एकदा बघायचाय सूर्याचा देश
लख्ख उजेडात न्हायलेला प्रदेश
जिथे सूर्यकिरणं दव बिंदुला
देतात एक नवी
झळाळी
उबदार हवेची असतें घोंगडी
स्वच्छ सुंदर आकाश , स्वच्छ
सुंदर प्रकाश
स्वच्छ हवेच्या शुद्ध उजेडात
जिथे नसतोच मुळी काळोख
काळोखाच्या
पोटातील आक्रोश
नसतात आर्त किंकाळ्या
अन मनामनाच्या लढाया
सूर्याच्या
देशात असतो म्हणे
एक सागर
आनंदाच्या लाटा सतत
असतात त्यावर
म्हणूनच एकदा बघायचाय
सूर्याचा देश
आनंदानं भरलेला लाटांचा प्रदेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा