mazionjal

मंगळवार, २१ जून, २०१६

अरे ..... जाऊन सांगा त्या दुःखाला

अरे ..... जाऊन सांगा त्या दुःखाला 
मी नाही घाबरत आता त्याला 
पाठीराखा आहे माझा 
तो पंढरीचा त्राता ||


कशाला असावे मी गाळू
व्यर्थ चिंता ती मी करू
आता तोच एक कनवाळू      
         विठुराया ||

नको गंडे आणि दोरे
नको नवस बिवस
त्याच्या नामाचा गजर
हा  एकच उपाय ||

हाती घेतले ते टाळ
मुखी विठूरायाचे ते नाम
पायी चालावी वारी
अन गाठावी पंढरी ||

त्याच्या दर्शनानें बघ
डोळे आपोआप भरती
सर्व दुःख हरून जाती
अशी माझी माय माउली ||



Gauri Ekbote 

बुधवार, २ मार्च, २०१६

"घार उडे उंच आकाशी , लक्ष तिचे पिल्लांपाशी "

कितीतरी गोष्टी रोज आपल्या सोबत घडत असतात
कितीतरी विचारांचे तरंग रोज मनात उठत असतात
पण त्यातले काहीच लक्षात राहतात
आज असाच ऑफिस मध्ये जाताना ,   उंच खांबावर  बसलेली एक घार  बघितली
 काय विचार करत असेल  ती,कसलं निरीक्षण असेल……
खाली तर  ट्राफिक ,  आणि हि उंच खांबावर एकटीच
माणसांच्या गर्दीच निरीक्षण…….  कि आणखी कसलं
तिची ती बघण्याची पद्धत, ऐट ,
सगळ कस रुबाबदार , मनात चित्रच  बनऊन गेली
 थोड पुढे  गेल्यावर  आठवलं "घार उडे उंच आकाशी , लक्ष तिचे पिल्लांपाशी "
आपलही होत न अस … ऑफिस मधल्या गर्दीतही मधनच मुलाची आठवण येते
आला असेल शाळेतून …. खाल्लं असेल का …. शाळेत काय झाल असेल…।
त्या घारी प्रमाणेच  …। 

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

समुद्र

समुद्र  कणखर , अफाट तेवढच अथांग , शांत, स्वतःच्या मर्यादा जाणणार आणि जपणारा 
समंजस , गूढ  तितकाच रागीट , उग्र अस एक भक्कम व्यक्तिमत्व लाभलेला 
खरतर व्यक्तिमत्व म्हणण सुद्धा  त्याच्या दृष्टीने खूप तोकड आहे 
तो एक महा जल आलय आहे 
सागराच्या  अस्तित्वामुळेच पृथ्वीला  सजीवत्व प्राप्त झालंय 
कितीतरी ज्ञात अज्ञात जलचरांचा , मानवांचा  तो एक भक्कम आधार आहे, त्याही पुढे जाऊन अस म्हणावस वाटत कि तो त्यांचा पोशिंदा च आहे 
जेवढा तो भक्कम , कणखर ,धीर- गंभीर तेवढाच रसिक  वाटतो 
त्याला स्वतःची एक आवड  आहे 
सागराच स्वतःच अस एक संगीत आहे , त्यात तो कायम हरवलेला असतो 
त्याच्या लाटांची तर मैफिलच कायम  रंगलेली असते 
आणि ह्या संगीतात सामील व्हायाल नद्या हि उस्तुक असतात 
अगदी हिमालया पासून त्या त्याच्या सुराच्या मोहिनीने  बेभान होऊन धावत येत असतात 

अशा ह्या रसिक आणि गंभीर नदीश ने खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले , अनुभवलेले . 
अनुभवलेले काय ते तर त्याच्याच मुळे, त्यानेच  निर्माण केलेले .
असा हा वयस्कर , भारदस्त जलधि जितका प्राचीन तितकाच तो तरुण हि 
जणू तारुण्याच वरदान च मुक्त हाताने त्याला देवाने दिलय 
अजुनहि लहानान पासून मोठ्यान पर्यंत सगळ्यांना तो भावतो 
मोहित करतो , एक वेगळीच आकर्षकता आहे त्याच्यात. 
असा हा शामवर्णीय कितीतरी गूढ अगम्य गोष्टी उदरात साठून शांततेत उभा आहे 
एक वेगळच गुढतेच वलय त्याच्या भोवती आहे