काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ आणि पावसाची चाहूल देत अलगद वाहणारा गार वारा , दुपारीही संध्याकाळ झाल्याचा भास, मातीचा मंद धुंद सुगंध… एक-एक थेंब पडायला सुरुवात होते. मग रिमझिम सर येते आणि क्षणार्धात ताशासारखा कोसळणारा पाऊस सुरू होतो.
या सगळ्या वातावरणाबरोबर मनही चिंब भिजून जातं. उन्हाळ्याच्या अस्तित्वाची एकही खूण मागे न ठेवता तो आपल्या आगमनाने सगळा शीण, सारी लाही विसरवून टाकतो. फुलांपासून माणसांपर्यंत, पशुपक्ष्यांपासून सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो आपल्या रंगात रंगवून टाकतो, भिजवून टाकतो. नव्या उमेदीची, नव्या ऊर्जेची आणि आनंदाची चाहूल घेऊन येणारा हा पाऊस मला खूप आवडतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा