काही संध्याकाळी फक्त मावळत नाहीत... त्या मनात रेंगाळत राहतात.
खूप दिवसांनी
आज संध्याकाळ
माझ्या खिडकीशी
निवांत थांबली
आणि नकळत तुझ्या
नावाचा सुगंध घेऊन आली '
खूप बोललो आम्ही
एकमेकांशी
शब्द नाही
पण
भावनांच्या कल्लोळाशी
जेवढ्या मावळतीच्या
छटा
तिने आभाळभर
पसरवल्या,
तेवढ्याच तुझ्या
आठवणी
मनात गडद होत
गेल्या...
उर दाटून आला
होता
डोळे थोडे पाणावले
माझ्या काळजीने
संध्येने परत जाणे हि नाकारले
मी म्हटलं तिला
- जा बाई त्या सूर्य मागे ,एकटा सोडू नको त्याला ,
घरी परतत असताना,
सोबत तुझीच तर असते त्याला...
ती फक्त मंद
हसली...
आणि निघून जाताना
माझ्या ओंजळीत
तुझ्या आठवणींचा
एक संधिप्रकाश
ठेवून गेली.
गौरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा