mazionjal

मंगळवार, २५ जून, २०१९

एक स्वप्न


असं म्हणतात आपण जे दिवस भर अनुभवतो, वाचतो पाहतो तेच  आपल्याला स्वप्नात दिसत , पण काल हे मी चक्क अनुभवलं
मयु चा दुसऱ्या दिवशी SST  चा म्हणजे इतिहासाची क्लास टेस्ट होती .. so  आम्ही अभ्यास करत होतो, lesson  म्हणजे धडा ... तो  होता १८५७ चा उठाव ,
तो का झाला , त्याची  कारण आणि तो कसा दाबला गेला किंवा पूर्णत्वाला कसा नाही गेला ह्याची कारण होती ...  अभ्यास झाला जेवण झालं आणि झोपलो .

अन जाग आली ती एका सैन्याच्या तुकडीत च ,,, थोडं विचित्र च वाटलं... सगळी कडे बघितलं आणि शेजारून जाणाऱ्या एकाला थांबवला आणि विचारलं कि आजची तारीख काय ... वेड्यातच काढलं त्याने ... परत त्याला दंडाला धरलं आणि हूल देत विचारलं मग तो बोलला कि २८ मार्च .... मी ओरडलो च अरे पूर्ण सांग साला सकट.... मग  तो बोलला २८ मार्च १८५७ ...... मग लक्षात आलं अरे आपण इतिहासात जवळ जवळ १६२ वर्ष मागे आलोय आणि हा १८५७ चा मार्च महिना आहे ...... ओह्ह्ह्ह ..... थोडा वेळ हादरल्या सारखं झालं पण नंतर  भारीच वाटलं. आणि लक्षात आलं आपण आत्ताच जर मंगल पांडे ला शोधलं आणि सगळं अगदी सगळं जे काल मयू कडून घोकून घेतलं ते त्यालाही सांगितलं तर .... तर कदाचित इतिहास काहीतरी वेगळाच होईल ... हे युद्ध देशभर होईल ,,, आणि आणि इथेच गोरा साहेब पळून जाईल आणि पुढची पिढी काही तरी नवा अजून सुंदर इतिहास घडवेल ..... कसला भारावून गेलो होतो मी ....आणि …..तेवढ्यात कोणीतरी पाठीवर थाप मारली मागे वळून बघितलं तर , एक उंच पुरा  , पिळदार मिशीचा माणूस होता ... कोण रे तू ? त्याला का अडवलं ? आणि तारीख का विचारत होता त्याला ? मी घाबरतच बोललो मी ... मी ... बस कळलं जास्त आवाज  नाही पाहिजे काय ... आणि कापड काय असे घातले  ... कुठून आला रे ? इथं काय करतोय ? सायबा न काय हेरगिरी करायला पाठवलं कि काय तुला ? .. मी घाबरतच उत्तरलो मी .... मी २०१९ मधून आलोय ... माहित नाही कसा आलो ... आणि एकदमच एक हश्या झाला सगळी कडे .... तो बोलला भविष्यातून आलाय .. हा हा ..... काय रे सकाळी सकाळी घेतली कि ... जास्त चढली .... मी बोललो अहो नाही मलाच कळत नाही मी कसा आलो पण मी तुम्हला काही आता घडणाऱ्या गोष्टी सांगू शकतो बघा खऱ्या झाल्या तर ठेवा विश्वास... पण मी तुम्हाला खूप मदत करू शकेल , झाला तर फायदाच होईल तुमहाला .... आणि एक विचारू का .... तुम्ही ... मी पुस्तकात बघितलेल्या फोटो प्रमाणे ... तुम्ही मंगल पांडे ....ते च का ? .....

