अरे ..... जाऊन सांगा त्या दुःखाला
मी नाही घाबरत आता त्याला
पाठीराखा आहे माझा
तो पंढरीचा त्राता ||
कशाला असावे मी गाळू
व्यर्थ चिंता ती मी
करू
आता तोच एक कनवाळू
विठुराया ||
नको गंडे आणि
दोरे
नको नवस बिवस
त्याच्या नामाचा गजर
हा एकच
उपाय ||
हाती घेतले ते टाळ
मुखी विठूरायाचे ते नाम
पायी चालावी वारी
अन गाठावी पंढरी ||
त्याच्या दर्शनानें बघ
डोळे आपोआप भरती
सर्व दुःख हरून
जाती
अशी माझी माय
माउली ||
Gauri Ekbote
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा