mazionjal

सोमवार, २३ मार्च, २०१५

शब्द शब्दांचीये खेळी

 शब्द शब्दांचीये खेळी 
भाव भावनांची मांदियाळी 
शब्द अस्त्राचा हा मारा 
भावनांचा कोंडमारा 
उर दाटुनिया येइ
डोळा पाऊस वणवा ।।
        जीवा घालमेल फार 
        सर्व आप्तस्वकीय 
         जाऊ कोणा तुजविण शरण 
        आसरा एक तुझेच चरण ।।
                 …… गौरी

गुरुवार, १९ मार्च, २०१५

नाती



वेळ बदलते
माणसं बदलतात,
ह्या बदलात नाती पण वेग-वेगळी वळणं घेतात।।

काही  नाती मोठ्या रस्त्याला जाऊन मिळतात, आणि विस्तृत होतात।
काही पायवाटे सारखी लुप्त होतात
. गौरी

सोमवार, १६ मार्च, २०१५

इन्तजार

बैठे थे दिये जला कर उनकी राह मै
कभी तो वो आयेंगे तो अंधेरा न रहे
दिये जल रहे थे आंखो के पानी के सांथ
राह तक रहे थे उम्मिदो के चीरागो के साथ
वो आये तो जरूर मगर
छुट गया सांसो का साथ ।।
…ग़ौरि

बुधवार, ११ मार्च, २०१५

आठवण


 
आठवण मनाला भुतकाळात
घेऊन जाणारी
           आठवण डोळ्यात पाणी असताना
            हसवून जाणारी
आठवण दुःखातही
सुखाची याद देणारी
             आठवण तु नसताना
              तु असल्याचा भास देणारी
आठवण माझ्या अन तुझ्या
नात्यातली ओढ वाढवणारी
                आठवण मनाला भिडणारी
                आणि काळजात घर करणारी
आठवण कधी-कधी येऊ नये तरीही
येणारी अन् काळीज कुरतडणारी
...... गौरी

सोमवार, ९ मार्च, २०१५

देवा इठ्ठला



देवा इठ्ठला दे दरसन एकवार

देवा इठ्ठला घे कुसीत एकवार

 

देवा इठ्ठला हो ह्या लेकराची माय

एकवार फिरीव त्यो मायेचा हात

 

तुझ्या नावाच याड

बघ लागलं कस

तुझ्या इन नाही

काही दिसत दुसरं

 

तूच माय बाप  माझा

तूच माझा देव

तूच माझं घरदार

तूच माझी ठेव

 

देवा इठ्ठला नको डावलू मला

जीव आला कंठात दे  दरसन एकवार

 

गौरी ..





शुक्रवार, ६ मार्च, २०१५

वारी


नाम विठ्ठलाचे घेतो पायी वारी मी चालतो 
वसा वारी चा घेतला जीवाचा जिवलग भेटावा 

काय भक्ती चा हा महिमा 
सारा गाव विठ्ठलमय झाला 
नाही इथे भेदा भेद 
नाही कुणी उच्च निच्च 

सारा आसमंत विठ्ठल 
मी विठ्ठल तू विठ्ठल 

गौरी 

गुरुवार, ५ मार्च, २०१५

सांज अशी रंगवून दे…।


इतक सोप असत का विसरून जाण......


इतक सोप असत का विसरून जाण ।
मनावर झालेल्या जखमानवर मलम लावण ।।
भळभळणा ऱ्या रक्ताने कायम
माखलेल्या असतात त्या
वरून जरी भरल्या असल्या
तरी खोल आत
कुठेतरी ओल्या असतात त्या ।।

एकावर एक वार होताच असतात
जखम अजुन खोल करत असतात
पण ह्या वेदनेत पण चेहरा
मात्र आनंदी ठेवायचा असतो
कारण कुणीतरी त्यात खुश होत असत ।।

काही झालाच नाही अशी मनाची
समजूत काढायची
एकांतात मात्र जखमेवर
अलगद फुंकर घालायची
ह्या जखमा म्हणजे अनुभव समजायचे
भावनांना आवर घालून हसत जगात राहायचे ।

गौरी