mazionjal

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

Short story

रात्रीचे १०:३० झाले होते शॉप बंद करायला,
आज संडे म्हणून थोडी जरा जास्तच धावपळ झाली शॉप मध्ये.
सुमित मला बोलला कि तू पुढे जा डेक्कन ला गाडी लाव , मी शॉप बंद करून येतोच लगेच मागूनम्हणजे सकाळी तुझी ऑफिस ला जायची फजिती नाही व्हायचीआणि गाडी पण नेता  येईल तुला.
 मी सकाळी डेक्कनला सोडतो तुला , मग पुढे जा  ऑफिस ला . मी हि ठीक आहे असं म्हणून गाडी काढलीस्कार्फ लावलाआणि निघाले.
थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं कि गाडीतील पेट्रोल संपायला आलेलं
म्हणून रस्त्यावरच असलेल्या एका पंप (नशिबानं साथ दिलाय म्हणून सुरु होता ) पेट्रोल टाकलं , आणि निघाले.
लवकर जाऊन पटकन गाडी लावू टाकू आणि निघू घरी , खूप झोप येत होतीआणि लवकरात लवकर पोहोचावं एवढंच सुरु होत
तास उशीर पण खूप झालेलाशिवाय रस्त्यात गर्दी तशी नव्हतीच मी आणि एखादी गाडी , स्ट्रीट लाइट हि थोडे मंदच होते .
गाडी चालवत थोडं पुढे मेन रोड ला आले सिग्नल सुरु होता , आणि सिग्नल जवळ एक बाई उभी होती , तिची साडी transparent कमरेच्या खाली नेसलेली,  ती लक्ष वेधलं जाईल  अशी  उभी होतीतिने केलेल्या मेकअप चा असर होता का  कोण जाणे पण ती खरंच खेचक दिसत होती  ,   साडीला मॅचिंग असं  ब्लाउज होत , हातभर बांगडया , डार्क लिपस्टिक , केसातला गजरा सुद्धा अजून ताजा होता,   - गाडी आणि - रिक्षा सिग्नला थांबलेल्या होत्या म्हणून मी हि थांबले (अन्यथामोडलाच असता , सिग्नलं ) , माझं लक्ष त्या बाई कडे गेलं
ती जाणाऱ्या येणाऱ्या कडे खूप आशेने बघत होतीमला कीव आली वाटलं बिचारीला लांब जायचं असेलआणि ह्या वेळेला कुठे बस किंवा टॅक्सी ,... शिवाय टॅक्सीप्रकरण आपण वाचोतच ना...
वाटलं बघावं विचारून ऑन  वे असेल तर सोडू , किंवा निम्मा रास्ता तरी सोबत होईल तिला . , म्हणून थोडं पुढे गेले , आणि विचारलं तिला , तुम्हाला कुठेजायचंय  , मी सोडू का , आणि खूप उशीर पण झालेला ना
तर हि बाया रागातच वैतागून ओरडलीच " काय खोटी करते , चल निघ इथून , धंद्याचा टायमाला वैताग नुसता"
बापरे गाडीला किक मारलीस्कार्फ पण नाही लावलासरळ डेक्कन गाठलं,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा