mazionjal

गुरुवार, ५ मार्च, २०१५

इतक सोप असत का विसरून जाण......


इतक सोप असत का विसरून जाण ।
मनावर झालेल्या जखमानवर मलम लावण ।।
भळभळणा ऱ्या रक्ताने कायम
माखलेल्या असतात त्या
वरून जरी भरल्या असल्या
तरी खोल आत
कुठेतरी ओल्या असतात त्या ।।

एकावर एक वार होताच असतात
जखम अजुन खोल करत असतात
पण ह्या वेदनेत पण चेहरा
मात्र आनंदी ठेवायचा असतो
कारण कुणीतरी त्यात खुश होत असत ।।

काही झालाच नाही अशी मनाची
समजूत काढायची
एकांतात मात्र जखमेवर
अलगद फुंकर घालायची
ह्या जखमा म्हणजे अनुभव समजायचे
भावनांना आवर घालून हसत जगात राहायचे ।

गौरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा