खरंतर ह्या विषयावर
बराच काही लिहून
झालंय , लिहिता आहेत आणि
ह्या समस्येवर मात
करण्यासाठी काम
पण सुरु आहे,टीव्ही च अतिक्रमण
इतकं वाढलंय कि
त्यामुळे वाचन हा
प्रकार , हि सवय
आता कमीच होत
आहे , ती सवय
राहिलीच नाही सगळं कस झटपट मिळतंय
shortcut मिळतंय , चलचित्र सकट, परत
संवादा सकट जशीच्या
तशी परिस्थिती उभी
केली जाते
वेगवेगळे विषय घेऊन
लोक त्यावर सिरीयल
, मूवी काढू पाहतात
आणि वाचनापेक्षा ती
सिरीयल किंवा तो मूवी
बघायला गर्दी होते पण एक विचार
केलेला आहे का
? कि तो सिरीयल
किंवा मूवी चा
रायटर हा त्यातील
रंजकता वाढावी म्हणून काही
प्रयोग करतात मेन स्क्रिप्ट मध्ये थोडे
बदल घडवून आणतात,आणि ती जास्तीतजास्त
कशी रंजक होईल, जास्तीतजास्त
कशी उत्सुकता वाढवेल
ह्यावर भर घालतात
, . आणि कधीही
ते पुस्तक न
वाचलेला पण नुसतं
नाव ऐकून असलेला
, गर्दी करणारा माझा प्रेक्षक
तेच खर असं
समजतो , कुठलीही शहानिशा न
करतात .त्यामुळे त्याला जे कळत ते
त्याने त्या रायटर
च्या नजरेतून पाहिलेलाच
. ती एकच बाजून
त्याला कळते . ह्या अश्या
प्रकारामुळे खरंच ते
लिहिलेल त्या व्यक्ती
पर्यंत पोहोचत का, समाजापर्यंत जे पोहोचवायचं आहे ते पोहोचत का?
कोणत्या दृष्टिटकोनातून त्या लिहिणाऱ्याने लिहिलेलं आहे ते काळत का? लिहिण्यामागचा
खरा उद्देश प्रेक्षकाला कळतो का?
वाचनामुळे व्यक्तीत काही एक्सट्रा
गुण निर्माण होत
असतात , त्याच्या कळत आणि
नकळत . वाचन हा
सुंदर मित्र तर आहेच
शिवाय तो माणसाची
भाषाशैली , वैचारिक परिपक्वता वाढवतो
, व्यक्ती स्वतःच असं मत
तयार करते , विचार
करायला शिकते, वाचन ते
त्याला तस करायला भागच पडते,
ह्यातूनच व्यक्ती त्याच मत ठाम
पाने मांडू शकते,
ह्या उलट टीव्ही सिरीयल
फक्त टी आर
पी वाढवता .
ह्या धावपळीच्या युगात निवांत
असा वेळ कमीच
असतो , आणि तोही
व्यक्ती टीव्ही पुढे
घालवतात , त्या सिरिअल्स
मध्ये मोस्टली सासू
सून तू तू
मै मै , पुनर्जन्म
, भूत खेत ह्याच
गोष्टी असतात . ह्यातुन असा
कुठली भाषाशैली, कुठलं
व्यक्तिमत्व , कुठलं मत आणि
कुठली मानसिकता तयार
होईल . ह्यातून माणूस घडण्यापेक्षा
नकारात्मकता वाढीस जास्त लागेल
., ह्या गोष्टीत फक्त व्ह्यूवर
वाढवतात .
मी पूर्णतः टीव्ही च्या
विरोधी नाही काही
सिरिअल्स मुव्ही खरंच खूप
छान असतात . पण
वाहिन्यांवर टीआरपी वाढवण्यासाठी चाललेली
चढाओढ हे सगळं
रेसिंग सारखं वाटत , एक
प्रकारचं अतिक्रमण झाल्यासारखं वाटत
ह्या सुंदर अशा माध्यमाचं
खूप भयानक रित्या
वापरकरण चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे.
प्राईम टाइम मधील
सेरिअलची तर इतकी
जाहिरात केली जाते
कि व्यक्ती हि
त्याला वेळेला ते बघणे सोडत
च नाही आणि
अश्याप्रकारे hammering केलं जात, हे
त्या व्यक्तीच्या त्या
वेळेवर अतिक्रमण च असत , मग
पुस्तक वाचायला कुठून वेळ
मिळणार .
वाचनात व्यक्ती
जे काही वाचतो
ते वाचलेल , तो
काळ , ती व्यक्तिमत्व
, ती परिस्थिती आपण
आपल्या पद्धतीनं स्वतः आपल्या
मनात घडवतो , तयार
करतो , ते किती
पुढे न्यायचं हे
आपण च ठरवतो
, त्याला कुठलाही वेळेचं बंधन
नाही , वाचलेलं जे दृश्य
अशा प्रकारे आपण
आपल्या मनात तयार
करतो , ते कायम
एक ठसा उमटवत
, ते स्वतः आपण
जगतो . त्यातीलं परिस्थिती वर
विचार करतो, ह्यातून
त्या काळातील परीस्थिती, विचार करण्याची पद्धत समजते.
वाचन माणसाला एक व्यक्ती
बनवत , व्यक्ती म्हणून जगायला
शिकवत , व्यक्तिमत्वाला एक आकार
देत , ह्या उलट
टीव्ही सिरिअल्स
फक्त प्रेक्षक बनवत
आणि तोच वाढवतात
.