mazionjal

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

महाराष्ट्र माझा

 कोकणचा अथांग समुद्र, सह्याद्रीच्या डोंगराची किनार 

हिरवी सुंदर घनदाट जंगले , वन्यजीवसृष्टी अपार ,

माझ्या महाराष्ट्राच्या मातीने घडवले विविध कलाकार 

महिमा काय वर्णु मी , जन्मली इथेच सतार ।।


निसर्ग जसा सुंदर , इतिहास तितकाच रंजक 

शिवाजी महाराज आमचे हिंदवी स्वराज्य संस्थापक 

अनेक मावळ्यांनी केले रक्ताचे शिंपण 

महाराष्ट्र हे नाव झाले जगात अजरामर ।।


ज्ञानोबा तुकोबा ने धडा मानवतेचा शिकिवला 

संतांच्या ह्या वाटेवर महाराष्ट्र माझा चालला 

पंढरपूरच्या विठोबाला पायी वारीचा इतिहास 

 इथल्या मातीलाच आहे कष्टाचा सुवास ।।


पोवाडे , लावणी , भुरळ घालणारी कोळीगीत 

वारली कला , कोल्हापुरी चपला प्रसिद्ध इथली नाट्यगीत 

लेखक इथले देशपांडे , कुसुमाग्रज , बालकवी , शिवाजी सावंत 

माडगूळकर , शिरवाडकर , बहिणाबाई चौधरी, दुर्गा भागवत :।।


पुरणपोळी , थालीपीठ ,चकली अन चिवडा 

वडापाव, मिसळ , रस्सा मिळतो तांबडा - पांढरा 

खमंग ज्वारीची भाकरी आणि झणझणीत वांग्याचं भरीत 

हे सर्व माझ्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत

गौरी एकबोटे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा