आज मन शांत आहे
उगाच च इकडे तिकडे धावणं , सैरभैर होणं
सोडून दिलय त्याने
आता ती अगतिकता, तो ताण नाही जाणवत , किंबहुना मन त्याला थाराच देत नाही
मार्ग काढण्या कडे त्याचा कल जरा जास्त जातो
गोष्टी धरून ठेवण्या पेक्षा सोडून दिल्या जातात
मी ,माझं ,मला, कोण, कधी, केव्हा ह्या पेक्षा कस करता येईल हा प्रश्न पडतो , तो सोडवण्यात ते जास्त रमतं , हो आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे असं काही नसत हे आता पटलंय त्याला
चीड चीड , संताप , राग राग ह्या पासून थोडी अलिप्तता मिळालीये
आणि ह्या मुळेच का कि नवीन काही तरी शिकण्याची एक उम्मेद आली आहे
रोज नवीन काय बघायला , वाचायला मिळेल ह्याचा शोध सुरु झालाय
एका नवीन आभाळात आल्या सारखं होतय , जेथे दिशा इतक्या विस्तृत आहे कि अजून पुढे ,अजून पुढे आणि परत अजून पुढे सरकतात
क्षितिजाची किनार पुढे पुढे च सरकते जेवढं आपण पुढे जाऊ तेवढी ती अजून पुढे जाते आणि विस्तृत होते
मला आवडायला लागलय इथल उडणं , भरारी घेणं, उंच उंच गिरकी घेत झेपावण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा