहा पित संध्याकाळच गच्चीतल वेग वेगळ्या रंगाचं आभाळ , घरी परतणारे पक्षी बघायचे. जे दिवस खूप दिवसां पासून मिस करत होतो कि लहानपणी हे करायचो ते करायचो हे परत एकदा अनुभवता आले . फेसबुक वर मला आठवत एकदा मीच ते पोस्ट केलं होत काही फोटो बरोबर, गेल्या त्या आठवणी आणि राहिले ते दिवस ह्या हॅशटॅग ने.
कोरोना हे संकट मोठं असलं तरी आपण सगळे ह्यावर एक दिवशी नक्की मत करू . कोणताही आजार नेहमी च सगळं हिरावून घेत नाही तर काही चांगल्या गोष्टी देखील देऊन जातो . आपण ह्या कोरोनाची चांगली बाजू बघू , नियम पाळू . ह्याने जी शिकवण दिलीये, जे धडे शिकवले ते गांभीर्याने घेउ आणि ते आयुष्य भर लक्षात ठेऊ . आणि ह्या कोरोना रुपि तमस, अंधकरातुन ज्योतिर्गमय |
चांगले तेवढं घ्यावे.बाकीचे टाकून द्यावे.
उत्तर द्याहटवा