तो बोलला "ए .. जास्त बोलतो रे तू ..... ओळखतो कसा रे मला ..... मला तर नक्की तू हेर च वाटतो " ह्यावरून माझ्या एक लक्षत आलं कि मी ज्यांच्याशी बोलत होतो ते नक्की साक्षात मंगल पांडे च आहे ... मग थोडी हिम्मत आली ...आणि मग मात्र माझी देशभक्ती जागी झाली ,... मी पण मग त्यांना सांगितलं बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इंग्रज सरकारने एक नवी बंदूक introduce  केली आहे बरोबर ... म्हणजे नवी बंदूक तुम्हाला सैन्याला दिली आहे चालवायला ..पण त्यात भरावयाचे जे Cartridge ... म्हणजे काडतूस आहे त्याला  गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. हे ऐकून तो जाम चिडलाच आणि माझी कॉलर च धरली ... मी बोललो अरे हो हे खरं आहे वाटलं च तर तू check कर ,,,, तपासून बघ ... तो मला इथेच थांब ... हालयच नाही ,,,, आलोच मी " असं बोलून तो गेला ... आणि मी तिथेच एका झाडा खाली बसलो ,,, जवळ जवळ अर्ध्या तासाने  तो लांबून येताना  दिसला आणि काहीतरी खूप कर्र्श्श काना जवळ वाजलं .. खडबडून जागाच झालो ......
मग लक्षात आलं कि हे एक स्वप्न होत


मंगळवार, ७ मे, २०१९

मोहिनी ऋतू



पायरव येता तुझी सारा आसमंत खुले
पहिल्या पावसाच्या सरीने ,
शहारती  झाड , वेली, फुले .

धुंद मातीचा सुवास
इंद्रधनूची कमान
दाटलेल्या आभाळातून
शामल मेघांचा वर्षाव ,

सरीवर सर
कधी हलका फुलका शिडकाव
खट्याळ अश्या ह्या पावसाचा
कधी मुसळधार वर्षांव

न्हाऊन निघते धरा
ओलीचिंब डोंगर दरी
पावसाळी ह्या ऋतूची
पाना पाना ला मोहिनी




बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

पिठाची गिरणी :

पिठाची गिरणी :
(आई घाईत दळण घेऊन निघालेली संध्याकाळचे ७:३० वाजलेले ,सगळीकडे अंधार पडल्यामुळे वेगवेगळे लाईट्स ची झगमगाट , रस्त्यावर घरी परतणारे ऑफिस वासी आणि बरेच ह्या सगळ्याची गाडीचे हॉर्न वाजवून "ए .... चल ना लवकर .... बिनडोक " असं मनातल्या मनात बोलून होणारी घाई , ज्याला जेवढ्या लवकर घरी जायचंय आणि जितकी जास्त घाई तेवढा जोरात हॉर्न ... , रस्त्यात मुलं क्रिकेट खेळता आहेत . असा सगळं तो वेळेचा प्रकार . तेव्हाडयात मया पळत पळत आई जवळ येऊन )
मयू : कुठे चाललीस
आई : अरे दळण संपलय , पिठाच्या गिरणीत चालले , येतो का
मयू : येतो कि , फक्त तुझा मोबाईल दे मला तिथे
आई : ह्हहो देत्ते ना ..... चला
(दोघे पण गिरणीत पोहोचतात तोडा वेळ बसून त्यांचं दळण होत तोपर्यंत आई तिथल्या काही ओळखीच्या बायकांशी गप्पा मारत असते आणि मयू मोबाइलला वर कोणता तरी गेम खेळत असतो )
आई : भैया कितना हुवा
भैया : ४ KG है ना तो चोबीस हुवा
आई ; तिच्या पर्स मधून २० रुपयाची एक नोट आणि ५ च एक नाणं त्याला देते , आणि दळण घेऊन निघते
मयू : अ ग २४ रुपये झालेत ना , मग एक रुपया घे कि त्याच्या कडून परत
आई : राहू दे पुढच्या वेळेस कमी देईल
मयू : आई १ रुपया तू सोडून दिलासा .... एक रुपया extra दिलासा त्याला .... तुला माहित आहे का ह्यात काय काय होऊ शकत , तुझ्या सारखं किती तरी जणींनी त्याला असं एक रुपया सोडला तर रोज तो किती एक्सट्रा कमवतो ... आणि त्याच तो काय करतो माहित आहे का .... आई असा एक रुपया कमवायला किती कष्ट पडतात तुला माहित आहे का ... दाखव एक रुपया एका दिवसात कमावून .... त्या पेक्षा तो मला दिला असता तर आज ह्या तुझ्या छोट्याश्या मुलाने एक छोटस चॉकोलेट खाल्लं असत आणि तो किती खुश झाला असता , तुझ्या बरोबर दर वेळेला दळण आणायला आला असता , आणि तू म्हणतेस ना कि माझं पिल्लू खुश तर मी पण खुश , आई… आज तू एका आनंदाला मुकलीस .
आई : हो का चला घरी...
Gauri

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

ऑफिस मधली दिवाळी ची तयारी

ऑफिस ,,,, दिवसातले सगळ्यात जास्त वेळ जिथे आपण असतो ती जागा , सेकंड होम च कि
आणि अश्या ह्या सेकंड होम मध्ये जेव्हा दिवाळी येते .... काय मज्जा असते
माझ्या ऑफिस ची तर तऱ्हा निराळी .... एकाच बिल्डिंग मध्ये दोन फ्लोअर मध्ये आहे माझं ऑफिस
फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड . फर्स्ट फ्लोअर म्हणजे सगळे MD , HR , Account अशी महत्वाची डिपार्टमेंट्स 
तर ग्रॉउंट फ्लोअर म्हणजे रिपेरिंग , स्टॉक , सर्विस, सेल्स अशी उद्योगी आणि उपद्व्यापी खाती .
दिवाळीच्या दिवसात ह्या दोन ठिकाणी मोठी कमालीची गंमत असते , दिवाळी दोन्ही कडे जोरात येते , अगदी जोरशोर से म्हणतात ना अगदी तशी . फक्त फरक एवढा कि वर ची दिवाळी हि विशीं च्या तरुणी सारखी तर खालची चाळीशीचा संसार सारखी विशीतील तरुणी नाही का तीच आपलं १०-१५ दिवस आधी पासूनच प्लांनिंग सुरु असत , parlor कधी जायचं , तिथे काय करून घ्यायच , hair cut कोणता करायचा , त्याला सूट होईल असे ड्रेससेस online search करायचे , ते कोणा सोबत कोणता घ्यायला जायचं हे सगळं परफेक्ट planning असत तसच वर च्या फ्लोअर वर दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पासून साफ सफाई , मागच्या वेळच काही दिवाळीच उरलं आहे का म्हणजे रांगोळीचे रंग पासून कंदील , पणत्या किंवा ऑफिस बॉय ने आणलेल्या त्या मेणाच्या छोटा दिवा सुद्धा ,,,, पण दर वेळी प्रमाणे ते सापडत नाही ते नाहीच . मग नवीन आणायचं, त्यासाठी advance घेऊन मागवून घेतलं जात ,आणि तेच खाली ,चाळीशी पंचेचाळीस ची संसारी स्त्री नाही का भाजणी करायला घेते , त्यात मधूनच कोणी तरी जेवायला मागत, कुणी तरी चहा ची फर्माईश करत, अस करत करत ती चकली कर, चिवडा कर, लाडू बनव असं सुरु असत आणि हे सगळं तिला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आत पूर्ण बनवून डब्यात भरून ठेवायचं असत, अगदी अशीच धावपळ खालची दिवाळीला १० दिवस राहिलेले ... ह्यावेळेला दिवाळी महिन्याचा सुरुवातीलाच म्हणजे मागच्या महिन्याचं टारगेट नीट झालं तर दिवाळी चांगली जाईल ह्या उद्देशाने धावा धाव . commitments ,dispatch ची घाई चालेल .एकूणच दिवाळी दोन्ही ठिकाणी जोरात उंबऱ्यात येऊन पोहोचलेली ,
आता दिवाळी ला ४ च दिवस राहिलेले वरती जवळ जवळ सगळी खरेदी झालेली , मावशी नि सगळं ऑफिस धुऊन पुसून एकदम चकाचक केलेलं , आता फक्त माळा लावाच्या , आणि खाली ..... खालची धावपळ म्हणजे टारगेट ला फक्त २ दिवस धावपळ , फोनाफोनि अशी धूम वरचा फ्लोअर दिवाळीच्या २ दिवस आधी सजून एकदम तय्यार , आणि खाली आत्ता कुठे लक्षात आलेलं कि…. अरे….. कंदील नाही लावलेले , वरचे उरलेत का काही……., मागच्या वेळेला एक लाइट ची माळ आणली होती तिचे सगळे लाइट सुरु आहे का , साल….. वरच्यानी नको का खाली लक्ष द्यायला……… वरती किती छान सजवलंय ..... आपण काय *** मुलं का .... एकाच कंपनी मध्ये काम करतो ना .... अशी संभाषण
आणि ह्या खदखदीचा थोडासा सुगावा जेव्हा वरच्या मंडळा ला लागतो तेव्हा urgent बेसिस वर एक छोटा designer आणि ऑफिसबॉय खाली पाठवून थोडे आकाश दिवे , थोडं लाइटिंग करून ऑफिसबॉय पळून जातो , खाली पण एक फुलांचं मोठ्ठ तोरण लावल जात , एक संस्कार भारतीची छानशी रांगोळी काढली जाते , दोन चार पणत्या (मेणाच्या ) पेटवून धनत्रयदिवस साजरा होतो. आणि दिवाळीची ४ दिवसाची हक्काची सुट्टी सुरु होते

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

घुसमट


परी घरातली सगळ्या लहान ,,, दोन भावांच्या पाठीवर झालेली .. मुलीची हौस होतीच बापटांना ... परी झाल्यावर तर  आकाश ठेंगण होत त्याना . त्या छोट्याश्या परीला जेव्हा त्यांनी हातात घेतलं .... डोळे पाण्याने भरून आले होते .... देवाने जगातलं खूप मोठ्ठ सुख पदरात टाकलं ... परीला परी सारखंच ठेवेन ... हे तेव्हा पासूनच त्यांनी मनात पक्क ठरवलं ... गोरी गोरी ,,, गोबऱ्या गालाची , निळ्या डोळ्याची, आणि हसली कि तिच्या उजव्या गालावर सुंदर खळी अशी होती परी बापट . हो ... तीच नाव त्यांनी परीच ठेवलं ...
शाळेत जाताना दोघे भाऊ तिला तीच शाळेचं दप्तर सुद्धा उचलू देत नसत तिघेही शाळेत बरोबर जात , परीला अगदी वर्गात सोडून हि दोघे त्यांच्या वर्गात जात . शाळा सुटल्यावर पण तिला घेऊन मगच निघत .... खूप जीव होता सगळ्यांचा परी मध्ये .. आई बाबां साठी तर ते शेंडेफळ होत ... ती जे म्हणेल ते तिला ते देत
परी जशी जशी मोठी होऊ लागली तस तशी ती अजूनच सुंदर दिसायला लागली तिचे निळे डोळे , गालावरची खळी मोहून टाकायची समोरच्याला , तिच्या भावाना  आणि वडिलांना तर तिचा खूप अभिमान होता ... पण आई ला खूप काळजी वाटे ... पोर दिसायला चांगली .... लोक नाहीत ना पण तशी .... त्या रोज तिची दुष्ट कधी  , त्यावर तिचे दोन्ही भाऊ आई ला समजावत ... आम्ही आहोत ना नको काळजी करू . परीला. रूपाचा गर्व नव्हता
एकदिवस तिचे वडील ऑफिस मधून घरी आले , चहा वैगरे घेतला आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं , तिचा मोठा भाऊ घरी होता , त्यांनी त्याला जोरात आवाज दिला , आणि खाली कोसळले , ऍम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात नेई  पर्यंत खूप उशीर झाला होता , पहिलाच attach  इतका जोरात होता कि त्यात ते गेले . घरातला मोठा आधार गेला , ह्यातून सावरायला सगळ्या घराला दोन वर्ष लागली
मोठ्या भावाला जॉब होता त्यावरच आता घराची जावबदारी होती , छोटा भाऊ लास्ट इयर ला होता ,,, आणि परी फर्स्ट इयर .  
कॉलेज संपलं आणि एक  स्थळ तिच्या साठी  नात्यातल्या नि सुचवलं .. चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे कळलं, पाच वर्षांपूर्वी च त्याचे वडील वारले होते आणि तेव्हा पासूनच तो घर सांभाळत होता घरात आई आणि तो .. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होत  ... स्थळ थोडं लांबच होत पण मुलगा चांगला होता.
लग्न ठरलं ... खूप धुमधडाक्यात परी शरद बरोबर लग्न झालं ... शरद एका private कंपनी मध्ये कामाला होता . पगार हि चांगला होता त्याला , परी त्याला पाहतच आवडली होती . शरद एक चांगला मुलगा होता पण  वाईट संगती मुळे  दारूचं अतिशय व्यसन लागलं  होत ,,, हे लग्ना नंतर थोड्याच दिवसात परीला कळाल , पण चौकशी केली तेव्हा कोणी का नाही सांगितलं ? हे कायम परी च्या मनात येई ,, शरद रोज पिऊनच घरी येत , घरी त्याची आई आणि त्यांच्या शेजारीच त्याची मोठी बहीण राहत
