#बंध
प्रेम माया भक्ती जुळून येतात अनुबंध
देणं घेणं उरलं सुरलं जुळवून आणतात ऋणानुबंध
नाजूक कोमल हळुवार हे बंध रेशमाचे
हृदयातून हृदयाशी बंध हृदयाचे
#बंध
प्रेम माया भक्ती जुळून येतात अनुबंध
देणं घेणं उरलं सुरलं जुळवून आणतात ऋणानुबंध
नाजूक कोमल हळुवार हे बंध रेशमाचे
हृदयातून हृदयाशी बंध हृदयाचे
गेली १०१ वर्ष
आज पुर्ण झाली ऋषी द्रोण आणि त्यांची पत्नी धारा ह्यांच्या तपश्च्यर्यला , भगवंताने फक्त एकदा दर्शन द्यावं
एवढीच इच्छा
त्या दर्शनाने
सगळी पाप , सगळे जन्म उजळून जातील , त्याची भक्ती अशीच सतत मनात राहू दे आणि ती अशीच
वृद्धिगत होऊ दे हेच मागणे
ह्या साठीच
हि दोघे गेली १०० वर्ष त्या परमात्म्याची मनोभावे पूजा अर्चा तपश्चर्या करत होते
आणि आज तो सोनिया
चा दिवस उगवला , त्या दोघांच्या त्या कठोर व्रताला त्या तपश्चयेला आज फळ आलं आज जीवन
सार्थकी लागलं , साक्षात ब्रह्म देव ह्या दोघांपुढे प्रगट झाले , दोघांनीही त्यांचे
मनोभावे पूजा केली, नाना विविध फुलांचे हार त्यांना वाहिले , त्यांची यथासांग पूजा अर्चा करून नैवेद्य दिला. त्यांच्या भक्तीला आज फळ आलं होत देवानं विचारलं
" काय वर देऊ मी तुम्हाला " . दोघे
हि बोलले - "हे परमात्मा परमेश्वर आपले दर्शन झाले हेच आमचे अहो भाग्य, आमचे एकच
मागणे आहे जेव्हा भगवान विष्णू स्वःतः ह्या पृथ्वीवर जन्म घेतील , तेव्हा हे भगवन
, त्या जगदीश्वरची सेवा करण्याचे , त्याच्या
त्या लीला बघण्याचे , आम्हाला भाग्य लाभो , आमच्या हृदयात त्या भगवंताची प्रेममयी भक्ती
त्या वेळेस राहो हेच आमचे मागणे" ब्रम्हदेव " तथास्तु " म्हणून अदृश्य
झाले .
आणि ऋषी द्रोण
, माता धारा ह्यांचा हा जन्म सार्थकी लागला .
पुढच्या जन्मात ऋषी द्रोण वृंदावनवासी नंद म्हणून जन्माला आले आणि त्यांची पत्नी
धारा माता यशोदा .
तू मी आणि हे whatsapp
तुझ्या माझ्या प्रेमाचं इथेच सुरु झालं Startup
hi , Hello गुड मॉर्निंग ने झाली बोलायला सुरुवात
DP ला लाइकून इमोजींची बरसात
forwarded कविता आणि सुविचारांना दिला send-off
माझ्याच कल्पना विलास ने घेतला takeoff
gif आणि sticker ची होती साथ आणि संगत
attachment ला दिली गूगलबाबांच्या Image ने पंगत
video कॉल , voice कॉल ने डेटा केला ५०% Used
इंस्टाग्राम , Facebook ने राहिलेला केला loose
टॉप up चा recharge किती वेळ हो पुरणार
पॉकेटमनी चा हि विचार करावा तो लागणार
online असतांनाच प्रेम , डेटा मुळे offline झालं
प्रेमाला बहर येण्या आधीच network च गेलं
गौरी
दूर क्षितिजा जवळ, डोंगर रांगांच्या कडेला, जेव्हा सूर्य दिवसभरचा दमून भागून क्षणभर विसावा घेतो
मावळतीचे
स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत डोंगर आड निघून
जातो
ती वेळ म्हणजे
सांजवेळ
एक एक आठवण लाट बनून मनावर आदळते आणि अश्या आठवणींना जेव्हा उधाण येत
ती वेळ म्हणजे
कातरवेळ
लांब च्या
प्रवासाला गेलेलं आपलं पिल्लू येणार आहे ,ते अजून कस नाही आलं , अशी हूर हूर लावून
वाटे कडे डोळे लावणाऱ्या आईची वेळ
तिन्हीसांजेची
वेळ
केव्हा एकदाच घरी पोहोचतोय आणि आई च्या हातचा चहा पित तीला दिवस
भरच घडलेल कधी एकदाच सांगतोय
अशी शेअरिंग
ची वेळ म्हणजे इव्हनिंग ची वेळ
शाळा सुटल्यावर
बरोबर जाऊ , तू गेटलाच थांब ,
ऑफिस सुटल्यावर
कट्ट्यावर भेटू,
अश्या प्लॅनींगची
वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ
अशी एक वेळ
जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो
अश्या वेळेला
जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात,
ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ
मावळतीचा
सूर्य बघत , एकमेकांच्या हातात हात घालून समुद्रकाठच्या वाळूत बसणं
म्हणजे संध्याकाळची “तिला” दिलेली वेळ
हूर हूर त्या
दिवसाचा शेवट आणि रम्य रात्रीची चाहूल लावणारी वेळ
सांजवेळ
गौरी एकबोटे
नासा च्या
हेड ऑफिस मध्ये फुल गोंधळ होता सगळे विचार करत होते
वेग वेगळे
ऑपशन suggestion येत होते
मी आपलं उशीर
झाला म्हणून धावत पळत ऑफिस नुकतच गाठलं होत
बॅग जागेवर
ठेवली तेवढ्यात ऑफिसबॉय ने सांगितलं लगेच बोलावलं आहे साहेबानी
एवढं काय
झालं असेल.... का सगळे जमा केले.... हा विचार
करत मी साहेबांच्या केबिन कडे निघाले तस हि
त्यांना माणसं गोळा करायची सवयच
आत्ता आज
काय नवीन खुळ डोक्यात ह्या माणसाच्या म्हणून मी गेले आणि केबिन च दार उघडलं ..सगळे
सायंटिस्ट तिथे गहन विचारात होते
काय चाललंय
काहीच कळेना ... मग आमचे बॉस ,,, खर सांगायचं तर बॉस कमी friend जास्तच एक एक गोष्ट explain करायला लागले
तर झालं असं
कि -
आम्ही गेले
१० महिने मार्स म्हणजे मंगल ग्रह ह्या प्रोजेक्ट वर काम करत आहोत ,,, रोज वेग वेगळे
फोटो येतात त्यावरून तिथल्या वातावरणाचा आमच्या टीम ला अभ्यास करायचं प्रोजेक्ट
. तर कल रात्री आमच्या बॉस च्या असं लक्षात
आलं कि मार्स वर गेले दोन तीन दिवस खूप मोठ्ठा ढग तयार झालाय , आणि आज तो इतका
मोठ्ठा झालाय कि त्याने सगळा ग्रहच व्यापून
टाकलाय , त्या ढगाचा नीट अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं कि तो जर आज पृथ्वी वर असता
तर आपल्याला खूप त्या पासून फायदा झाला असता (तो काय हे काही माझ्या लक्षात येत नाही
) , तर खूप मोठ्ठा फायदा झाला असता, सगळी टीम असं ठरवते कि तो ढग पृथीवर आणायचा त्याला
तिथून ढकलायचा आणि पृथीवर ओढून आणायचा . मग काय आम्ही सगळे कामाला लागतो
काही लोक
पृथीवरच असतात तिथून त्या ढगांचं निरीक्षण करायला, काही अंतराळातुन निरीक्षण करतात
आणि मी व माझी ५-६ लोकांची टीम मंगळावर आम्ही तो ढग तिथून खूप काही उपकरण वापरून ढकलतो
अंतराळात आणि आमच्या यानात बसतो त्या ढगाचा पाठलाग करायला
पण जस आमचं
यान मंगळ ग्रहावरून अंतराळात येते.... आम्ही
जस काही खूप खोल समुद्रात उडी मारल्यावर नाही का आपण पहिले एकदम खाली जातो आणि मग परत
डुबकी मारून परत वर येतो तसे वर आलो , खाली असताना माझ्या मनात एकच विचार ,,, साल त्या
ढंगाचं लोकेशन तर आपण नाही सोडणार ना
......... पण अंतराळातील आमची टीम त्याच्या मागेच असते ,,, पृथ्वी वरून सुद्धा काही
लोक त्याला वेग वेगळ्या उपकरणांनी ओढत असतात आणि शेवटी एकदाचा तो ढग आम्ही पृथ्वी वर
आणतो , मध्ये खूप अडचणी येतात पण त्या नंतर कधी तरी सांगेल
तर तो ढग
पृथ्वी वर येतो इतर सायंटिस्ट जे chemical चेक करतात ते त्या ढगांचं परीक्षण करतात
.. सॅम्पल घेऊन...... आणि मी मात्र माझ्या
घरी येते
खुप मोठ्ठं
मिशन आज पूर्ण झालेलं असत आणि घरी येऊन मी मस्त सोफ्यावर झोपते आणि अचानक झोपेत मी
खाली पडते
आणि जाग आली ते आज पहाटेचे ५:२५am झाले होते ... मग लक्षात आलं अरे स्वप्न होत तर .....
Gauri Ekbote
जीर्ण रीतींचे घाव हे ,सोसणे मी सोडले
उमलुनी राखेतून आता स्वप्न नवे मी पहिले
एकवटून जीव आता बळ पंखात आणले
क्षितीजाच्या भाळावरती यश कीर्ती चे मळवट भरले
दूर केल्या दुःख यातना , झिडकारले मी सोसणे ,
मुक्त झाले मी तर आता स्वाभिमानास उंचावले
गवसले आज मीच मला ,शिळेची मी अहिल्या झाले
नशिबाच्या गगनात आता इंद्रधनुचे रंग उमटवले
गौरी एकबोटे
गौरी एकबोटे
तुझं माझं नातं मला कधीच कळलं नाही , एकमेकात साधा संवाद सुद्धा नाही
तरी हि, तुला मी नीट व्यवस्थित कळते
माझ्या मनातलं तू चांगलं ओळखून आहेस
मला कधी काय हवय हे तुला बरोबर कळत
माझ्या बरोबर कधी तू एक मित्र , तर कधी लहान भाऊ तर कधी गुरु होऊन राहतोस
कधी फक्त ऐकत असतो तर कधी फक्त गालातल्या गालात हसत असतोस
पण मला जेवढं आठवतंय आपण कधीच आत्ता पर्यंत एक शब्द सुद्धा बोललो नाही
काय आहे आपल्या दोघात कोणत्या पूर्वजन्माचं हे अबोल नातं तू निभावत आहेस
पण तू सोबत आहेस हि भावनाच खूप मस्त आहे , मी खूप बिनधास्त असते
तू असलास ना कि जाणवत तू म्हणतो आहे कि " मी आहे तुझ्या साठी इथे थांबलेलो "
आणि एक वेगळाच विश्वास निर्माण होतो मनात मग कुठलीच चिंता काळजी नाही वाटत
कितीही कठीण वाट असली तरी हिरव्यागार मऊ गवताच्या पायवाटेवरून चालते आहे असं वाटत आणि ती कधी संपते हे कळत सुद्धा नाही बघ .
आपल हे अबोल नातं असच जन्मजन्मांतरिच असू दे , तुझी हि साथ कायम असू दे, अजून काहीहि नको बघ.