mazionjal

मंगळवार, २१ मार्च, २०१७

तो.................

तसा  तो दर महिन्याला भेटतो , शेवटी शेवटी त्याला भेटण्याची ओढ जरा जास्त तीव्र होत जाते
अशी काय ओढ आहे त्याच्यात ,,,, कि तो आकर्षितच करत असतो
कितीही लांब राहायचा प्रयत्न केला त्याच्या पासून ..... पण त्याची आठवण काही जात नाही
तो भेटणायचा दिवस हि ठरलेला आहे ... त्या दिवसाची तर खूप आतुरतेने वाट बघत असते
तो भेटला ना कि सगळं जग माझ्या खिशात ..... असाच वाटत
एक वेगळाच विश्वास देऊन जातो तो ..... तो दिवस म्हणजे एकदम राजा झाल्यासारखाच

तो भेटून गेल्यावर पहिले आठ दिवस मस्त जातात त्याने दिलेल्या आठवणीत .... त्याच्या त्या गोंडस रूपात हरवलेले दिवस असतात ते
पण नंतर परत तेच घडत ...... परत त्याची आठवण यायला लागते ..... तो कधी भेटतोय असं होतं
कुठे जावस च वाटत नाही .... कुणाशी बोलावसं पण नाही वाटत ..... फक्त त्याचाच विचार करावा लागतो....

कधी कधी वाटत   ....... कि द्यावं सोडून सगळं ,,,,,, जावं मस्त फिरावं .. मज्जा करावी
पण एकदम त्याची जाणीव भासवते  आणि मी परत ऑफिस ला जाते आणि परत तो महिन्याच्या ७ तारखेला माझ्या बँक अकाउंट ला जमा होतो
.... गौरी 

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मराठी दिन

खरं आहे , नुसतं ओरडून शुभेच्छा देऊन काही होत नाही , मराठीपण जपावं लागत, त्याची लाज बाळगता चार चौघातही शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे. तरच खरा मराठी , नाहीतर बरेच लोक पाहिलेले कि बाहेर कुठे गेले कि सुरुवात हिंदी किंवा English  मध्ये करतात , खरं पाहिलं तर बोलणारा पण मराठी असतो आणि ऐकणारा पण मराठीच .
आज सगळी कडे मॅसेजस ,images  share  होता आहेत , मराठी दिनाच्या शुभेच्छा पण खरंच मन पासून आहेत का त्या?
आपण महाराष्र्टीयन म्हणजे मराठी लोक , पण किती लोक मराठी वर्तमानपत्र विकत घेऊन आवर्जून वाचतात  , वर्षभरात किती मराठी पुस्तक विकत घेऊन वाचतात , विकत सोडा पण किती लोक मराठी पुस्तक वाचतात ,असे किती मराठी चित्रपट पाहिलेले  आठवतात .

मराठी भाषा हि  समृद्ध , वैभवशाली , सर्वसमावेशक , सालंकृत  , ऐतिहासिक  वारसा असलेली, वळेल तशी , समजायला सोपी , आणि भरपूर वाचनीय संग्रह असलेली अशी आहे ,तिचा मन सन्मान , जपवणूक आपणच केल पाहिजे . तरच पुढल्या पिढी ला ती आनंदाने स्वीकारेल .
आपण आपले विचार हे मातृभाषेतूनच योग्य आणि परिणामकारक मांडू शकतो दुसऱ्या कोणत्याच भाषेत ते तितक्या योग्य पद्धतीने नाही मांडता येत
मराठी भाषेचा उगम संस्कृत मधूनच झाला असं एक मत आहेबरेच संस्कृत शब्द मराठीत आहेत . गाथा सप्तशती,  ज्ञानेश्वरी,  ज्योतिषरत्नमाला हे ग्रंथ मराठीतच आहेत.. ६८० च्या ताम्रपटात 'पन्नास, आणि प्रिथवी' हे शब्द आहेत म्हणून ती मराठीची सुरुवात आहे असे मानतात , मराठी भाषा सुंदर कामिनीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची आहे, असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे

असाच एक मराठीला आपली माय मानून जन्मलेला आणि तिच्या कुशीत वाढलेला , कवी, लेखक, नाटककार , आत्मनिष्ठ समाजनिष्ठ, मराठीतले महत्त्वाचा लेखक, कि ज्याच्या नावाशिवाय मराठी लेखन संपदा सुरु होत नाही , सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत् असे त्यांचे वर्णन करतात, वि.. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर, त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या मते अनुभवाने साहित्याचा आशय ठरवत असतो , साहित्याच पोतं , त्यातील धागे म्हणजे अनुभव , जर अनुभव संकुचित, वरवरचा असेल तर ते साहित्य  रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते. अनुभव माणसा माणसा चा वेगळा , तो कधी सारखा नसतो त्यामुळे मिळणारे विषय हि संपत नाही आणि त्यामुळेच साहित्य वृद्धिगंत होत राहते , हे सगळं अनुभवानेच होत . एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता केवलता प्राप्त होते..

हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला.................

तर कधी 

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही............................

 कधी कधी :
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा

 ह्या सारख्या कविता लिहिणारा हा कवी वयाच्या २० व्या वर्षी सत्याग्रहात उताराला , तो काळ असेल १९३२ चा , असा काळ  कि ज्या वेळेला स्पृश्य अस्पृश्य असा भेद चाले , त्यावेळेला नासिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्याना जाण्याची मनाई होती , त्यांना हि रामाचे दर्शन व्हावे , ह्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी  जो सत्याग्रह केला त्यात आपले कवी कुसुमाग्रज सुद्धा होते .
१९४२ हा शिरवाडकरांच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा ठरला , वि खांडेकर ह्यांनी स्व खर्चाने कुसुमाग्रजांच्या कवितांचा संग्रह विशाखा नावाने प्रसिद्ध केला.
आणि त्यात प्रस्थावनेत लिहिलं "रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही , डोळ्यांना ते आपोआपच जाणवते , रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करत बसत नाही , वाऱ्याच्या झुळुकेबरोबर तो आला कि मन क्षणार्धात प्रसन्न होऊन जात , लहान मुलाच्या नाजूक पाप्याची अवीट गोडी कळायला पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही , एका स्पर्शात  ओठांना त्या अमृताची माधुरी कळते, सुंदर आणि सजीव कवितेचहि असाच आहे तिला प्रस्तावना हवी कशाला ?"

वि व शिरवाडकर ह्यांनी  १९६४ सालच्या मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद  भूषवले.
१९९१ साली भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार आणि  वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
अश्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
Gauri Ekbote 

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

कधी कधी......

कधी कधी वाटत पक्षी व्हावं
उंच उंच आभाळात उडत राहावं ,

कधी वाटत डोंगर व्हावं
एकाच जागी स्थिर राहावं

कधी वाटत झाड व्हावं
हिरवीगार  शाल पांघरून बसावं

कधी वाटत फुल व्हावं
रंगीबेरंगी सुगंधी व्हावं

कधी वाटत पाऊस व्हावं
सर्व धारेला चिंब भिजवावं

कधी वाटत ढग व्हावं
वाऱ्या बरोबर फिरत राहावं

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

निवडणूक प्रचार

निवडणुकीचे वारे वाहिला सुरुवात झालीये .... काय कस कळलं .... त्याच काय आहे आमच्या शेजारी आमचे आमदार तात्या राहतात ना . खरंतर त्याच नाव तात्याचं पण आम्हीच शाळेपासून त्याला आमदार तात्या म्हणतो , यंदा तात्या उमेद्वार म्हणून निवडूणुकीला उभा आहे. त्यामुळेच जरा लवकरच हे निवडणुकीचं वादळ आमच्या गल्लीत आलय.
तात्या , कॉम्पुटर इंजिनीर , खूप गप्पिष्ट , गप्पा मारायला खूप आवडत त्याला, त्याचा लोक संग्रह खूप मोठा , लहान मुलानं पासून मोठ्यानं पर्यंत सगळे त्याचे मित्र .
त्याच्या मुळेच निवडणूक , प्रचार काय असतो , तो कसा करतात, हे थोडंफार कळलं
मोठी धम्माल असते , रणधुमाळीच

तात्यांचे वडील नाना आणि नानांचे आबा म्हणजे वडील हे सुद्धा राजकीय नेते त्यामुळे तात्याच्या रक्तातच राजकारण होत
आम्ही लहान होतो तेव्हा आबा आणि नाना आम्हा मुलांना समजावयाचे पण तेव्हा काही कळायचं नाही
तर तेव्हाच्या निवडणूका आणि आता  चा  अनुभव खूप वेगळा  खूप बदल झालेला ,

लहान असताना निवडणूक असल्या म्हणजे आबा आणि नाना प्रचार सभेला जाताताना आम्ही पाहिलेलं , दोघे हि खूप छान भाषण करायचे , खूप गर्दी असायची त्यांच्या सभेला . त्याचा जास्त विश्वास प्रचार सभा, भाषण ह्यावर , वेगवेगळ्या गावात त्यांच्या सभा असायच्या , कधी कधी ह्या सभांमधून विरोधी पक्षावर आरोप प्रत्यारोप व्हायचे . घणाघाती भाषण व्हायची .
त्यानंतर गल्लीबोळातून प्रचार केला जायचा , मोटारसायकलवर पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन घोषणा देत फिरायचे .
मोठ्या थाटात , ऐटीत , दिमागात नाना आणि शेजारी आबा वाहनाच्या रथात उभे राहून मतदानाचा जोगवा मागायचे .
आणि त्यांच्या रथामागे पायी चालणारे त्यांचे उत्साही  समर्थक  असायचे . कधी कधी आम्ही पण जायचो
आमच्या गल्लीत जेवणावळी उठायच्या , पंगतीच्या पंगती जेवण व्हायचं . रॅली काय, रॉड शो काय , प्रचार सभा काय , मतदारांच्या घराघरातून भेटी काय अगदी उत्सहाने  नाना आणि आबा करायचे .


नानांना वाटलं तात्या पण असच करेल पण तात्या आमचा  थोडा हायटेक त्याने हे सगळं केलच , पण ह्या बरोबर ह्या वेळी त्याने काही नवीन गोष्टी ची साथ घेतली  आणि ती म्हणजे सोसिअल मीडिया आणि डिजिटल मीडिया
तात्याने नानाच्या कारकिर्दीत पक्षाच संकेत स्थळ बनवलं होत त्यात पक्षाची सगळी माहिती, उमेदवाराची नवे, फोटो पक्षाचं चिन्ह सगळं आकर्षक पद्धतीने मांडलं होत .
तर जस निवडणुकीचे वारे सुरु झाले तात्याने वोटर्स हेल्प लाइन सुरु केली , त्यात मतदारांना हवी ती माहिती तो provied करत होता ..mobile  द्वारे तो नागरिकांशी अप्रत्यक्ष वैयक्तिक पातळीवर प्रचार करत होता . संकेत स्थळ , संपर्क क्रमांक , emails  ह्याच्या माध्यमातून तो मतदारांच्या संपर्कात होता
तात्याचं स्वतःच facebook  आणि twitter  अकाउंट होत तो ते रोज update  करायचा
newpaper  मधून , hording वर , तात्यांचे सुंदर फोटो सगळीकडे लावण्यात आले होते
तात्याने IT  ची काही लोक hire केले होते हि लोक रोज २४ तास ह्या माध्यमांवर update  टाकत होते , त्याचे लेख मुलाखती छापून येत होत्या .

आणि ह्या सगळ्याचा वापर करून तात्या बहुमताने निवडून आला

मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

टीव्हीच्या अतिक्रमणाने कमी होत असलेली वाचनाची सवय

खरंतर ह्या विषयावर बराच काही लिहून झालंय , लिहिता आहेत आणि ह्या समस्येवर मात करण्यासाठी  काम पण सुरु आहे,टीव्ही अतिक्रमण इतकं वाढलंय कि त्यामुळे वाचन हा प्रकार , हि सवय आता कमीच होत आहे , ती सवय राहिलीच नाही सगळं कस झटपट  मिळतंय shortcut मिळतंय , चलचित्र सकट, परत संवादा सकट जशीच्या तशी परिस्थिती उभी केली जाते
वेगवेगळे विषय घेऊन लोक त्यावर सिरीयल , मूवी काढू पाहतात आणि वाचनापेक्षा ती सिरीयल किंवा तो मूवी बघायला गर्दी होते पण एक विचार केलेला आहे का ? कि तो सिरीयल किंवा मूवी चा रायटर हा त्यातील रंजकता वाढावी म्हणून काही प्रयोग करतात मेन  स्क्रिप्ट मध्ये थोडे बदल घडवून आणतात,आणि ती जास्तीतजास्त कशी रंजक होईल, जास्तीतजास्त कशी उत्सुकता वाढवेल ह्यावर भर घालतात , . आणि  कधीही ते पुस्तक वाचलेला पण नुसतं नाव ऐकून असलेला , गर्दी करणारा माझा प्रेक्षक तेच खर असं समजतो , कुठलीही शहानिशा करतात .त्यामुळे त्याला जे कळत  ते त्याने त्या रायटर च्या नजरेतून पाहिलेलाच . ती एकच बाजून त्याला कळते . ह्या अश्या प्रकारामुळे खरंच ते लिहिलेल त्या व्यक्ती पर्यंत पोहोचत का, समाजापर्यंत जे पोहोचवायचं आहे ते  पोहोचत का? कोणत्या दृष्टिटकोनातून त्या लिहिणाऱ्याने लिहिलेलं आहे ते काळत का? लिहिण्यामागचा खरा उद्देश प्रेक्षकाला कळतो का?

वाचनामुळे व्यक्तीत काही एक्सट्रा गुण निर्माण होत असतात , त्याच्या कळत आणि नकळत . वाचन हा सुंदर मित्र  तर आहेच शिवाय तो माणसाची भाषाशैली , वैचारिक परिपक्वता वाढवतो , व्यक्ती स्वतःच असं मत तयार करते , विचार करायला शिकते, वाचन ते त्याला तस करायला भागच पडते, ह्यातूनच व्यक्ती त्याच मत ठाम पाने मांडू शकते, ह्या उलट  टीव्ही  सिरीयल फक्त टी आर पी वाढवता .

ह्या धावपळीच्या युगात निवांत असा वेळ कमीच असतो , आणि तोही व्यक्ती टीव्ही  पुढे घालवतात , त्या सिरिअल्स मध्ये मोस्टली सासू सून तू तू मै मै , पुनर्जन्म , भूत खेत ह्याच गोष्टी असतात . ह्यातुन असा कुठली भाषाशैली, कुठलं व्यक्तिमत्व , कुठलं मत आणि कुठली मानसिकता तयार होईल . ह्यातून माणूस घडण्यापेक्षा नकारात्मकता वाढीस जास्त लागेल ., ह्या गोष्टीत फक्त व्ह्यूवर वाढवतात .
मी पूर्णतः टीव्ही च्या विरोधी नाही काही सिरिअल्स मुव्ही खरंच खूप छान असतात . पण वाहिन्यांवर टीआरपी वाढवण्यासाठी चाललेली चढाओढ हे सगळं रेसिंग सारखं वाटत , एक प्रकारचं अतिक्रमण झाल्यासारखं वाटत
ह्या सुंदर अशा माध्यमाचं खूप भयानक रित्या वापरकरण चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे.

प्राईम टाइम मधील सेरिअलची तर इतकी जाहिरात केली जाते कि व्यक्ती हि त्याला वेळेला ते बघणे सोडत नाही आणि अश्याप्रकारे hammering केलं जात,  हे त्या व्यक्तीच्या त्या वेळेवर अतिक्रमण च असत , मग पुस्तक वाचायला कुठून वेळ मिळणार .
वाचनात व्यक्ती जे काही वाचतो ते वाचलेल , तो काळ , ती व्यक्तिमत्व , ती परिस्थिती आपण आपल्या पद्धतीनं स्वतः आपल्या मनात घडवतो , तयार करतो , ते किती पुढे न्यायचं हे आपण ठरवतो , त्याला कुठलाही वेळेचं बंधन नाही , वाचलेलं जे दृश्य अशा प्रकारे आपण आपल्या मनात तयार करतो , ते कायम एक ठसा उमटवत , ते स्वतः आपण जगतो . त्यातीलं परिस्थिती वर विचार करतो, ह्यातून त्या काळातील परीस्थिती, विचार करण्याची पद्धत समजते.

वाचन माणसाला एक व्यक्ती बनवत , व्यक्ती म्हणून जगायला शिकवत , व्यक्तिमत्वाला एक आकार देत , ह्या उलट टीव्ही  सिरिअल्स फक्त प्रेक्षक बनवत आणि तोच वाढवतात .