शरद सगळा  पगार आई ला देत आणि शरद चा पगार मिळाल्या मिळाल्या आई पहिले त्यांच्या बहिणीच्या घरी सगळं सामान भरून,  बिल भरी मग उरलेल्या पैस्यात  घराचं, तस बघितलं तर तिच्या नणंदेची  परिस्थिती चांगली होती त्यांचे मिस्टर एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब ला होते , पण कायम बाहेर फिरस्ती . त्यामुळे परीची नणंद कायम परी  कडेच असे  , आता हि आलीय मग आपल्याला आता ह्या घरात येणंजाण कमी होईल , पैसे पण नाही मिळणार शिवाय परी हि दिसायला छान ,, त्यांच्या पेक्षा तर क्तितीतरी पटीने छान होति ह्या विचारामुळे आणि द्वेषा मुळे तिच्या नणंदेने सासूच्या मनात परी विषयी वाईट मन करायला सुरवात केली
तस त्यांच्या मनात सुद्धा परीमुळे आता शरद आपल्याला पैसे देईल कि नाही हि एक गोष्ट होतीच आणि तिच्या नणंदेने त्याला अजून खतपाणी घालायला सुरुवात केली होती , त्या दोघी सतत परीला कायम टोमणे मारणे , काम काढून स्वतः निघून जात , तिला त्या शेजारी सुद्धा कोणाशी बोलू देत नसत  , परी हि गोष्ट घरी सांगू शकत नव्हती , आई ला वाईट वाटेल , दोघे भाऊ भांडायला येतील ... उगा वाद कशाला ह्या मुळे परी माहेरी जात  नव्हती
भावना ह्या स्त्री पुरुष फरक करत नाहीत त्या जश्या एका स्त्री ला असतात तश्या त्या एका पुरुषाला सुद्धा असतात . परी ला शरद चा सहवास आवडत होता, तो आपल्या बरोबर असावा त्याने आपलं कौतुक करावं , जवळ घ्यावं असं तिला नेहमी वाटे , एक नवरा म्हणून तो हि  खूप चांगलं होता , जरी पिऊन घरी येत होता तरी तो परी ला कधी त्रास देत नसे  त्याला परी खूप आवडत होती, हे जस शरद च्या आई ला आणि बहिणीला कळलं तस त्या रोज काही हि कारणावरून परिशी भांडू लागल्या . शरद तर नेहमी नशेतच घरी येत असे त्यामुळे परी तिची बाजू कोणा पुढे मांडणार .. माहेरी सांगता येत नव्हतं कि शरद जवळ मन मोकळं करता येत नव्हतं . तिच्या सासू आणि नणंदेचा राग इतका पराकोटीला गेला कि त्या आता शरद आणि परी मध्ये भांडण लावू लागल्या , इतकंच काय कि त्या दोघांना कसलाच एकांत मिळू देत नव्हत्या , जर ह्यांना चुकून एखाद मुलं झालच तर परत पैस्यात वाटा होईल ह्या हेतूने तिची नणंद कायम तिचा मुलगा शरद आणि परी च्या मध्ये पाठवत , रात्री सुद्धा त्याला शरद आणि परी जवळ झोपवी  लग्ना नंतर सुख तिच्या पासून पळूनच गेलं,  ना कुठले सणवार ना कुठली हौस ..  शरद आणि परी मध्ये सुखाचे असे फक्त एकच क्षण होता  ,लग्नाच्या रात्रीचा त्या नंतर ती दोघे कधीच एकत्र आली नाही ... किंवा येऊ दिली नाहीत  . लग्नाचं पाहिलं वर्ष संपत ना संपत तोच एक दिवस शरद घरी  खाली कोसळून बेशुद्ध झाला , दवाखान्यात ऍडमिट केल्यावर कळलं कि त्याच्या  लिव्हर ने आता काम कारण बंद केलाय आणि आता जर त्याने पिणं सोडलं नाही तर डॉक्टर सुद्धा काही करू शकणार नाही .
हे ऐकून सुद्धा शरद च्या आई आणि बहिणीचं मन कळवळल नाही त्या दिवशी सुद्धा त्या परिशी खूप भांडल्या ,शरद ला दवाखान्यातून घरी आणलं , पण त्याची सवय  काही सुटली नाही घरी ठेवलेली बाटली घेऊन तो परत सुरु झाला ... आणि व्हायचं तेच झाल
एका वर्षात शरद गेला . परी वर तर आभाळच कोसळलं ... हा कधी तरी सुधरेल ,, आपलं सगळं नीट होईल ह्या आशेवर ती सगळं सहन करत होती , शक्य होईल तितकं शरद ला दारू पासून लांब ठेवण्या चा प्रयत्न करी पण ... जे नको तेच झालं,
 हिच्या मुळेच माझा मुलगा गेला ... पांढऱ्या पायाची अवदसा म्हणून त्याच्या आई ने परीलाच दोषी केलं
शरद गेल्याच कळताच परी चे भाऊ आणि आई तिच्या घरी आले तेव्हा सुद्धा तिच्या सासूने आणि नणंदेने  त्यांच्याशी खूप भांडण केल , ह्या दोघी असं का बोलता हे त्यांना काळेच ना ... परी ने त्यांना कधीच काही सांगितलं नव्हतं .
दहाव्या दिवशी हिला इथून घेऊन जा तुमच्या बरोबर मी नाही सांभाळणार हिला असं तिच्या सासूने तिच्या भावा ना सांगितलं
.. ह्या असं का बोलतात हे त्या दिवशी परी ने सगळं अगदी पहिल्या दिवसा पासूनच सांगितलं, शेजाऱ्यांनी तिच्या भावांना सांगतील कि जेव्हा तुम्ही लग्न ठरवायच्या वेळेला चौकशी करायला आलात तेव्हा आदल्या दिवशी  शरद च्या आई ने आणि बहिणीने सगळ्यांना भांडून धमकावलं होत कि शरद बद्दल सगळं चांगलाच सांगायचं  . ऐकल्यावर सगळ्यांना खूप वाईट वाटलं आणि राग पण आला . तू आम्हाला का नाही सांगितलं ... पण आता बोलून काही उपयोग नव्हता .
परि च्या भावानी तिच्या सासूला ठणकावून सांगितलं आमची बहीण काही आम्हाला ओझं नाही ... सगळं आयुष्य आम्ही तिला सांभाळू पण ह्या पुढे तुमचा आमचा संबंध संपला कुठल्या हि प्रकारे केव्हा हि परी ला कॉन्टॅक्ट करायचा नाही
आणि ते परी ला घेऊन घरी आले.
दोन वर्ष परी भांबावलेल्या अवस्थेत होती , ना कोणाशी बोलत ना  धड खात पित ... आपण परीच नुकसान केलं हि भावना तिच्या भावां वाटे .
आता तीच परत लग्न नाही करायचं आपण तिला सांभाळू परत तिला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं . तिला थोडं मोकळं वाटेल , थोडं बाहेर पडली तर विचार बदलतील मोकळी होईल,  म्हणून घराजवळच एका कंपनी मध्ये ती जॉब करू लागली . भावांची लग्न झाली , त्यांना मुलं झाली, त्या मुलां मध्ये  परी रमली पण ती शरद ला विसरू नाही शकली
तो एका दिवसाचा  त्याचा सहवास ती कायम मनात साठवून होती तिने कितीही ती आठवण दडपण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्यात हवं तस यश येत नसे ,  भावना दाबून ठेवणं तिच्या साठी कठीण होत , सणावाराला , लग्न कार्यात तिच्या भावजाया , मैत्रिणी नटून थटून मुलां सोबत मिरवत , तेव्हा परी ला हि उणीव जास्त जाणवत . रमणीचे जीवन म्हणजेच  रती आणि वत्सलता ! ह्या दोन्ही जीवन प्रवृती तिच्या   जीवनातून वजा झाल्या होत्या
मनातल्या मनात ती कुढत होती .

Gauri Ekbote


सोमवार, २५ जून, २०१८

मन

आतुरलेले मन
आणि आसुसलेली धरा....

भेटीची आर्तता 
अन अंतराचा दुरावा