mazionjal

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

आठवणीं

आठवणींच्या घोळक्यात
मनाचा होतो गोंधळ
प्रत्येकीचं ऐकण्यात
त्याच हरवत मीपण ।।

प्रत्येक आठवण वेगळी
रागावलेली , हिरमुसलेली
हसरी , लाजरी , आनंदी , भारावलेली
रुसलेली,रडवेली
हळवी , आतुरलेली

मनासाठी प्रत्येक आठवण
हि त्याचीच
तीच ऐकून घेणं , तिच्यात रमण
हि खेळी हि त्याचीच

मन आठवण
जणु सरोवरावर उठणारे तरंग
आठवणींनाही असतात
वेगवेगळे रंग

मन बिचारं आपलं
रमत ह्या आठवणीत
भानावर आल्यावर
कळत त्याला
हे तर जमा झालं ठेवणीत ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा