mazionjal

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

सांजवेळ

 दूर क्षितिजा  जवळ, डोंगर रांगांच्या कडेला, जेव्हा सूर्य दिवसभरचा दमून भागून क्षणभर विसावा घेतो 

मावळतीचे स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत  डोंगर आड निघून जातो

ती वेळ म्हणजे सांजवेळ

 

 एक एक आठवण लाट बनून मनावर आदळते आणि अश्या  आठवणींना जेव्हा उधाण येत

ती वेळ म्हणजे कातरवेळ

 

लांब च्या प्रवासाला गेलेलं आपलं पिल्लू येणार आहे ,ते अजून कस नाही आलं , अशी हूर हूर लावून वाटे कडे डोळे लावणाऱ्या आईची  वेळ

तिन्हीसांजेची वेळ

 

केव्हा एकदाच  घरी पोहोचतोय आणि आई च्या हातचा चहा पित तीला दिवस भरच घडलेल कधी एकदाच सांगतोय

अशी शेअरिंग ची वेळ म्हणजे इव्हनिंग ची वेळ

 

शाळा सुटल्यावर बरोबर जाऊ , तू गेटलाच थांब ,

ऑफिस सुटल्यावर कट्ट्यावर भेटू,

अश्या प्लॅनींगची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ

 

अशी एक वेळ जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो

अश्या वेळेला जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात,

 ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ

 

मावळतीचा सूर्य बघत , एकमेकांच्या हातात हात घालून समुद्रकाठच्या वाळूत बसणं

म्हणजे  संध्याकाळची “तिला” दिलेली वेळ

 

हूर हूर त्या दिवसाचा शेवट आणि रम्य रात्रीची चाहूल लावणारी वेळ

सांजवेळ

 

गौरी एकबोटे

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

MARS Mission


 

नासा च्या हेड ऑफिस मध्ये फुल गोंधळ होता सगळे विचार करत होते

वेग वेगळे ऑपशन suggestion  येत होते

मी आपलं उशीर झाला म्हणून धावत पळत ऑफिस नुकतच गाठलं होत

बॅग जागेवर ठेवली तेवढ्यात ऑफिसबॉय ने सांगितलं लगेच बोलावलं आहे साहेबानी

एवढं काय झालं असेल....  का सगळे जमा केले.... हा विचार करत मी साहेबांच्या केबिन कडे निघाले  तस हि त्यांना माणसं गोळा करायची सवयच

आत्ता आज काय नवीन खुळ डोक्यात ह्या माणसाच्या म्हणून मी गेले आणि केबिन च दार उघडलं ..सगळे सायंटिस्ट तिथे गहन  विचारात होते

काय चाललंय काहीच कळेना ... मग आमचे बॉस ,,, खर सांगायचं तर बॉस कमी friend  जास्तच एक एक गोष्ट explain करायला लागले

तर झालं असं कि -

आम्ही गेले १० महिने मार्स म्हणजे मंगल ग्रह ह्या प्रोजेक्ट वर काम करत आहोत ,,, रोज वेग वेगळे फोटो येतात त्यावरून तिथल्या वातावरणाचा आमच्या टीम ला अभ्यास करायचं प्रोजेक्ट .  तर कल रात्री आमच्या बॉस च्या असं लक्षात आलं कि मार्स वर गेले दोन तीन दिवस खूप मोठ्ठा ढग तयार झालाय , आणि  आज तो  इतका मोठ्ठा झालाय कि त्याने सगळा  ग्रहच व्यापून टाकलाय , त्या ढगाचा नीट अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं कि तो जर आज पृथ्वी वर असता तर आपल्याला खूप त्या पासून फायदा झाला असता (तो काय हे काही माझ्या लक्षात येत नाही ) , तर खूप मोठ्ठा फायदा झाला असता, सगळी टीम असं ठरवते कि तो ढग पृथीवर आणायचा त्याला तिथून ढकलायचा आणि पृथीवर ओढून आणायचा . मग काय आम्ही सगळे कामाला लागतो

काही लोक पृथीवरच असतात तिथून त्या ढगांचं निरीक्षण करायला, काही अंतराळातुन निरीक्षण करतात आणि मी व माझी ५-६ लोकांची टीम मंगळावर आम्ही तो ढग तिथून खूप काही उपकरण वापरून ढकलतो अंतराळात आणि आमच्या यानात बसतो त्या ढगाचा पाठलाग करायला

पण जस आमचं यान मंगळ ग्रहावरून अंतराळात येते....  आम्ही जस काही खूप खोल समुद्रात उडी मारल्यावर नाही का आपण पहिले एकदम खाली जातो आणि मग परत डुबकी मारून परत वर येतो तसे वर आलो , खाली असताना माझ्या मनात एकच विचार ,,, साल त्या ढंगाचं लोकेशन  तर आपण नाही सोडणार ना ......... पण अंतराळातील आमची टीम त्याच्या मागेच असते ,,, पृथ्वी वरून सुद्धा काही लोक त्याला वेग वेगळ्या उपकरणांनी ओढत असतात आणि शेवटी एकदाचा तो ढग आम्ही पृथ्वी वर आणतो , मध्ये खूप अडचणी येतात पण त्या नंतर कधी तरी सांगेल

तर तो ढग पृथ्वी वर येतो इतर सायंटिस्ट जे chemical चेक करतात ते त्या ढगांचं परीक्षण करतात .. सॅम्पल घेऊन......  आणि मी मात्र माझ्या घरी येते

खुप मोठ्ठं मिशन आज पूर्ण झालेलं असत आणि घरी येऊन मी मस्त सोफ्यावर झोपते आणि अचानक झोपेत मी खाली पडते

आणि जाग आली ते आज पहाटेचे ५:२५am झाले होते ... मग लक्षात आलं अरे स्वप्न होत तर .....

  Gauri Ekbote

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

मी

 



जीर्ण रीतींचे घाव हे  ,सोसणे मी सोडले 

उमलुनी राखेतून आता स्वप्न नवे मी पहिले 

एकवटून जीव आता बळ पंखात आणले 

क्षितीजाच्या भाळावरती यश कीर्ती चे मळवट भरले 


दूर केल्या दुःख यातना , झिडकारले मी सोसणे , 

मुक्त झाले मी तर आता स्वाभिमानास  उंचावले

गवसले आज मीच मला ,शिळेची मी  अहिल्या झाले 

नशिबाच्या गगनात आता इंद्रधनुचे रंग उमटवले

गौरी एकबोटे



गौरी एकबोटे 

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

अबोल

 

तुझं माझं नातं मला कधीच कळलं नाही ,  एकमेकात साधा संवाद सुद्धा नाही

तरी हि, तुला मी नीट व्यवस्थित कळते

माझ्या मनातलं तू चांगलं ओळखून आहेस

मला कधी काय हवय हे तुला बरोबर कळत

माझ्या बरोबर कधी तू एक मित्र , तर कधी लहान भाऊ तर कधी गुरु होऊन राहतोस

कधी फक्त ऐकत असतो तर कधी फक्त गालातल्या गालात हसत असतोस

पण मला जेवढं आठवतंय आपण कधीच आत्ता पर्यंत एक शब्द सुद्धा बोललो नाही

काय आहे आपल्या दोघात कोणत्या  पूर्वजन्माचं हे अबोल नातं तू निभावत आहेस

पण तू सोबत आहेस हि भावनाच खूप मस्त आहे  , मी खूप बिनधास्त असते

तू असलास ना कि जाणवत तू म्हणतो आहे कि " मी आहे तुझ्या साठी इथे थांबलेलो "

आणि एक वेगळाच विश्वास निर्माण होतो मनात मग कुठलीच चिंता काळजी नाही वाटत

कितीही कठीण वाट असली तरी हिरव्यागार मऊ गवताच्या पायवाटेवरून चालते आहे असं वाटत आणि ती कधी संपते हे कळत सुद्धा नाही बघ .

आपल हे अबोल नातं असच जन्मजन्मांतरिच असू दे , तुझी हि साथ कायम  असू दे,  अजून  काहीहि नको बघ.  


सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

मी एक वटवृक्ष


 🌳मी एक वटवृक्ष 

🌿माझ्या मुळांनी, मला जमिनीला घट्ट 

धरून उभं रहावंच लागेल ,

 मुळांना खोल जमिनीत जावच लागेल 

पाण्याच्या शोधात 

कारण मी एक वटवृक्ष आहे  🌳

 

🌿असंख्य वेलींचा मला आधार व्हायचय 

चिमण्या पाखरांच घर व्हायचंय 

अनेक पांथस्थानचा विसावा व्हायचंय 

आणि म्हणून मला भक्कम उभं राहावंच लागेल 

कारण मी एक वटवृक्ष आहे  🌳


🌿वटवृक्षला कमजोर होऊन चालत नाही 

कीड लागून चालत नाही ,

पान गाळून तर अजिबात चालत नाही 

आपल्या असंख्य भुजा विस्तारून 

अनेकाना कवेत घ्यायचय 

कारण मी एक वटवृक्ष आहे 🌳

 

🌿माझ्याशी अनेकांच्या श्रद्धा तर काहींच्या अंधश्रद्धा 

जोडलेल्या आहेत 

अगणिक सूक्ष्म जीवांचं जीवन जोडलेलं आहे 

धरेचा समतोल मला साधायचाय 

कारण मी एक वटवृक्ष आहे🌳


गौरी

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

लागला नाद तुझ्या बासरी चा

 

लागला नाद तुझ्या बासरी चा रे कान्हा 

लागला नाद तुझ्या बासरी चा 

मधुर मंजुळ हळुवार अलगद 

स्वर हे पाव्याचे झुरवी चराचर 

जाहले वेडे हे जग सारे    रे कान्हा 

जाहले वेडे हे जग 


कृष्ण सावळा , गोरी राधा 

रास रंगला यमुना तीरा 

तशी मी रंगले ह्या पाव्यात  रे कान्हा 

तशी मी दंगले ह्या पाव्यात 


नंदा चा नंदन वाजवी मुरली 

दंग होती साऱ्या ह्या गवळणी 

काढी हा खोड्या फार     रे कान्हा 

काढी हा .... आई ग .... 


खोडकर अवखळ यशोदेचा नंदन 

बोलती गोपिका करती रुदन 

लावती जीव हि त्याला    रे कान्हा 

तरी हि लावती जीव तुला 


लागला नाद तुझ्या बासरी चा रे कान्हा 

लागला नाद तुझ्या बासरी चा रे कान्हा

गौरी 

गुरुवार, १५ जुलै, २०२१

मन

आज मन  शांत आहे 

उगाच च इकडे तिकडे धावणं , सैरभैर होणं 

सोडून दिलय त्याने 

आता ती अगतिकता, तो ताण  नाही जाणवत , किंबहुना मन त्याला थाराच देत नाही 

मार्ग काढण्या कडे त्याचा कल जरा जास्त जातो 

 गोष्टी धरून ठेवण्या पेक्षा सोडून दिल्या जातात 

मी ,माझं ,मला, कोण, कधी, केव्हा ह्या पेक्षा कस करता येईल हा प्रश्न पडतो , तो सोडवण्यात ते जास्त रमतं , हो आणि  प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे असं काही नसत हे आता पटलंय त्याला 

चीड चीड , संताप , राग राग ह्या पासून थोडी अलिप्तता मिळालीये 

आणि ह्या मुळेच का कि नवीन काही तरी शिकण्याची एक उम्मेद आली आहे 

रोज नवीन काय बघायला , वाचायला मिळेल ह्याचा शोध सुरु झालाय 

एका नवीन आभाळात आल्या सारखं होतय , जेथे दिशा इतक्या विस्तृत आहे कि अजून पुढे ,अजून पुढे आणि परत अजून पुढे सरकतात 

क्षितिजाची किनार पुढे पुढे च सरकते जेवढं आपण पुढे जाऊ तेवढी ती अजून पुढे जाते आणि विस्तृत होते 

मला आवडायला लागलय  इथल उडणं , भरारी घेणं, उंच उंच गिरकी घेत झेपावण