बबन द बबन्या
माझ्या ऑफिस मध्ये एक बबन नावाचा मुलगा आहे.
तस त्याला सगळे बबन्याच म्हणतात , आता तर इतकी सवय झालेली त्या नावांची त्याला कि त्याची बायको पण आहोच्या ऐवजी बबन्या बोलली तर च तो ओ देतो.
बबन्या म्हणजे थोडासा बेन च कॅरेक्टर , एक काम एका सांगण्यात पूर्ण करेल तो बबन्या कसला . आपण जर काही गावातून आन असं सांगितलं तर जास्त काही नविचारता हे आपलं निघत आणि अर्ध्या रस्त्यातून परत फोन करत "ते काय म्हनला होतात वो म्याडम तुमी , च्या आईला जॅम इसरलोच "मग सांगितलं कि परतनिघणार आणि दुकानात पोहोचल्यावर परत फोन येणार हे नक्की " ते तुमि बोललेला न बबन्या ते आन , पण ते म्हंजी नक्की काय तेच इसरलो बघा, ते ह्या नासांगा , ते काहीतरी कॉम्पुटर च होत बघा " असं म्हणून दुकानातील माणसा जवळ फोन दिला जातो आणि मग ते सांगायचं आपण त्या माणसाला . नशीब आपलंएवढाच कि कॉम्पुटर च असेल तर त्या रिलेटेड दुकानात हे जात .
तर असा हा आमचा बबन्या एक दिवस त्याच्या टेम्पो मधून एका लग्नासाठी बायका आणि माणसं , त्याच्या गल्लीतली च होती सगळी निघाले. ड्राइवर आमचाबबन्याच . तशी गाडी छान चालवतो तो
निघाले निम्मा रास्ता गल्यावर टेम्पो बंद , काही केल्या सुरु होईना , मग लक्षात आलं कि डिझेल संपलेलं ,,,, जवळपास कुठे पंप पण नव्हता, सगळे शिव्या देतटेम्पो ला धक्का देत होते, १०-१२ कमी पर्यंत सगळ्यांनी धक्का देऊन शेवटी तो टेम्पो , त्यातील ड्राइवर सीट वर बसलेला बबन्या आणि सगळ्याच्या टेम्पो मधील बायका डिझेल पंप वर आणला. धक्का देता देता तर काही ऊन मुळे बेशुद्ध पण पडले . तसाच त्यांना शुद्धीवर आणून परत धक्का द्यायला परावृत्त करून एकदाची तीवरात डिझेल पंप वर आली . डिझेल भरल्यावर एक जण
बबन्याला म्हणाला, “ माग एक डरम आहे त्यो पण घे भरून नंतर येताना पाराब्लेम नको .” सगळ्यांनी त्याला संमती दर्शवली “व्हाय घे भरून”
तसा बबन्या एकदम ऐटीत बोलला " तो फुल हाय बघा , अडल्या नडल्या साठी" लोकांचा पाराच वाढला , दात ओठ खात त्याला तिथेच धुतला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा