mazionjal

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

एका मूठभर चरणधुळीची महती

 



भक्तीपुढे झुकला भगवंत!

— गौरी

व्याकुळली हो द्वारका नगरी,
शिरशूळाने त्रासला हरी।
चिंता पसरली घरोघरी,
उपाय शोधण्या फिरती
रुक्मिणी आणि नारदमुनी।

कृष्ण म्हणे, “नको कुठले औषध, नको उपचार,
एकच उपाय करील उपकार।
आणा मूठ-चिमूट भक्तचरणधूळ,
लावून भाळी शांत होईल शिरशूळ!”

देवाच्या माथी चरणांची धूळ?
मनामध्ये उठले प्रश्नांचे काहूर।
नारदांना सुचला एक तो उपाय,
वृंदावनातील गोपींचे सहाय्य।

कृष्णव्यथेची वार्ता ऐकून,
व्यथित झाले गोपगोपाळ।
जगाचा स्वामी झाला याचक,
गहिवरले सारे गोकुळजन।

पाप-पुण्याचा ना केला विचार,
ना मुक्तीची चिंता, ना पुण्याचा हिशोब।
हसत हसत दिली ती चरणधूळ,
कान्ह्याच्या प्रेमापुढे सारेच अनमोल!

🌺 भावार्थ

खऱ्या भक्तीमध्ये स्वार्थाला स्थान नसते. आपल्या आराध्याचे दुःख दूर व्हावे, हीच भक्ताची एकमेव इच्छा असते. जिथे प्रेम निरपेक्ष असते, तिथे पाप-पुण्याचा हिशोबही उरत नाही.


— गौरी | माझी ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा