आज हि जर जुन्या वह्या सापडल्या ना कि पाहिलं पान न बघता सगळ्यात शेवटचं पान शोधते
किती तरी आठवणी
त्या शेवटच्या पानाने अगदी जश्याच्या तश्या जपून ठेवलेल्या असतात न...
एखादी अशीच चार
ओळींची छोटीशी सुचलेली कविता , मधेच एखादा कॅन्टीन चा हिशोब, कोणाचा तरी फोन नंबर , कुठला तरी address , कोणाचा तरी Mail
ID , एखादी मेहंदी design किंवा रांगोळी design , चालू तासात फुली
शून्याचा game , स्वतःच्या स्वाक्षरी चे वेगवेगळे प्रकार , किंवा अगदी चालू lectures मध्ये जर काही
सांगायचं असेल मैत्रिणीला तर ते पेन्सिलने लिहिले आणि बरच काही ... घेऊन जात
थोडावेळा करता का होईना त्या काळात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा