अवर्णनीय तू, अनादी तू
आदी तू, अंत तू
सृष्टीतील चेतना तू
सर्व चराचरात तू ।।
जीव जडला तुझ्यावर
वेड लागले तुझे
दर्शनाची आस आता फक्त माझ्या उरी वसे ।।
आतुरले नयन
कासावीस झाले मन
आले शरण तुला
कर मुक्त हे देहासन ।।
सोडले जिवलग सखे
अंतरी तूच वसे
तूच माता , तूच गुरु
तूच सखा तूच बंधू
विनविते दासी तुझी
चरणाशी प्रीती माझी
दे दर्शन एक वारी
सफळ होईल आराधना माझी ।।
आदी तू, अंत तू
सृष्टीतील चेतना तू
सर्व चराचरात तू ।।
जीव जडला तुझ्यावर
वेड लागले तुझे
दर्शनाची आस आता फक्त माझ्या उरी वसे ।।
आतुरले नयन
कासावीस झाले मन
आले शरण तुला
कर मुक्त हे देहासन ।।
सोडले जिवलग सखे
अंतरी तूच वसे
तूच माता , तूच गुरु
तूच सखा तूच बंधू
विनविते दासी तुझी
चरणाशी प्रीती माझी
दे दर्शन एक वारी
सफळ होईल आराधना माझी ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा