ए ऐक… ना ... चल ना
... चल भेटू एकदा नव्याने परत
थोडा वेळ विसरूयात
सध्याच जग
ठेवू बाजूला थोडावेळ
तीच - तीच रोजची काम
आज भेटू परत एकदा त्याच
आपल्या बाकावर
किती वेळ गप्पा चालायच्या
न आपल्या
सगळं जग विसरून , आपलच
फक्त एक वेळ जग होत….
“हो .. हो माहिती आहे…”
आता ते जग सत्यात उतरलय
आणि त्यात आपली दोन
मुलं पण आहेत ,
पण तरीही आज चल ना
परत त्या पाऊल वाटेवर
थोडा वेळ तसेच हातात
हात घेऊन चालू आणि परत तेच विषय घेऊन बोलूयात
नवीन बदल
सगळे सोडून परत तेच जुन आयुष्य थोडावेळ जगूयात
विसरूयात आपल्या जवाबदाऱ्या ,काळज्या , चिंता थोडा वेळा करता
आणि घेऊ चोरून थोडे
क्षण परत एकदा
ए ऐक ना ... चल ना
... चल परत एकदा
Gauri Ekbote
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा