mazionjal

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

मनाची अवस्था

मनात खूप भीती वाटून पोटात गोळा  उठतो ,
दोन्ही कडे नाही म्हणूनच शकत नाही........
खूप धड धड होत,,,,,,खूप मोठ्याने धाय मोकलून रडावस वाटत
एकदम  एकट पडल्या सारख होत
दोन शिकाऱ्यान मध्ये अडकलेल्या सावज  सारख
नक्की कुठे पळ काढावा , दिशाच नसलेल्या सारख
सैरभैर झाल्या सारख, एकदम होत्याच नवत.........
मनात एक वेगळीच दडपल्या सारखी भवना, मार्गहीन दिशाहीन अवस्था
एक वेगळीच हतबलता
त्या स्थितीचा राग हि आणि अगतिकता हिं 
मनात एक घोंगावणार चक्री वादळच
हे वादळ सगळ ओढून नेत त्यात शांतता
विचार , सद्सद विवेक बुद्धी , दृष्टीकोन सगळच
हे सगळ गोलाकार फिरायला लागत स्वतः भोवती
एखाद्या कचऱ्या सारख
आणि आपण फक्त त्या कडे अगतिकपणे बघत असतो
काहीही करता
खूप चीड , राग, संताप होतो

पण तो व्यक्त हि नाही करू शकत
सुंदर माझ्या घराला
आहे आंब्याचे तोरण
  नक्षीदार रांगोळी
अंगणी तुळशी वृंदावन
       
      पारिजातकाचा सडा
       चाफा , मनमोहक मोगरा
    हा आहे माझ्या परसातला वाडा
   
            चंदनाचा उंबरा
      नक्षीदार दरवाजा
 आत शिरताच  जाणवते
निखळ अशी माया 

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५




वेळ बदलते  तशी माणस , नाती ,परिस्थिती आणि आपण स्वतः हि बदलतो
खूप चिडका अचानक शांत होतो
खूप रागीट एकदम प्रेमळ होऊन जातो
खूप दुःखाचे दिवस एकदम  सुखाच रूप घेऊन येतात
खूप मस्त वाटत
पण त्यासाठी जी वाट बघावी लागते
ती अगदी नकोशी होऊन जाते
कधी संपेल ! अस होत
मनच मनाला समजावत , 'झाल आता ! फक्त हत्ती गेलंय , शेपूट तेवढ राहिलंय , बदलेल नक्की सगळ '
ह्या आशेवर राहिलेलं शेपूट ढकलायचं
आशा असते , स्वप्न असतात म्हणून तर आपण जिवंत आहोत

हो

सोमवार, २३ मार्च, २०१५

शब्द शब्दांचीये खेळी

 शब्द शब्दांचीये खेळी 
भाव भावनांची मांदियाळी 
शब्द अस्त्राचा हा मारा 
भावनांचा कोंडमारा 
उर दाटुनिया येइ
डोळा पाऊस वणवा ।।
        जीवा घालमेल फार 
        सर्व आप्तस्वकीय 
         जाऊ कोणा तुजविण शरण 
        आसरा एक तुझेच चरण ।।
                 …… गौरी

गुरुवार, १९ मार्च, २०१५

नाती



वेळ बदलते
माणसं बदलतात,
ह्या बदलात नाती पण वेग-वेगळी वळणं घेतात।।

काही  नाती मोठ्या रस्त्याला जाऊन मिळतात, आणि विस्तृत होतात।
काही पायवाटे सारखी लुप्त होतात
. गौरी

सोमवार, १६ मार्च, २०१५

इन्तजार

बैठे थे दिये जला कर उनकी राह मै
कभी तो वो आयेंगे तो अंधेरा न रहे
दिये जल रहे थे आंखो के पानी के सांथ
राह तक रहे थे उम्मिदो के चीरागो के साथ
वो आये तो जरूर मगर
छुट गया सांसो का साथ ।।
…ग़ौरि

बुधवार, ११ मार्च, २०१५

आठवण


 
आठवण मनाला भुतकाळात
घेऊन जाणारी
           आठवण डोळ्यात पाणी असताना
            हसवून जाणारी
आठवण दुःखातही
सुखाची याद देणारी
             आठवण तु नसताना
              तु असल्याचा भास देणारी
आठवण माझ्या अन तुझ्या
नात्यातली ओढ वाढवणारी
                आठवण मनाला भिडणारी
                आणि काळजात घर करणारी
आठवण कधी-कधी येऊ नये तरीही
येणारी अन् काळीज कुरतडणारी
...... गौरी

सोमवार, ९ मार्च, २०१५

देवा इठ्ठला



देवा इठ्ठला दे दरसन एकवार

देवा इठ्ठला घे कुसीत एकवार

 

देवा इठ्ठला हो ह्या लेकराची माय

एकवार फिरीव त्यो मायेचा हात

 

तुझ्या नावाच याड

बघ लागलं कस

तुझ्या इन नाही

काही दिसत दुसरं

 

तूच माय बाप  माझा

तूच माझा देव

तूच माझं घरदार

तूच माझी ठेव

 

देवा इठ्ठला नको डावलू मला

जीव आला कंठात दे  दरसन एकवार

 

गौरी ..





शुक्रवार, ६ मार्च, २०१५

वारी


नाम विठ्ठलाचे घेतो पायी वारी मी चालतो 
वसा वारी चा घेतला जीवाचा जिवलग भेटावा 

काय भक्ती चा हा महिमा 
सारा गाव विठ्ठलमय झाला 
नाही इथे भेदा भेद 
नाही कुणी उच्च निच्च 

सारा आसमंत विठ्ठल 
मी विठ्ठल तू विठ्ठल 

गौरी 

गुरुवार, ५ मार्च, २०१५

सांज अशी रंगवून दे…।


इतक सोप असत का विसरून जाण......


इतक सोप असत का विसरून जाण ।
मनावर झालेल्या जखमानवर मलम लावण ।।
भळभळणा ऱ्या रक्ताने कायम
माखलेल्या असतात त्या
वरून जरी भरल्या असल्या
तरी खोल आत
कुठेतरी ओल्या असतात त्या ।।

एकावर एक वार होताच असतात
जखम अजुन खोल करत असतात
पण ह्या वेदनेत पण चेहरा
मात्र आनंदी ठेवायचा असतो
कारण कुणीतरी त्यात खुश होत असत ।।

काही झालाच नाही अशी मनाची
समजूत काढायची
एकांतात मात्र जखमेवर
अलगद फुंकर घालायची
ह्या जखमा म्हणजे अनुभव समजायचे
भावनांना आवर घालून हसत जगात राहायचे ।

गौरी

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

वाळवंट

मला ह्या वाळवणटाच खूप कौतुक वाटत
काय आहे हा नक्की
सगळ विषारी , काटेरी पोटात सामावणारा
रणरणत ऊन सहन करणारा
हिरवळीची आशा न धरता
तप्त वाळूच स्वतःच अस्तिव म्हणून स्वीकारणारा
कस जमत याला ?

का येवढ सहन करतो हा ?
ह्याला कुणाचा आधार हि नको 
म्हणून तर ओंजळीतली वाळू निसटून जाते बोटातून 
खूप साधा आणि सरळ स्वभावाचा 
दिवसा तापलेला आणि रात्री शांत गारठलेला . 
कसली तपस्या करतोय , कुणा साठी आणि का ?