लागला नाद तुझ्या बासरी चा रे कान्हा
लागला नाद तुझ्या बासरी चा
मधुर मंजुळ हळुवार अलगद
स्वर हे पाव्याचे झुरवी चराचर
जाहले वेडे हे जग सारे रे कान्हा
जाहले वेडे हे जग
कृष्ण सावळा , गोरी राधा
रास रंगला यमुना तीरा
तशी मी रंगले ह्या पाव्यात रे कान्हा
तशी मी दंगले ह्या पाव्यात
नंदा चा नंदन वाजवी मुरली
दंग होती साऱ्या ह्या गवळणी
काढी हा खोड्या फार रे कान्हा
काढी हा .... आई ग ....
खोडकर अवखळ यशोदेचा नंदन
बोलती गोपिका करती रुदन
लावती जीव हि त्याला रे कान्हा
तरी हि लावती जीव तुला
लागला नाद तुझ्या बासरी चा रे कान्हा
लागला नाद तुझ्या बासरी चा रे कान्हा
गौरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा